IND vs BAN, 1st Test: तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका गमावल्यानंतर भारतीय संघ बांगलादेशसोबत (India vs Bangladesh) दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना 14-18 डिसेंबरदरम्यान खेळला जाईल. एकदिवसीय मालिका गमवल्यानंतर भारतीय संघ कसोटी मालिकेत बांगलादेशच्या संघाला पराभवाची धुळ चारण्यासाठी मैदानात उतरणार आहे. दरम्यान, भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना कधी, कुठं खेळला जाणार आहे? तसेच या सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग कुठं पाहता येईल? याबाबत जाणून घेऊयात.

कधी, कुठं पाहायचा सामना?भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना 14-18 डिसेंबर दरम्यान रोजी खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार, सकाळी 9. 30 वा सामन्याला सुरूवात होईल. त्यापूर्वी अर्धातास आधी नाणेफेक होणार आहे.  हा बांगलादेशच्या चटोग्राम येथील झहूर अहमद चौधरी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्याचे लाईव्ह टेलिकास्ट सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच सोनी लिव (Sony Liv) अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला सामन्याचे प्रत्येक लाईव्ह अपडेट्स पाहता येतील.  

बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय संघात अनेक बदलभारत आणि बांगलादेश यांच्यात येत्या 14 डिसेंबरपासून दोन सामन्याची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेपूर्वी भारतीय संघात मोठा बदल करण्यात आलाय. कर्णधार रोहित शर्मा दुखापतीमुळं पहिल्या कसोटी सामन्यातून बाहेर पडलाय. या सामन्यात केएल राहुलकडं नेतृत्व सोपवण्यात आलंय. याशिवाय, मोहम्मद शामी , रवींद्र जाडेजा मालिकेतून बाहेर पडलाय. त्यांच्याऐवजी नवदीप सैनी आणि सौरभ कुमारला संघात स्थान देण्यात आलंय. बीसीसीआयच्या निवड समितीनं वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटचाही कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात समावेश केलाय.

भारत-बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेचं वेळापत्रकभारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिली कसोटी 14 ते 18 डिसेंबर दरम्यान झहूर अहमद चौधरी स्टेडियम येथे खेळवली जाणार आहे. तर दुसरी आणि अंतिम कसोटी 22 ते 26 डिसेंबर दरम्यान ढाका येथील मीरपूर येथील शेर-ए-बांगला स्टेडियमवर खेळवली जाईल. या स्टेडियममध्ये तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेचे सामने खेळले गेले होते, ज्यामध्ये भारताला 2-1 नं पराभवाचा सामना करावा लागला.

भारताचा कसोटी संघ:केएल राहुल (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकिपर), केएस भरत (विकेटकिपर), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, उमेश यादव, अभिमन्यू, नवदीप सैनी, सौरभ कुमार, जयदेव उनादकट.

बांगलादेश संघ:शकीब अल हसन (कर्णधार), महमुदुल्लाह, लिटन दास, खालिद अहमद, नजमुल हुसेन शांतो, नुरुल हसन, इबत हुसेन, मोमिनुल हक, मेहंदी हसन मिर्झा, शरीफुल इस्लाम, यासिर अली, तैजुल इस्लाम, झाकीर हसन, मुशफिकर रहिम , तस्किन अहमद, रेहमान रझा, अनामूल हक.

हे देखील वाचा-