IND vs ENG 1st T20 : अभिषेक शर्मा ठरला हिरो! भारताने इंग्लंडचा सात विकेट्सने केला पराभव, मालिकेत घेतली आघाडी

India vs England 1st T20I Updates : सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ 2025 मध्ये पहिल्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात इंग्लंडविरुद्ध खेळत आहे.

किरण महानवर Last Updated: 22 Jan 2025 10:03 PM
IND vs ENG 1st T20 : अभिषेक शर्मा ठरला हिरो! भारताने इंग्लंडचा सात विकेट्सने केला पराभव, मालिकेत घेतली आघाडी

सलामीवीर अभिषेक शर्माच्या धमाकेदार खेळीच्या जोरावर, भारताने पहिल्या टी-20 सामन्यात इंग्लंडचा सात विकेट्सने पराभव केला आणि पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.

IND vs ENG 1st T20I Live : टीम इंडियाच्या विजयाकडे वाटचाल

अभिषेक शर्माच्या तुफानी खेळीच्या जोरावर भारतीय संघ विजयाकडे वाटचाल करत आहे. 11 षटकांनंतर भारताची 2 बाद 116 धावा आहेत आणि विजयासाठी 54 चेंडूत आणखी 16 धावांची आवश्यकता आहे.  

IND vs ENG 1st T20I Live : अभिषेकचे अर्धशतक

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात सलामीवीर अभिषेक शर्माने शानदार कामगिरी केली आणि अवघ्या 20 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. भारताने सॅमसन आणि सूर्यकुमारच्या विकेट लवकर गमावल्या, पण अभिषेकने आक्रमक फलंदाजी सुरू ठेवली आणि भारताची धावसंख्या 90 धावांच्या पुढे नेली.

IND vs ENG 1st T20I Live : टीम इंडियाला लागोपाठ दोन धक्के, संजू सॅमसननंतर कर्णधार सूर्या 0 धावांवर आऊट

वेगवान गोलंदाज आर्चरने भारताला दुसरा धक्का दिला आहे. सॅमसनला आऊट केल्यानंतर आर्चरने भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवला पॅव्हेलियनमध्ये पाठवले, जो खाते न उघडताच बाद झाला.

IND vs ENG 1st T20I Live : 4,4,6,4,4.... संजू सॅमसनने घातला धुमाकूळ, दुसऱ्याच षटकात ठोकल्या इतक्या धावा

संजू सॅमसनने घातला धुमाकूळ आहे. त्याने पहिल्या षटकात फक्त 1 धाव घेतली, पण दुसऱ्या षटकात चौकार आणि षटकारचा पाऊस पाडला. दुसऱ्या षटकात सॅमसनने एकूण 22 धावा केल्या, त्यादरम्यान त्याने 4 चौकार आणि 1 षटकार मारला.

IND vs ENG 1st T20I Live : अर्शदीप अन् वरुणच्या 'चक्रवर्ती'मध्ये फसले इंग्रज! भारतासमोर 133 धावांचे लक्ष्य

इंग्लंडने पहिला टी-20 सामना जिंकण्यासाठी भारतासमोर 133 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्तीच्या नेतृत्वाखालील भारतीय गोलंदाजांनी शानदार कामगिरी करत इंग्लंडचा संघ 20 षटकांत 132 धावांवर आटोपला. इंग्लंडकडून कर्णधार जोस बटलरने अर्धशतक झळकावले आणि 44 चेंडूत आठ चौकार आणि दोन षटकारांसह 68 धावा केल्या. इंग्लंडच्या फक्त तीन फलंदाजांना दुहेरी आकडा गाठता आला आणि बटलरशिवाय इतर कोणताही फलंदाज प्रभावित करू शकला नाही.


या सामन्यासाठी भारताने अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचा प्लेइंग-11 मध्ये समावेश केला नव्हता, परंतु अर्शदीप सिंगने जबाबदारी घेतली आणि सुरुवातीला पाहुण्या संघाला दोन धक्के देऊन भारताला चांगली सुरुवात करून दिली. यासह, अर्शदीप आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज बनला.

IND vs ENG 1st T20I Live : वरुण चक्रवर्तीने बटलरची घेतली विकेट

इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरचा आऊट झाला आहे, त्याने 44 चेंडूत आठ चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 68 धावा केल्या. इंग्लंडने 109 धावांवर आठवी विकेट गमावली. या सामन्यात वरुणने चार षटकांच्या स्पेलमध्ये 23 धावा देत तीन विकेट्स घेतल्या.

IND vs ENG 1st T20I Live : इंग्लंडला सहावा धक्का

अक्षर पटेलने जेमी ओव्हरटनला बाद करून इंग्लंडला सहावा धक्का दिला. चार चेंडूत दोन धावा काढून ओव्हरटन बाद झाला. 

IND vs ENG 1st T20I Live : इंग्लंडचा अर्धा संघ परतला पॅव्हेलियनमध्ये 

हार्दिक पांड्याने जेकब बेथेलला आऊट करून इंग्लंडला पाचवा धक्का दिला आहे. अशाप्रकारे, इंग्लंडचा अर्धा संघ 83धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. हार्दिकची या सामन्यातील ही पहिली विकेट आहे.  

IND vs ENG 1st T20I Live : अर्शदीपनंतर वरुण चक्रवर्तीचा धमाका! आठव्या षटकात इंग्लंड संघाला चौथ्या धक्का

अर्शदीपनंतर वरुण चक्रवर्तीने पुन्हा एकदा शानदार गोलंदाजी करून इंग्लंड संघाला अडचणीत आणले आहे. आठवे षटक टाकण्यासाठी आलेल्या वरुणने तीन चेंडूत दोन विकेट घेतल्या.

IND vs ENG 1st T20I Live : अर्शदीपने इंग्लंडला दिला दुसरा धक्का, साल्टनंतर बेन डकेटलाही धाडले तंबुत

भारतीय वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने आपली चमकदार कामगिरी सुरू ठेवत इंग्लंडला आणखी एक धक्का दिला. पहिल्याच षटकात साल्टला बाद करणाऱ्या अर्शदीपने बेन डकेटला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्याने चार चेंडूत चार धावा काढल्या. यासह, अर्शदीप आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज बनला आहे आणि त्याने फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलला मागे टाकले आहे. या फॉरमॅटमध्ये अर्शदीपने आतापर्यंत भारतासाठी 97  विकेट्स घेतल्या आहेत,    

IND vs ENG 1st T20I Live : पहिल्याच षटकात इंग्लंडला जोरदार धक्का, अर्शदीपने खाते न उघडता साल्टला धाडले तंबुत

वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने पहिल्याच षटकात इंग्लंडला जोरदार धक्का दिला आहे. यष्टीरक्षक फिल साल्ट खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. अर्शदीपच्या चेंडूवर सॉल्टने शॉट मारण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू मागे गेला आणि सॅमसनने झेल घेतला.

IND vs ENG 1st T20I Live : जाणून घ्या इंग्लंडची प्लेइंग-11

बेन डकेट, फिल साल्ट (यष्टीरक्षक), जोस बटलर (कर्णधार), हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, जेमी ओव्हरटन, गस अ‍ॅटकिन्सन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, मार्क वूड.

IND vs ENG 1st T20I Live : जाणून घ्या टीम इंडियाची प्लेइंग-11

अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती.

IND vs ENG 1st T20I Live : पहिल्या टी-20 सामन्यात सूर्याने जिंकली नाणेफेक! शमीला मिळाली नाही जागा; जाणून घ्या प्लेइंग-11

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यासाठी अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचा प्लेइंग-11 मध्ये समावेश केला जाईल असे मानले जात होते, परंतु या सामन्यासाठी त्याला संघात स्थान देण्यात आलेले नाही, त्यामुळे भारतीय संघात त्याच्या पुनरागमनाची प्रतीक्षा वाढली आहे.

पार्श्वभूमी

India vs England 1st T20I Cricket Score : टी-20 मालिकेतील पहिल्याच सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने फक्त 132 धावा केल्या, जे टीम इंडियासाठी खूपच कमी होते. अभिषेक शर्माने स्फोटक फलंदाजी करत टीम इंडियाला टी-20 मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. अभिषेक शर्माने फक्त 34 चेंडूत 79 धावा केल्या, ज्यामध्ये त्याने 8 षटकार आणि 5 चौकार मारले. अभिषेक शर्माने फक्त 20 चेंडूत अर्धशतक झळकावले जे त्याच्या भारतातील टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील सर्वात जलद अर्धशतक आहे.


अर्शदीप-चक्रवर्तीही चमकले


अभिषेक शर्माच्या आधी गोलंदाजांनी आपली ताकद दाखवली. विशेषतः अर्शदीप सिंग आणि वरुण चक्रवर्ती यांनी शानदार गोलंदाजी केली. अर्शदीप सिंगने 4 षटकांत फक्त 17 धावा देत 2 विकेट घेतल्या. वरुण चक्रवर्तीने 4 षटकांत 23 धावा देत 3 बळी घेतले. हार्दिक पांड्या आणि अक्षर पटेल यांनीही चांगली गोलंदाजी केली आणि प्रत्येकी 2 बळी घेतले. इंग्लंडकडून फक्त जोस बटलरने चांगली कामगिरी केली, त्याने 68 धावा केल्या. तथापि, या कामगिरीचा कोणताही विशेष फायदा झाला नाही कारण इंग्लंडला फक्त 132 धावाच करता आल्या. टीम इंडियाने हा सामना 43 चेंडू आधीच जिंकला, जो चेंडूंच्या बाबतीत इंग्लंडविरुद्धचा सर्वात मोठा विजय आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.