Ind vs Eng Oval Test Day 5 weather report : भारत आणि इंग्लंड यांच्यात ओव्हलमध्ये सुरू असलेल्या पाचव्या कसोटी सामन्यात सध्या कमालीचा थरार पाहायला मिळत आहे. सामन्याच्या चौथ्या दिवशीच निकाल लागेल, अशा आशेने अनेक क्रिकेटप्रेमी मैदानात जमले होते. मात्र, शेवटच्या क्षणी पावसाने हजेरी लावून सगळ्यांच्याच अपेक्षांवर विरजण घातलं. इंग्लंडला विजयासाठी फक्त 35 धावांची गरज असतानाच पावसाने हस्तक्षेप केला. सुरुवातीला पंचांनी खेळ थांबवला आणि नंतर दिवसाचा खेळ संपवण्यात आला. ओव्हलमध्ये पावसाचा अंदाज आधीच वर्तवण्यात आला होता आणि त्यामुळे पाचव्या दिवशीचा खेळही संकटात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पहिले सत्र निर्णायक ठरणार?
सोमवारी, 4 ऑगस्ट रोजी लंडनमध्ये पावसाचा जोर अपेक्षित आहे. मात्र, हवामान खात्यांच्या अंदाजानुसार दुपारी 1 वाजेपर्यंत पावसाची शक्यता कमी आहे. याचा अर्थ असा की सकाळच्या सत्रात दोन्ही संघांना सामना आणि मालिका संपवण्याची संधी मिळू शकते. Weather चा अंदाज आहे की पाऊस लंच ब्रेक दरम्यान, म्हणजे स्थानिक वेळेनुसार 1 वाजता सुरू होऊ शकतो. पहिल्या सत्रात ढगाळ वातावरणात राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवीन चेंडू आणि दमदार वातावरण भारतीय गोलंदाजांसाठी फायदेशीर ठरू शकते.
AccuWeather चाही असा अंदाज आहे की दुपारपर्यंत पाऊस येणार नाही. पण एकदा का दुपार झाली की 2 वाजेनंतर पावसाची शक्यता 60 टक्क्यांपर्यंत वाढू शकते. दरम्यान, अजून एका अहवालानुसार थोडी निराशा वाढवणारी माहिती दिली आहे. त्यांच्या अंदाजानुसार सकाळी 11 वाजेपर्यंत 40% आणि 12 वाजेपर्यंत 60% पावसाची शक्यता आहे. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सतत पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
भारताला विजयासाठी लागणार फक्त 4 विकेट
भारत सध्या मालिकेत 1-2 ने पिछाडीवर आहे. त्यामुळे ओव्हल कसोटी जिंकून मालिका 2-2 ने बरोबरीत आणण्याची सुवर्णसंधी टीम इंडियासमोर आहे. चाहत्यांचे लक्ष आता भारतीय गोलंदाजांवर आहे, जे इंग्लंडचे उरलेले चार विकेट्स घेत सामना जिंकतील. पावसाच्या पूर्वीचा वेळ निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. आता पाहायचं इतकंच की निसर्ग साथ देतो का आणि टीम इंडिया इतिहास रचतो का?'
हे ही वाचा -