India vs Pakistan Asia Cup 2023 Match Fans Reaction : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पावासामुळे रद्द झाला. भारताने प्रथम फलंदाजी करताना 266 धावांपर्यंत मजल मारली होती. पाकिस्तानच्या फलंदाजीवेळी पावसाने हजेरी लावली. पावसाने विश्रांतीही घेतली नाही. त्यामुळे सामना रद्द करावा लागला. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडला. इरफान पठाण याने केलेले ट्वीट चर्चेचा विषय आहे. 'बहुत सारे पड़ोसियों के टीवी बच गए...' असे ट्वीट इरफान पठाण याने करत पाकिस्तानच्या चाहत्यांना छेडले. 
 
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना रद्द झाल्यानंतर क्रिकेट चाहत्यांची साफ निराशा झाली. काही चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. यामध्ये भारताचा माजी खेळाडू इरफान पठाण याचे ट्विटही व्हायरल होत आहे.






























































भारतासाठी करो या मरोची स्थिती - 


भारताने प्रथम फलंदाजी करत पाकिस्तानसमोर 267 धावांचे आव्हान दिले होते. पण पावसामुळे रंगाचा बेरंग झाला अन् सामना रद्द करावा लागला. आता भारताकडे एक गुण झाला आहे. सुपर 4 मध्ये प्रवेश करण्यासाठी भारताला नेपाळविरोधात विजय अनिवार्य आहे. भारतीय संघाने नेपाळचा पराभव केला अथवा पावसामुळे सामना रद्द झाला तरच भारताचे आशिया चषकातील आव्हान कायम राहणार आहे. नेपाळने जर भारताचा पराभव केला तर भारताचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल. 


हार्दिक-इशानने डाव सावरला -


पाकिस्तानच्या वेगवान तिकडीसमोर भारतीय फलंदाजांची भंबेरी उडाली. भारतीय संघ संपूर्ण 50 षटके फलंदाजीही करु शकला नाही. शहीन आफ्रिदी, हॅरिस रौफ आणि नसीम शाह यांनी भारताच्या दहा फलंदाजांना तंबूत धाडले. भारतीय संघाने 48.5 षटकात 266 धावांपर्यंत मजल मारली. इशान किशन आणि हार्दिक पांड्या यांच्या अर्धशतकी खेळीमुळे भारतीय संघ सन्मानजनक धावसंख्यापर्यंत पोहचलाय. इशान किशन याने 82 तर हार्दिक पांड्याने 87 धावांची खेळी केली.