India vs Ireland 1st T20: भारत (India) आणि आयर्लंड (Ireland) टी20 मालिकेकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलं आहे. आजपासून भारत आणि आयर्लंड  यांच्यातील टी20 मालिकेला सुरुवात होणार आहे. आयर्लंड दौऱ्यावर टीम इंडियाच्या (Team India) सिनियर खेळाडूंना आराम देण्यात आलाय. या मालिकेत युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वात भारताचे कोणते शिलेदार मैदानात उतरणार ? याकडे लक्ष लागलेय. 


युवा खेळाडूंना संधी - 


आयर्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियात युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. रिंकू सिंह, यशस्वी जयस्वाल आणि जितेश शर्मा यांना चांगल्या कामगिरीचं बक्षीस मिळाले आहे. या खेळाडूंना आयर्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियात स्थान मिळाले आहे. त्याशिवाय मुकेश कुमार आणि शाहबाज अहमद, शिवम दुबे यांनाही संधी देण्यात आली आहे.


रिंकू सिंहला पदार्पणाची संधी मिळणार?


टीम इंडियाने आयर्लंड दौऱ्यासाठी रिंकू सिंहला संधी दिली आहे. त्याला प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे. रिंकूने सोशल मीडियावर टीम इंडियाच्या जर्सीमधील फोटो शेअर केले आहेत. टीम इंडियासोबतच्या सरावादरम्यानचे हे फोटो आहेत. रिंकूने इंस्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे, यामध्ये तो टीम इंडियाच्या जर्सीमध्ये दिसत आहे आणि त्याच्या हातामध्ये बॅट आहे.


भारताची संभाव्य प्लेईंग 11 : 


ऋतुराज गायकवाड, यशस्वी जयसवाल, संजू सॅमसन (विकेटकीपर), तिलक वर्मा, रिंकू सिंह, शिवम दुबे, वाशिंगटन सुंदर, जसप्रीत बुमराह (कर्णधार), रवि बिश्नोई, अर्शदीप सिंह, मुकेश कुमार



आयर्लंडची संभाव्य प्लेईंग 11 :


 एंड्रयू बालबर्नी, पॉल स्टर्लिंग (कर्णधार), लोर्कन टकर, हॅरी टेक्टर, जॉर्ज डॉकरेल, गॅरेथ डेलानी, कर्टिस कँपर, मार्क अडायर, जोशुआ लिटिल, बॅरी मॅक्कार्थी, बेंजामिन व्हाइट


भारत आणि आयर्लंड मालिका
भारत आणि आयर्लंड यांच्यामध्ये तीन सामन्याची टी 20 मालिका खेळवण्यात येणार आहे. भारत आणि आयर्लंड टी-20 मालिका शुक्रवारपासून सुरु होत आहे. 18 ऑगस्ट रोजी डबलिन येथे पहिला टी20 सामना खेळवण्यात येणार आहे. 20 ऑगस्ट रोजी दुसरा आणि 23 ऑगस्ट रोजी तिसरा टी20 सामना रंगणार आहे. 


 सिनिअर खेळाडूंना आराम -
18 ऑगस्टपासून आयर्लंड दौऱ्याला सुरुवात होणार आहे. भारतीय संघ आयर्लंडविरुद्ध तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. दुसरा ट्वेंटी-ट्वेंटी सामना 20 ऑगस्ट रोजी खेळवला जाईल. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना 23 ऑगस्ट रोजी होणार आहे. आशिया चषकाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने आयर्लंड दौऱ्यात सर्व मोठ्या खेळाडूंना विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पांड्या, जडेजा, सूर्यकुमार यादव, शुभमन गिल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, सिराज हे मोठे खेळाडू या मालिकेत खेळताना दिसणार नाहीत.