मुंबई : आशिया कप 2023 (Asia Cup 2023) मध्ये 10 सप्टेंबर रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK) महामुकाबला पाहायला मिळणार आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याकडे सर्व क्रिकेटप्रेमींचं लक्ष (Asia Cup 2023 Ind vs Pak Match) लागलं आहे. या सामन्यासाठी पाकिस्तानने प्लेईंग 11 संघ जाहीर केला आहे. आशिया चषक 2023 मध्ये रविवारी, 10 सप्टेंबर रोजी टीम इंडिया (Team India) आणि पाकिस्तान (Pakistan) संघ सुपर-4 मध्ये आमने-सामने येणार आहेत. पाकिस्तान चार वेगवान गोलंदाजांसह (Fast Bowler) भारताविरोधात उतरणार आहे


पाकिस्तानच्या प्लेईंग 11 मध्ये कोण-कोण?


बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, फकर झमान, एमाम-उल-हक, सलमान अली अघा, इफ्कीखर अहमद, मोहम्मद रिझवान (विकेटकिपर), फाहिम अशरफ, नसीम शाह, शाहिन आफ्रिदी, हरीस रौफ.






भारत विरुद्ध पाकिस्तान सामना कुठे पाहता येणार ?


श्रीलंकेतील कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रंगणार आहे. दरम्यान, या सामन्यावर पावसाचं सावट आहे. टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यातील महामुकाबला भारतात स्टार स्पोर्ट्समार्फत टीव्हीवर लाईव्ह दाखवण्यात येणार आहे. 


लाईव्ह स्ट्रीम फ्रीमध्ये कुठे पाहता येणार?


टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यातील हा हायव्होलटेज सामना डिस्ने प्लस हॉटस्टारवर विनामूल्य थेट प्रसारित केला जाईल. मात्र, मोफत लाईव्ह स्ट्रिमिंग सुविधा केवळ मोबाईल युजर्ससाठी असेल.






आशिया कपसाठी टीम इंडियाचा संघ


रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, इशान किशन, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, रवींद्र जाडेजा, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, प्रसिद्ध कृष्ण.


राखीव खेळाडू : संजू सॅमसन


आशिया कपसाठी पाकिस्तानचा संघ


फखर जमां, इमाम उल हक, बाबर आजम (कर्णधार), मोहम्मद रिजवान (विकेटकीपर), आगा सलमान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, फहीम अशरफ, मोहम्मद हारिस, मोहम्मद वसीम जुनिअर, अब्दुल्ला शफीक, उसामा मीर, सऊद शकील, मोहम्मद नवाज, शाहीन अफरीदी, नसीम शाह, हारिस रौफ.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Virat Kohli - Rohit Sharma : रोहित-विराटचा वनडेत जलवा, पाकिस्तान विरोधात दोन धावा करताच इतिहास रचणार!