IND vs NED Warm-up Match World Cup 2023 : विश्वचषकाच्या रनधुमाळीला तीन दिवसांत सुरुवात होईल. त्याआधी सराव सामने सुरु आहेत. मंगळवारी भारत आणि नेदरलँड्स यांच्यामध्ये सराव सामना होत आहे. भारताचा पहिला सराव सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्यामुळे विश्वचषकाआधी भारतीय संघाकडे सराव करण्याची ही अखेरची संधी असेल. भारत आणि नेदरलँड्स यांच्यामध्ये 12 वर्षांनतर सामना होत आहे. 


भारत आणि नेदरलँड्स यांच्यामध्ये आतापर्यंत तीन सामने झाले आहेत. यामध्ये दोन एकदिवसीय आणि एक टी20 सामना आहे. भारत आणि नेदरलँड्स यांच्यामध्ये पहिला वनडे सामना 2003 मध्ये झाला होता. या सामन्यात भारताने 68 धावांनी विजय मिळवला होता. तर दुसरा आणि अखेरचा वनेड सामना 2011 मध्ये झाला होता. हा सामना भारताने पाच विकेट्सने जिंकला होता. हा सामना दिल्लीमध्ये पार पडला होता. आता 12 वर्षांनंतर हे दोन्ही संघ वनडेमध्ये आमनेसामने आले आहेत. 


भारत आणि नेदरलँड्स या संघामध्ये एक टी 20 सामनाही झाला होता. ऑक्टोबर 2022 मध्ये दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात भारताने 56 धावांनी बाजी मारली होती. नेदरलँड्सच्या संघाला आतापर्यंत भारताविरोधात एकाही सामन्यात विजय मिळवता आला नाही. विश्वचषकात नेदरलँड्सचा संघ कशी कामगिरी करतो.. काही मोठा उलटफेर करतो का? याकडे सर्वांचे लक्ष लागलेय.


नेदरलँड्सविरोधात भारताकडून सर्वाधिक धावा युवराज सिंहच्या नावावर आहेत. युवराजने दोन सामन्यात 88 धावा केल्या आहेत. यामध्ये एका अर्धशतकाचा समावेश आहे. त्यासुपऱ्या क्रमांकावर सचिन तेंडुलकरचा क्रमांक लागतो. सचिन तेंडुलकरने 79 धावा केल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकावर रनमशीन विराट कोहली आहे. कोहलीने दोन सामन्यात 74 धावा केल्यात, यामध्ये एक वनडे आणि एक टी20 सामना आहे. 


कधी आहे सामना ?


भारत आणि नेदरलँड्स यांच्यातील वॉर्म-अप सामना आज, म्हणजेच  3 ऑक्टोबर रोजी, मंगळवारी होणार आहे. भारतीय वेळेनुसार, दुपारी दोन वाजता सामन्याला सुरुवात होईल.


कुठे होणार सामना ?


भारत आणि नेदरलँड्स यांच्यातील वॉर्म-अप सामना  ग्रीनफील्ड इंटरनेशनल स्टेडियम, तिरुवनंतपुरम होणार आहे. 


टिव्हीवर कुठे पाहाल सामना ?


भारत आणि नेदरलँड्स यांच्यामध्ये होणारा सराव सामना स्टार स्पोर्ट्स चॅनलवर पाहता येणार आहे. 


मोफत कुठे पाहल सामना ?


भारत आणि नेदरलँड्स यांच्यातील वॉर्म-अप सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग डिज्नी प्लस हॉटस्टारवर केले जाणार आहे. मोबाइल वापरकर्ते हा सामना मोफत पाहू शकतील. 



वर्ल्ड कपसाठी भारताचे स्क्वाड 


रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, ईशान किशन, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, शार्दुल ठाकुर


नेदरलँड्स


स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार), मॅक्स ओ’डौड, बास डी लीड, विक्रम सिंग, तेजा निदामनुरु, पॉल व्हॅन मीकेरेन, कॉलिन एकरमन, रोएलॉफ व्हॅन डर मर्व्ह, लोगन व्हॅन बीक, आर्यन दत्त, रायन क्लेन, वेस्ली बॅरेसी, साकिब झुल्फिकार, शरीझ अहमद आणि सीब्रँड एंजेलब्रेच.


5 ऑक्टोबरपासून विश्वचषकाचा शुभारंभ  - 


5 ऑक्टोबर रोजी क्रिकेटच्या महाकुंभाला सुरुवात होणार आहे. गतविजेता इंग्लंड आणि उपविजेता न्यूझीलंड यांच्यात सलामीची लढत होणार आहे. 19 नोव्हेंबर रोजी महाअंतिम सामना रंगणार आहे. विश्वचषकाचा पहिला आणि अखेरचा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर रंगणार आहे. भारत आणि पाकिस्तान हा हायहोल्टेज सामनाही अहमदाबाद येथेच होणार आहे. यंदाचा विश्वचषक दहा संघामध्ये राऊंड रॉबिन पद्धतीने होणार आहे. प्रत्येक संघाचे कमीतकमी नऊ सामने होणार आहेत. त्यानंतर आघाडीच्या चार संघामध्ये सेमीफायनलचे सामने होणार आहेत. 19 नोव्हेंबर रोजी मेगा फायनल होणार आहे.