IND vs AUS WTC Final 2023 LIVE : भारताचा पराभव, दुसऱ्यांदा चषकाची हुलकावणी

WTC Final 2023, IND vs AUS : टीम इंडिया (Team India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) संघांमधली जागतिक कसोटी (World Test Championship Finals) विजेतेपदाची फायनल सुरु झाली आहे.

एबीपी माझा ब्युरो Last Updated: 11 Jun 2023 05:15 PM

पार्श्वभूमी

WTC Final 2023, IND vs AUS : टीम इंडिया (Team India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) संघांमधली जागतिक कसोटी (World Test Championship Finals) विजेतेपदाची फायनल सुरु झाली आहे.  टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया...More

टीम इंडियाला पुन्हा एकदा अपयश

टीम इंडियाला पुन्हा एकदा जागतिक कसोटी विजेतेपदाच्या गदेवर आपलं नाव कोरण्यात अपयश आलं. लंडनच्या ओव्हल मैदानात खेळवण्यात आलेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा 209 धावांनी पराभव केला. या सामन्यात ऑस्ट्रेलियानं टीम इंडियाला विजयासाठी 444 धावांचं आव्हान दिलं होतं. विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेनं चौथ्या विकेटसाठी रचलेल्या 86 धावांच्या भागिदारीनं भारताच्या आव्हानात धुगधुगी कायम राखली होती. पण स्कॉट बोलँडनं विराट कोहली आणि रवींद्र जाडेजाला लागोपाठच्या चेंडूंवर माघारी धाडून टीम इंडियाची पाच बाद 179 अशी बिकट अवस्था केली. मग मिचेल स्टार्कनं अजिंक्य रहाणेला माघारी धाडलं. त्या तीन धक्क्यांमधून न सावरलेला भारताचा डाव 234 धावांवर आटोपला. आणि ऑस्ट्रेलियानं जागतिक कसोटी विजेतेपदाच्या गदेवर आपलं नाव कोरलं.