Ind Vs Eng 3rd Test Live Update : तिसऱ्या कसोटीत टीम इंडियाचा दणदणीत विजय

भारत आणि इंग्लंड संघांमधल्या तिसऱ्या कसोटी सामन्याला आजपासून अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर सुरुवात होत आहे. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतली ही कसोटी दिवसरात्र खेळवण्यात येत आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 25 Feb 2021 08:05 PM
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंडमधील तिसऱ्या कसोटीत टीम इंडियाचा दणदणीत विजय
इंग्लंडला पाचवा झटका, अक्षर पटेलने जो रूट माघारी धाडलं, जो रूटची 19 धावांची खेळी, इंग्लंडने 55 धावांवर पाच विकेट्स गमावले.
टीम इंडियाच्या गोलंदाजांची पुन्हा एकदा कमाल; 75 धावांत इंग्लंडचे सात गडी माघारी
इंग्लंडचा 9 वा गडीही माघारी, अक्षर पटेल डे-नाईट टेस्टमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज
145 धावांवर ऑलआउट झाल्यानंतर टीम इंडियाने पलटवार केला आहे. इंग्लंडने झिरोवर ही आपले दोन विकेट गमावले आहेत. जॅक क्रॉली आणि जॉनी बेयरस्टो यांनी आपलं खातंच उघडलं नाही.
134 धावांवर भारताचा 9वा विकेट पडला. अश्विन 17 धावांवर आऊट झाला. त्यालाही जो रूटने पवेलियनमध्ये पाठवलं. रूटचा हा चौथा विकेट आहे.
145 धावांवर टीम इंडिया ऑलआउट, केवळ 33 धावांमध्ये गमावले शेवटचे सात विकेट्स
भारत आणि इंग्लंड संघांमधल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी वर्चस्व गाजवलं. इंग्लंडचा पहिला डाव 112 धावांवर गडगडला असून अक्षर पटेलने सहा तर अश्विनने तीन विकेट्स घेतल्या.
इंग्लंडला नववा धक्का बसला असून अक्षरच्या पाचवी विकेट मिळाली आहे. इंग्लंडची धावसंख्या नऊ विकेट्च्या बदल्यात 105 झाली आहे
इंग्लंडला आठवा धक्का बसला असून अश्विनच्या चेंडूवर लीच बाद झाला आहे. इंग्लंडची धावसंख्या आता आठ गड्यांच्या बदल्यात 98 झाली आहे.
इंग्लंडला सातवा धक्का बसला असून अक्षर पटेलच्या चेंडूवर जोफ्रा आर्चर बाद झाला आहे. इंग्लंडची धावसंख्या आता सात गड्यांच्या बदल्यात 93 झाली आहे.

इंग्लंडला सहावा धक्का बसला असून अक्षर पटेलच्या चेंडूवर स्ट्रोक्स बाद झाला आहे. इंग्लंडची धावसंख्या आता सहा गड्यांच्या बदल्यात 81 झाली आहे.
इंग्लंडला पाचवा धक्का बसला असून अश्विनच्या चेंडूवर पोप बोल्ड झाला. इंग्लंडची धावसंख्या आता पाच गड्यांच्या बदल्यात 81 झाली आहे.
चहापाणाच्या वेळेपर्यंत इंग्लंडची धावसंख्या चार गड्याच्या बदल्यात 81 झाली आहे.
इंग्लंडला चौथा धक्का बसला असून अक्षर पटेलने क्रावलीला बाद केलंय. इंग्लंडची धावसंख्या आता चार गड्याच्या बदल्यात 80 झाली आहे.
इंग्लंडला तिसरा धक्का बसला असून अश्विनने रुटला बाद केलंय. रुटने 37 चेंडूत 17 धावा केल्या. इंग्लंडची धावसंख्या आता तीन गड्याच्या बदल्यात 75 झाली आहे.

क्रॉलीने इशांतच्या एका चेंडूवर एक चौकार आणि एक षटकार मारला आहे. या वेळी त्यांनी कव्हरवर चौकार मारला. हा त्याचा आठवा चौकार आहे. त्याने 42 धावा केल्या आहेत. इंग्लंडच्या सध्या दोन विकेट्सच्या बदल्यात 57 धावा झाल्या आहेत.
बेयरस्टो आऊट झाल्यानंतर कर्णधार जो रुट फलंदाजी करण्यासाठी मैदानावर उतरला. आठ ओव्हर्सनंतर इंग्लंडचा स्कोअर 29 धावांवर दोन विकेट घेतले आहेत. क्रॉली 23 आणि रूट दोन धावांवर बँटिंग करत आहे.
27 धावांवर इंग्लंडचा दुसरा खेळाडू माघारी परतला आहे. जॉनी बेयरस्टो एकही धाव न घेताच माघारी परतला. अक्षरल पटेलने एलबीडब्ल्यू करत बेयरस्टोला माघारी धाडलं.
इंग्लंडचा टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय
इंडिया प्लेइंग ११: रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा.
इंग्लंड प्लेइंग 11: जॅक क्रॉली, डोम सिब्ली, जॉनी बेअरस्टो, जो रूट (कर्णधार), बेन स्टोक्स, ओली पोप, बेन फॉक्स (विकेटकीपर), जोफ्रा आर्चर, जॅक लीच, स्टुअर्ट ब्रॉड, जेम्स अँडरसन.

पार्श्वभूमी

IND v ENG 3rd Test Match : भारत आणि इंग्लंड संघांमधल्या तिसऱ्या कसोटी सामन्याला आजपासून अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर सुरुवात होत आहे. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतली ही कसोटी दिवसरात्र खेळवण्यात येत आहे. या स्टेडिअमचे उद्घाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते होणार आहे. गृहमंत्री अमित शाह आणि बीसीसीआयचे अनेक अधिकारी या वेळी उपस्थित राहणार आहे.

भारतानं चेन्नईची दुसरी कसोटी जिंकून या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. भारताचा वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा अहमदाबादमध्ये कारकिर्दीतल्या कसोटी सामन्यांचं शतक साजरं करणार आहे. भारत-इंग्लंड संघांमधली तिसरी कसोटी ही त्याच्या कारकीर्दीतली शंभरावी कसोटी आहे. भारताच्या वेगवान गोलंदाजांमध्ये कपिलदेव सर्वाधिक 131 कसोटी सामन्यांमध्ये खेळला असून, त्याखालोखाल ईशांतच्या नावावर 99 कसोटी आहेत.

भारत आणि इंग्लंड संघांमधल्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या निमित्तानं अहमदाबादच्या मोटेराचे स्टेडियममध्ये पहिलावहिला आंतररराष्ट्रीय सामना खेळवण्यात येईल. या स्टेडियमची प्रेक्षकक्षमता एक लाख दहा हजार असून, कोरोनामुळं तिसऱ्या कसोटीसाठी 50 टक्के प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश देण्यात येणार आहे.

अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियम 700 कोटींहून अधिक खर्च करुन बांधले आहे. यामध्ये 1,10,000 प्रेक्षक बसण्याची क्षमता आहे. मेलबर्न क्रिकेट ग्राउंड स्टेडियम तयार करणार्‍या कंपनीने हे स्टेडियम डिझाइन केले आहे. यात 76 कॉर्पोरेट बॉक्स, चार ड्रेसिंग रूम आणि तीन सराव मैदाने आहेत. स्टेडियम व्यतिरिक्त, इनडोअर क्रिकेट अॅकाडमी व्यतिरिक्त जलतरण तलाव, स्क्वॅश आणि टेबल टेनिसची सुविधा आहे.

मोटेराचे स्टेडियम नव्यानेच तयार केले आहे. आतापर्यंत येथे फक्त काही टी -20 सामने खेळले गेले आहेत. गुजरात क्रिकेट असोसिएशनच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, टी 20 सामन्यात फक्त 40 षटकांचा खेळ होतो आणि त्यानुसार खेळपट्टी कशी आहे याचा अंदाज लावणे कठीण असते.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.