नवी दिल्ली : भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका 2-2 अशा बरोबरीत सुटली आहे. कसोटी मालिकेत चागंली कामगिरी केल्यानंतर भारत आता आशिया कप स्पर्धेत खेळणार आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वात भारतीय क्रिकेट टीम आशिया कपमध्ये सहभागी होईल. आशिया कप स्पर्धा 9 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर दरम्यान पार पडेल. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 14 सप्टेंबरला होणार आहे. आशिया कप स्पर्धा दुबई आणि अबू धाबीत पार पडणार आहे.
आशिया कपची पहिली मॅच 9 सप्टेंबरला अफगाणिस्तान विरुद्ध हाँककाँग यांच्यामध्ये होईल, ही मॅच अबू धाबीमध्ये होईल. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना दुबईतील मैदानावर 14 सप्टेंबरला होणार आहे. भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ सुपर 4 राऊंडमध्ये पोहोचल्यास 21 सप्टेंबरला दोन्ही संघ पुन्हा आमने सामने येतील. याशिवाय दोन्ही संघ फायनलमध्ये पोहोचल्यास चाहत्यांसाठी ती पर्वणी ठरु शकते. फायनल 28 सप्टेंबरला होणार आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर भारतानं केलेलं ऑपरेशन सिंदूर यामुळं दोन्ही देशांमधील तणाव वाढला होता. आशियाई क्रिकेट काऊन्सिलनं आशियाा कप स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केलं होतं, त्यानुसार स्पर्धा पार पडणार आहे. मात्र, आशिया कप स्पर्धा संयुक्त अरब अमिरातमध्ये होईल.
आशिया कप किती संघ खेळणार?
आशिया कप स्पर्धेत 8 संघ खेळणार आहेत. आशियाई क्रिकेट काऊन्सिलचे 5 पूर्णवेळ सदस्य देश अफगाणिस्तान, बांगलादेश, भारत, पाकिस्तान, श्रीलंका या देशांशिवाय संयुक्त अरब अमिरात, ओमान आणि हाँगकाँगचा समावेश असेल. स्पर्धेचे ग्रुप आणि फॉरमॅट यापूर्वीच्या मालिकेपेक्षा वेगळे असतील. आठ संघ चार चार च्या दोन गटात विभागले जातील. प्रत्येक गटातील दोन प्रमुख संघ सिंगल सुपर फोर राऊंडसाठी पात्र ठरतील. यामध्ये दोन्ही गटातील पहिल्या दोन संघात सामना होणार आहे. त्यामुळं भारत आणि पाकिस्तान यांच्यात पुन्हा सामना होऊ शकतो.
अ गट : भारत, पाकिस्तान, संयुक्त अरब अमिरात,ओमानब गट : श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान हाँगकाँग
आशिया कप 2025 – संपूर्ण वेळापत्रक (ग्रुप स्टेज) (Asia Cup 2025 Full Schedule)9 सप्टेंबर – अफगाणिस्तान विरुद्ध हाँगकाँग10 सप्टेंबर – भारत विरुद्ध यूएई11 सप्टेंबर – बांगलादेश विरुद्ध हाँगकाँग12 सप्टेंबर – पाकिस्तान विरुद्ध ओमान13 सप्टेंबर – बांगलादेश विरुद्ध श्रीलंका14 सप्टेंबर – भारत विरुद्ध पाकिस्तान 15 सप्टेंबर – यूएई विरुद्ध ओमान15 सप्टेंबर – श्रीलंका विरुद्ध हाँगकाँग16 सप्टेंबर – बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान17 सप्टेंबर – पाकिस्तान विरुद्ध यूएई18 सप्टेंबर – श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान19 सप्टेंबर – भारत विरुद्ध ओमानसुपर-4 आणि अंतिम सामना20 सप्टेंबर – बी1 विरुद्ध बी221 सप्टेंबर – ए1 विरुद्ध ए2 (भारत विरुद्ध पाकिस्तान मॅच शक्य)23 सप्टेंबर – ए2 विरुद्ध बी124 सप्टेंबर – ए1 विरुद्ध बी225 सप्टेंबर – ए2 विरुद्ध बी226 सप्टेंबर – ए1 विरुद्ध बी128 सप्टेंबर – अंतिम सामना (भारत विरुद्ध पाकिस्तान मॅच शक्य)