IND vs NED LIVE Score: ऑरेंज आर्मीविरोधात रोहितसेना आज मैदानात, लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर

India vs Netherlands LIVE Score : विश्वचषकाच्या रणांगणात भारतीय संघाचं उपांत्य फेरीचं तिकीट कन्फर्म झालंय. उपांत्य फेरीत भारताची गाठ न्यूझीलंडशी पडणार, हेही पक्कं झालंय.

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क Last Updated: 12 Nov 2023 09:29 PM
रोहित शर्माने घेतली विकेट

नेदरलँड्सचा 160 धावांनी पराभव

नेदरलँड्सला बुमराहचा धक्का

नेदरलँड्सला बुमराहचा धक्का

नेदरलँड्सला आठवा धक्का

नेदरलँड्सला आठवा धक्का

नेदरलँड्सला सातवा धक्का

कुलदीप यादवने नेदरलँड्सला दिला सातवा धक्का

सिराजच्या खात्यात दुसरं यश

मोहम्मह सिराजच्या खात्यात दुसरी विकेट जमा झाली आहे. त्याने सायब्रँड एनगलब्रीचेंटला बाद केलं. 

नेदरलँड्सला चौथा धक्का

जसप्रीत बुमराहने नेदरलँड्सला दिला पाचवा धक्का

नेदरलँड्सला तिसरा धक्का

नेदरलँड्सला तिसरा धक्का बसलाय. जाडेजाने घेतली विकेट्स

नेदरलँड्सला दुसरा धक्का

कुलदीप यादवने नेदरलँड्सला दिला दुसरा धक्का.... Colin Ackermann  बाद झालाय. 

नेदरलँड्सची शानदार सुरुवात

नेदरलँड्सच्या संघाने 411 धावांचा पाठलाग करताना शानदार सुरुवात केली. 10 षटकात एक विकेट्सच्या मोबदल्यात 62 धावा केल्या आहेत.

नेदरलँड्सला पहिला धक्का

नेदरलँड्सला पहिला धक्का बसलाय, सिराजने घेतली विकेट

भारताचा 410 धावांचा डोंगर

IND Vs NED, Innings Highlights : श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांच्या धडाकेबाज शतकाच्या बळावर भारताने 410 धावांचा डोंगर उभारला. बेंगलोरच्या मैदानावर भारतीय फलंदाजांनी चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. भारताने निर्धारित 50 षटकात चार विकेट्सच्या मोबदल्यात 410 धावा उभारल्या. राहुल आणि अय्यरने शतके ठोकली. तर रोहित शर्मा, शुभमन गिल आणि विराट कोहली याने अर्धशतके ठोकली. भारताच्या फलंदाजांनी 50 षटकात 16 षटकार आणि 37 चौकार लगावले.  नेदरलँड्सला विजयासाठी 411 धावांचे आव्हान आहे.

केएल राहुल बाद

केएल राहुल बाद... शतकी खेळीनंतर राहुल बाद झाला. 

राहुल-अय्यरमध्ये द्विशतकी भागिदारी

राहुल-अय्यरमध्ये द्विशतकी भागिदारी

अय्यरपाठोपाठ राहुलचेही शतक

श्रेयस अय्यरच्या शानदार शतकानंतर केएल राहुल यानेही धडाकेबाज शतक ठोकले. राहुलने 61 चेंडूत तीन षटकार आणि 11 चौकारांच्या मदतीने शतक झळकावले. भारताची धावसंख्या 400 पार... यंदाच्या विश्वचषकातील केएल राहुलचे पहिले शतक

श्रेयस अय्यरचे विश्वचषकातील पहिले शतक

श्रेयस अय्यरने यंदाच्या विश्वचषकातील पहिले शतक ठोकले. अय्यरने 84 चेंडूत दोन षटकार आणि आठ चौकाराच्या मदतीने शतक ठोकले. 

केएल राहुलचे अर्धशतक

केएल राहुलने अर्धशतक ठोकले. राहुलने 40 चेंडूत अर्धशतक ठोकले.  

राहुल-श्रेयस यांच्यामध्ये शतकी भागिदारी

राहुल-श्रेयस यांच्यामध्ये शतकी भागिदारी..85 चेंडूत केल्या 103 धावा

भारताचे त्रिशतक

भारतीय संघाने 41.4 षटकात 300 धावांचा टप्पा पार केला. 

आघाडीच्या चार फलंदाजांची अर्धशतक

विश्वचषकात पहिल्यांदाच आघाडीच्या चार फलंदाजांनी अर्धशतके ठोकली.  हा विक्रम भारताच्या नावावर जमा झालाय. रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी अर्धशतके ठोकली आहेत. केएल राहुलही अर्धशतकाच्या जवळ पोहचलाय.

केएल राहुल-अय्यरची जोडी जमली

श्रेयस अय्यर आणि केएल राहुल जोडीने भारताची धावसंख्या वाढवली आहे. अय्यरची शतकाकडे वाटचाल

अय्यरचे अर्धशतक

श्रेयस अय्यरचे अर्धशतक... विराट, गिल आणि रोहित शर्मा यांच्यानंतर श्रेयस अय्यरनेही अर्धशतक ठोकले. अय्यरने विश्वचषकातील चौथे अर्धशतक ठोकले. 

भारताचे द्विशतक

विराट कोहली, शुभमन गिल आणि रोहित शर्माच्या अर्धशतकांच्या बळावर भारताने 200 धावांचा टप्पा पार केलाय.

भारताला तिसरा धक्का

विराट कोहलीच्या रुपाने भारताला तिसरा धक्का बसलाय. विराट कोहली 51 धावांवर बाद झाला. 

विराट कोहलीचे अर्धशतक

विराट कोहलीचे अर्धशतक... 51 चेंडूत अर्धशतक ठोकले. त्याशिवाय यंदाच्या विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा फलंदाजही झालाय.

IND vs NED LIVE Score : भारताला दुसरा धक्का, रोहित शर्मा बाद

IND vs NED LIVE Score : भारताला दुसरा धक्का बसला आहे. कर्णधार रोहित शर्मा 61 धावांवर बाद झाला.

IND vs NED LIVE Score: रोहित-गिलची स्फोटक फलंदाजी

रोहित शर्मा आणि शुभमन गिलची स्फोटक फलंदाजी पाहायला मिळत आहे. 10 षटकांनंतर टीम इंडियाची धावसंख्या 92 धावांवर शून्य गडी बाद आहे.


 

रोहित-गिलची वादळी सुरुवात

रोहित-गिल यांनी वादळी सुरुवात केली आहे. नेदरलँड्सच्या गोलंदाजांचा धुरळा उडवला

भारताची फलंदाजी सुरु

रोहित शर्मा आणि शुभमन गिल मैदानात... भारताच्या फलंदाजीला सुरुवात

भारतीय संघात कोणताही बदल नाही

अखेरच्या साखळी सामन्यात भारताने प्लेईंग 11 मध्ये कोणताही बदल केला नाही 

भारताची प्रथम फलंदाजी

रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. 

रोहित शर्माने नाणेफेक जिंकली

रोहित शर्माने नाणेफेक जिंकली

नेदरलँड्सचा संभाव्य प्लेइंग-11 

मॅक्स ओ'डॉड, वेस्ली बरासी, कॉलिन एकरमन, सिब्रांड एंजेलब्रेक्ट, स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार), बास डी लीडे, तेजा नदामानुरु, लोगान व्हॅन बीक, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, आर्यन दत्त, पॉल व्हॅन मीकरेन.

संभाव्य टीम इंडिया : 

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव/आर अश्विन, जसप्रीत बुमराह/प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.

थोड्याच वेळात होणार नाणेफेक

थोड्याच वेळात होणार नाणेफेक...   

पार्श्वभूमी

IND vs NED, World Cup 2023 : विश्वचषकाच्या रणांगणात भारतीय संघाचं उपांत्य फेरीचं तिकीट कन्फर्म झालंय. उपांत्य फेरीत भारताची गाठ न्यूझीलंडशी पडणार, हेही पक्कं झालंय. पण त्या नॉकआऊट सामन्याच्या पूर्वतयारीसाठी भारतीय संघाला एका सामन्यात खेळण्याची संधी मिळणार आहे. विश्वचषक साखळीतल्या या सामन्यात भारतासमोर नेदरलँड्सचं आव्हान आहे. वन डे क्रिकेटच्या दुनियेत नेदरलँड्स हा कच्चा लिंबू मानला जात असला तरी याच संघानं दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशला हरवलंय, ते विसरता येणार नाही.


विश्वचषकाच्या रणांगणात भारताचा अखेरचा साखळी सामना आज नेदरलँड्सशी होतोय. हा सामना बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवण्यात येईल. भारतानं लागोपाठ आठ सामन्यांमध्ये विजय मिळवून विश्वचषकाच्या गुणतालिकेत अव्वल स्थान तर पटकावलंच, पण विश्वचषकाच्या उपांत्य फेरीचं पहिलं तिकीटही कन्फर्म केलंय. विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारताची गाठ न्यूझीलंडशी पडणारंय. पण त्या नॉकआऊट सामन्याआधी भारतीय संघाला आणखी एका साखळी सामन्यात खेळण्याची संधी मिळणार आहे. या सामन्यात भारतासमोर नेदरलँड्सचं आव्हान आहे. वन डे क्रिकेटच्या दुनियेत नेदरलँड्स हा कच्चा लिंबू मानला जात असला तरी विश्वचषकाच्या साखळीत याच संघानं दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशसारख्या बलाढ्य संघांना हरवलंय, ते विसरता येणार नाही. त्यामुळं आठ सामन्यांमध्ये त्या दोन विजयांसह नेदरलँड्स गुणतालिकेत तळाच्या स्थानावर आहे. पण त्याच नेदरलँडविरुद्ध सामन्याचा आपल्या उणीवा दूर करण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न राहिल.


विश्वचषक 2023 मधील शेवटचा लीग सामना
आजचा सामना नेदरलँड्ससाठी महत्त्वाचा आहे. नेदरलँडचा संघ विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतून बाहेर पडला असून त्यांच्यासाठी हा सामना 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्र ठरण्याचा शेवटचा मार्ग आहे. हा सामना जिंकल्यास नेदरलँड्स बांगलादेशला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी मागे टाकू शकतो. तर, विश्वचषक 2023 मध्ये भारतीय संघाने आधीच अंतिम-4 मध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे आजचा टीम इंडियासाठी उपांत्य फेरीचा सराव सामना असेल. 


भारताविरुद्ध सामना जिकणं नेदरलँड्ससाठी गरजेचं
विश्वचषक 2023 मध्ये पाकिस्तान व्यतिरिक्त टॉप-7 संघांना चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये खेळण्याची संधी मिळेल. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चं यजमानपदाचा पाकिस्तानकडे असल्याने त्यांनी आधीच या स्पर्धेत प्रवेश केला आहे. सध्या पॉइंट टेबलमध्ये नेदरलँड्स शेवटच्या स्थानावर आहे. त्यामुळे संघाला आजचा सामना कोणत्याही किंमतीवर जिंकावाच लागेल. 









भारतीय संघ उपांत्य फेरीपूर्वी कोणताही प्रयोग करणार नसल्याचं, प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं होतं. पण, या सामन्याकडे उपांत्य फेरीचा सराव सामना म्हणून पाहिल्यास काही खेळाडूंना विश्रांती देण्याची शक्यता आहे.. टीम इंडिया आज जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादव यांना विश्रांती देऊ शकते आणि प्लेइंग-11 मध्ये प्रसिद्ध कृष्णा आणि आर अश्विनला संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव/आर अश्विन, जसप्रीत बुमराह/प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.


नेदरलँड्सचा संभाव्य प्लेइंग-11 
मॅक्स ओ'डॉड, वेस्ली बरासी, कॉलिन एकरमन, सिब्रांड एंजेलब्रेक्ट, स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार), बास डी लीडे, तेजा नदामानुरु, लोगान व्हॅन बीक, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, आर्यन दत्त, पॉल व्हॅन मीकरेन.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.