IND vs PAK Women World Cup LIVE Score : भारतीय महिला संघाचा पाकिस्तानवर 107 धावांनी दणदणीत विजय
IND vs PAK Women World Cup LIVE Score : भारत विरुद्ध पाकिस्तान महिला टी-20 वर्ल्ड कप सामना, पाहा सामन्या संदर्भातील लाईव्ह अपडेट एका क्लिकवर...
abp majha web teamLast Updated: 06 Mar 2022 07:17 AM

पार्श्वभूमी
IND vs PAK Women World Cup LIVE Score : भारत आणि पाकिस्तान (भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामना) कोणत्याही खेळात समोरासमोर आले तरी संपूर्ण जगाच्या नजरा त्याकडेच असतात. विशेषत: जेव्हा सामना...More
IND vs PAK Women World Cup LIVE Score : भारत आणि पाकिस्तान (भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामना) कोणत्याही खेळात समोरासमोर आले तरी संपूर्ण जगाच्या नजरा त्याकडेच असतात. विशेषत: जेव्हा सामना विश्वचषकातील असतो, तेव्हा त्याची उत्कंठा शिगेला असते. भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा मैदानावर आमने-सामने येणार असून यावेळी दोन्ही देशांच्या महिला एकमेकांविरुद्ध मैदानात उतरतील. सध्या सुरु असलेल्या महिला विश्वचषक 2022 (Womens world cup 2022) स्पर्धेत भारत पहिलाच सामना पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. एकदिवसीय विश्वचषक सामन्यात आज दोन्ही संघ एकमेकांशी भिडत आहेत. या सामन्यात भारताने पाकिस्तानविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.न्यूझीलंडमध्ये सुरु असलेल्या महिला विश्वचषक 2022 स्पर्धेला 4 मार्चपासून सुरुवात झाली आहे. आता भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश स्पर्धेची सुरुवात एकमेकांविरुद्ध पहिला सामना खेळत करणार आहेत. दोन्ही देशांतील क्रिकेटप्रेमी या सामन्याची आतुरतेने वाट पाहत असून अनेकांनी या सामन्याबाबत ट्वीट केलं आहे. पुरुष संघाचा माजी कर्णधार विराटनेही महिला संघाला चिअर करण्यासाठी ट्वीट केलं होतं.या स्पर्धेतील दोन्ही संघांचा हा पहिलाच सामना आहे. त्यामुळे दोन्ही संघ विजयाने सुरुवात करण्याचा प्रयत्न करतील. जर आपण आकडेवारी आणि इतिहास पाहिला तर भारत वरचढ आहे. कारण पुरुषांप्रमाणेच पाकिस्तान महिला संघाला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला पराभूत करता आलेले नाही.कसा पाहाल सामना?हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्क या चॅनेलवर पाहता येणार आहे. तसंच हॉटस्टार या अॅपवरही हा सामना पाहता येईल.भारतीय संघ:मिथाली राज (कर्णधार), तानिया भाटीया (यष्टीरक्षक), झुलन गोस्वामी, हरमनप्रीत कौर, स्मृती मंधाना, पूनम यादव, राजेश्वरी गायकवाड, दीप्ती शर्मा, स्नेह राणा, मेघना सिंह, पुजा वस्त्रकर, रेणुका सिंह, शेफाली वर्मा, रिचा घोष, यस्तीका भाटीया.पाकिस्तान संघ जावेरिया खान, सिद्रा अमीन, बिस्मा मारूफ (कर्णधार), ओमामा सोहेल, निदा दार, आलिया रियाझ, फातिमा सना, सिद्रा नवाज (विकेटकीपर), डायना बेग, नशरा संधू, अनम अमीन
भारतीय महिला संघानं पाकिस्तानला चारली धूळ, 107 धावांनी दणदणित विजय
भारतीय महिला संघाने पाकिस्तान संघाला चांगलीच धूळ चारली आहे. भारताने 107 धावांनी पाकिस्तानवर दणदणित विजय मिळवला आहे.