IND vs PAK Women World Cup LIVE Score : भारतीय महिला संघाचा पाकिस्तानवर 107 धावांनी दणदणीत विजय

IND vs PAK Women World Cup LIVE Score : भारत विरुद्ध पाकिस्तान महिला टी-20 वर्ल्ड कप सामना, पाहा सामन्या संदर्भातील लाईव्ह अपडेट एका क्लिकवर...

abp majha web team Last Updated: 06 Mar 2022 07:17 AM
भारतीय महिला संघानं पाकिस्तानला चारली धूळ, 107 धावांनी दणदणित विजय

भारतीय महिला संघाने पाकिस्तान संघाला चांगलीच धूळ चारली आहे. भारताने 107 धावांनी पाकिस्तानवर दणदणित विजय मिळवला आहे.






 

नशरा संधूही शून्यवर बाद

नशरा संधू खाते न उघडताच शून्य धावांवर बाद झाली आहे. पाकिस्तानची धावसंख्या : 121/9 (ओव्हर 38/4)

फातिमा सना, सिद्रा नवाज एकामागोमाग एक एलबीडब्ल्यू आऊट

पाकिस्तानच्या फातिमा सना, सिद्रा नवाज एकामागोमाग एक एलबीडब्ल्यू आऊट झाल्या आहेत.

32 ओव्हरनंतर पाकिस्तानच्या 96 धावा, 6 गडी बाद

पाकिस्तान संघाने 32 ओव्हरनंतर 96 धावा केल्या असून त्यांचे 6 गडी बाद झाले आहेत.

टीम इंडियाकडून पाकिस्तानचा सहावा गडी बाद

राजेश्वरी गायकवाडच्या तुफान गोलंदांजीने पाकिस्तानच्या आलिया रियाजची विकेट घेतली. पाकिस्तानची धावसंख्या : 87/6

पाकिस्तानचे पाच गडी बाद

सिद्रा अमीन 30 धावांवर, तर निदा दार चार धावांवर माघारी परतली आहे.

ओमैमा सोहेल पाच धावांवर पाकिस्तानी तंबूत माघारी

भारताला तिसरी विकेट मिळाली आहे. ओमैमा सोहेल पाच धावांवर पाकिस्तानी तंबूत माघारी परतली आहे. सध्या पाकिस्तानची धावसंख्या : 67/3

टीम इंडियाकडून बिस्माह मारूफला झटका

दिपाली शर्माच्या गोलंदाजीवर बिस्माह मारूफ बाद झाली आहे. रिचा घोषने झेल घेतला.

पाकिस्तानला पहिला धक्का, जव्हेरिया खानला राजेश्वरी गायकवाडनं केलं बाद

पाकिस्तानला पहिला धक्का, जव्हेरिया खानला राजेश्वरी गायकवाडनं केलं बाद

IND vs PAK Women World Cup LIVE Score : पाकिस्तानच्या डावाला सुरुवात, भारताची सुरुवात, पाच षटकात केवळ सहा धावा

 IND vs PAK Women World Cup LIVE Score : पाकिस्तानच्या डावाला सुरुवात, भारताची सुरुवात, पाच षटकात केवळ सहा  धावा

भारतीय महिला संघाचं पाकिस्तानला 245 धावांचं आव्हान

भारतीय महिला संघाचं पाकिस्तानला 245 धावांचं आव्हान दिलं आहे.






 

स्नेह राणाचंही अर्धशतक

पूजा वस्त्राकरनंतर आता स्नेह राणानेही अर्धशतक झळकावले. गतवर्षी इंग्लंडमधील कसोटी सामना वाचवल्यानंतर आता राणाची ही खेळीही इतिहासाच्या पानांमध्ये नोंदवली जात असून, तिने चार चौकारांसह अर्धशतक पूर्ण केले.

पूजा वस्त्राकरचे शानदार अर्धशतक

नवोदित पूजा वस्त्राकरने शानदार अर्धशतक झळकवले आहे. भारताच्या धावसंख्येने 200 धावांचा टप्पा ओलांडला आहे. भारताने 47 व्या षटकात हा टप्पा गाठला. भारतीय महिलांनी आता पाकिस्तानविरुद्धच्या लढाईचा आकडा गाठला आहे. पूजा आणि स्नेह राणा सध्या फलंदाजी करत आहेत. भारताची धावसंख्या : 222/6

पूजा आणि स्नेहची अर्धशतकी भागीदारी

पूजा वस्त्राकर (35) आणि स्नेह राणा (18) यांनी भारताला सामन्यात पुनरागमन केले आहे. दोन्ही फलंदाजांनी वेगाने धावा काढण्यास सुरुवात केली,. प्रत्येक चेंडूवर धावा काढण्याची रणनीती भारतासाठी कामी आली. 41 षटकांत धावसंख्या : 170/6

टीम इंडियाला सहावा धक्का, मिताली राजही बाद

कर्णधार मिताली राजही पाकच्या फिरकीपटूंना बळी पडली आहे. अवघ्या 9 धावा करत मितालीने खराब शॉट मारून विकेट दिली. शेवटच्या 19 धावांत पाच विकेट पडल्या आहेत. 34 षटकांत भारताची धावसंख्या : 115/6

भारताचा निम्मा संघ 112 धावांवर बाद

भारताने 96 धावांवर दुसरी विकेट गमावली. टीम इंडियाचा निम्मा संघ 112 धावांवर बाद झाला आहे. भारतीय फलंदाज क्रीजवर अधिक वेळ टिकत नाही आहेत. ही पाकिस्तानसाठी चांगली संधी आहे. पाक स्पिनर्सचा अप्रतिम खेळ सुरु आहे. 

हरमनप्रीत कौरही बाद, भारतीय संघ अडचणीत

भारताची उपकर्णधार हरमनप्रीत कौरही बाद झाली आहे. भारतीय संघ अडचणीत आहे. या सामन्यात पाकिस्तानने जबरदस्त पुनरागमन केले आहे. कोणत्याही फलंदाजाला खेळपट्टीवर टिकून राहण्याची संधी मिळत नाही. भारताची धावसंख्या : 112/4 (30.4 ओव्हर)

आता मिताली आणि हरमनवर जबाबदारी

धक्क्यातून सावरण्यासाठी भारताला आता चांगल्या भागीदारीची गरज आहे. संघाचे दोन सर्वात अनुभवी फलंदाज सध्या क्रीजवर आहेत. शेवटचा विश्वचषक खेळणाऱ्या कर्णधार मिताली राजसोबत हरमनप्रीत कौर मैदानावर आहे.

स्मृती मंधानाही बाद

भारताने दोन धावांत दोन विकेट गमावल्या. पाकिस्तानी संघ आता या सामन्यात पुनरागमन करत आहे. अनम अमीनने 75 चेंडूत 52 धावा करणाऱ्या स्मृती मंधानाचा झेल घेतला. 

स्मृती मंधानाचे अर्धशतक होताच दीप्ती शर्मा बाद

स्मृती मानधनाने कारकिर्दीतील 21 वे अर्धशतक झळकावले, मात्र पुढच्याच चेंडूवर दीप्ती शर्मा (40 धावा) क्लीन बोल्ड झाली. दीप्ती चांगली खेळत होती, पण स्विंग शॉटमुळे संधूने क्लीन बोल्ड केले. 22 षटकात भारताची धावसंख्या : 96/2

स्मृती मंधाना आणि दीप्ती यांच्या दमदार फलंदाजी, भारताच्या 50 धावा पूर्ण

स्मृती मंधाना आणि दीप्ती या फलंदाजी करत असून त्यांनी 50 धावा पूर्ण केल्या आहेत.

भारताची खराब सुरुवात, शेफाली वर्मा खाते न उघडता बाद

भारताने पाकिस्तानविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. डायना बेगने भारताला पहिला धक्का दिला. तिसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर त्याने शेफाली वर्माला क्लीन बोल्ड केले. शेफालीला खाते उघडता आले नाही. 

पार्श्वभूमी

IND vs PAK Women World Cup LIVE Score : भारत आणि पाकिस्तान (भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामना) कोणत्याही खेळात समोरासमोर आले तरी संपूर्ण जगाच्या नजरा त्याकडेच असतात. विशेषत: जेव्हा सामना विश्वचषकातील असतो, तेव्हा त्याची उत्कंठा शिगेला असते. भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा मैदानावर आमने-सामने येणार असून यावेळी दोन्ही देशांच्या महिला एकमेकांविरुद्ध मैदानात उतरतील. सध्या सुरु असलेल्या महिला विश्वचषक 2022 (Womens world cup 2022) स्पर्धेत भारत पहिलाच सामना पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. एकदिवसीय विश्वचषक सामन्यात आज दोन्ही संघ एकमेकांशी भिडत आहेत. या सामन्यात भारताने पाकिस्तानविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.


न्यूझीलंडमध्ये सुरु असलेल्या महिला विश्वचषक 2022 स्पर्धेला 4 मार्चपासून सुरुवात झाली आहे. आता भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश स्पर्धेची सुरुवात एकमेकांविरुद्ध पहिला सामना खेळत करणार आहेत. दोन्ही देशांतील क्रिकेटप्रेमी या सामन्याची आतुरतेने वाट पाहत असून अनेकांनी या सामन्याबाबत ट्वीट केलं आहे. पुरुष संघाचा माजी कर्णधार विराटनेही महिला संघाला चिअर करण्यासाठी ट्वीट केलं होतं.


या स्पर्धेतील दोन्ही संघांचा हा पहिलाच सामना आहे. त्यामुळे दोन्ही संघ विजयाने सुरुवात करण्याचा प्रयत्न करतील. जर आपण आकडेवारी आणि इतिहास पाहिला तर भारत वरचढ आहे. कारण पुरुषांप्रमाणेच पाकिस्तान महिला संघाला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला पराभूत करता आलेले नाही.


कसा पाहाल सामना?


हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्क या चॅनेलवर पाहता येणार आहे. तसंच हॉटस्टार या अॅपवरही हा सामना पाहता येईल.


भारतीय संघ:


मिथाली राज (कर्णधार), तानिया भाटीया (यष्टीरक्षक), झुलन गोस्वामी, हरमनप्रीत कौर, स्मृती मंधाना, पूनम यादव, राजेश्वरी गायकवाड, दीप्ती शर्मा, स्नेह राणा, मेघना सिंह, पुजा वस्त्रकर, रेणुका सिंह, शेफाली वर्मा, रिचा घोष, यस्तीका भाटीया.


पाकिस्तान संघ


 जावेरिया खान, सिद्रा अमीन, बिस्मा मारूफ (कर्णधार), ओमामा सोहेल, निदा दार, आलिया रियाझ, फातिमा सना, सिद्रा नवाज (विकेटकीपर), डायना बेग, नशरा संधू, अनम अमीन



 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.