Team India Probable 11 for Rajkot Test, IND vs ENG: टीम इंडिया (Team India) आणि इंग्लंड (England) कसोटी मालिकेतील उर्वरित तीन सामन्यांसाठी बीसीसीआयनं (BCCI) टीम इंडियाचा संघ जाहीर केला आहे. आगामी तीन सामन्यांसाठीही विराट कोहली (Virat Kohli) संघात नाही. वैयक्तिक कारणांमुळे तो हे तीन सामने खेळणार नाही, अशी माहिती बीसीसीआयच्या वतीनं देण्यात आली आहे. श्रेयसला दुखापतीमुळे संघात स्थान मिळालेलं नाही. याव्यतिरिक्त त्याचा कसोटी क्रिकेटचा फॉर्मही डळमळीत झाला आहे.
रवींद्र जाडेजा आणि केएल राहुल संघात परतले आहेत, पण त्यांच्या खेळण्यावर सस्पेंस कायम आहे. फिटनेस क्लिअरन्सनंतरही दोघेही संघात खेळणार की नाही, हे निश्चित होईल. अशा परिस्थितीत दोघे खेळतील की, नाही, हे निश्चित नाही. जाडेजा आणि राहुलला दुखापतीमुळे विशाखापट्टणम येथील दुसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर राहावं लागलं होतं. दोघांच्या पुढच्या तीन सामन्यांत खेळण्यावरही प्रश्नचिन्ह कायम आहे. अशा परिस्थितीत टीम इंडियाची प्लेईंग 11 कशी असेल, याचा पुन्हा एकदा कर्णधार रोहित शर्माला विचार करावा लागेल.
इंग्लंडविरुद्धच्या उर्वरित 3 कसोटी सामन्यांसाठी टीम इंडियाचा स्क्वॉड
रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, केएल राहुल*, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), आर अश्विन, रवींद्र जाडेजा*, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप.
रोहित संघात फारशी छेडछाड करत नाही
जर आपण रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या पॅटर्नकडे पाहिलं तर ते सहसा संघात जास्त छेडछाड करणं टाळतात. 2023 चा विश्वचषक हा त्याचा पुरावा होता. अशा परिस्थितीत विशाखापट्टणम कसोटी संघातील बहुतांश खेळाडू राजकोट कसोटीतही दिसू शकतात. विशाखापट्टणममधील दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग-11 मध्ये रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकिपर), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह यांचा समावेश होता. आता श्रेयस अय्यर दुखापतीमुळे यातून बाहेर आहे. रवींद्र जाडेजा आणि केएल राहुल (फिट असल्यास) येण्याची शक्यता आहे.
दुसरी शक्यता अशी आहे की, दुसऱ्या कसोटीत तुलनेनं कमी प्रभावी ठरलेला मुकेश कुमार बाहेर जाण्याची शक्यता आहे. मुकेशला दोन डावांत एकच विकेट मिळाली. मुकेशच्या जागी मोहम्मद सिराज पुन्हा एकदा संघात दाखल होऊ शकतो. अशा परिस्थितीत आकाश दीपला पुन्हा एकदा पदार्पणाची वाट पाहावी लागणार आहे, असं दिसतंय
रजत पाटीदारच्या जागी टीम इंडिया सर्फराजलाही आजमावू शकते. पाटीदारनं विशाखापट्टणम कसोटीत पदार्पण केलं. त्यानं पहिल्या डावांत 32 आणि दुसऱ्या डावांत 9 धावा केल्या. याशिवाय रवींद्र जाडेजा फिट असल्यास अक्षर पटेलही बाहेर बसू शकतो. अक्षरनं विशाखापट्टणम कसोटीत एकूण 18 ओव्हर्स टाकले आणि त्याला 2 विकेट्स घेतलेत. दुसऱ्या डावांत कसोटीच्या दृष्टिकोनातून तो खूपच महागडा खेळाडू ठरला आणि त्यानं 14 षटकांत 75 धावा दिल्या.
राजकोट कसोटीत अशी असू शकते टीम इंडियाची प्लेइंग 11
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, रजत पाटीदार/सरफराज खान, केएल राहुल (जर फिट असला तर), केएस भरत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल/रवींद्र जाडेजा (फिट असेल तर), कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह.
टीम इंडिया Vs इंग्लंड टेस्ट सीरीजचं शेड्यूल
- 1st टेस्ट : 25-29 जानेवारी, हैदराबाद (इंग्लंड 28 धावांनी विजय)
- 2nd टेस्ट : 2-6 फेब्रुवारी, विशाखापट्टनम (टीम इंडियाचा 106 धावांनी विजय)
- 3rd टेस्ट : 15-19 फेब्रुवारी, राजकोट
- 4th टेस्ट : 23-27 फेब्रुवारी, रांची
- 5th टेस्ट : 7-11 मार्च, धर्मशाला
महत्त्वाच्या इतर बातम्या :