India vs Australia :  ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या तिसऱ्या कसोटीत ४०७ धावांच्या भल्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग भारतीय संघ चौथ्या डावात करत होता. भारताचे तीन फलंदाज माघारी परतले असताना ऋषभ पंत आणि चेतेश्वर पुजारा जोडीने चांगली खेळी केली. ऋषभ पंतने तडाखेबाज खेळी करत भारताला सुस्थितीत आणतं विजयाच्या आशा पल्लवीत केल्या.


ऋषभ पंत आणि चेतेश्वर पुजारा फलंदाजीसाठी मैदानावर असताना ऑस्ट्रेलियचा फलंदाज स्टीव्ह स्मिथचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या धुमाकूळ घालतोय. यावेळी स्टीव्ह स्मिथने जे केलं ते पाहून सर्व स्तरांतून त्याच्यावर टीका होतं आहे. या व्हिडीओमध्ये ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथ भारतीय फलंदाज ऋषभ पंतचा गार्ड (क्रीज मार्क) मिटवताना दिसत आहे.  दरम्यान गार्ड (क्रीज मार्क) म्हणजे फलंदाजीसाठी पायाने करून ठेवलेल्या खुणा. शेवटच्या दिवशी पहिल्या सत्रात स्टंपच्या कॅमेऱ्यात स्मिथला पंतचा गार्ड मिटवतानाचं दृष्य रोकॉर्ड झाले आहे.


India vs Australia, Sydney Test Records: 41 वर्षांनंतर टीम इंडियाने चौथ्या डावात खेळल्या 110 ओव्हर्स; आणखी काही रेकॉर्ड्सची नोंद


जेव्हा ड्रिंक्स ब्रेक झाला तेव्हा पंत आणि पुजारा पाणी पिण्यासाठी बाजूला निघून गेले. त्यावेळी खेळपट्टीवर कोणी नसल्याचं पाहिल्यावर स्मिथ तेथे आला. त्याने आजूबाजूला पाहिलं आणि त्यानंतर ऋषभ पंतने क्रीजवर फलंदाजीसाठी करून ठेवलेला गार्ड पायाने पुसून टाकला. त्यामुळे पंतला खेळ सुरू झाल्यावर पुन्हा एकदा बॅटने पंचांच्या मदतीने गार्ड घेऊन त्या खुणा कराव्या लागल्या.


भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने घडलेल्या प्रकाराच व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आणि लिहिले आहे की, “सर्व काही करून पाहिले, स्मिथने पंतच्या क्रीज मार्कही पुसून टाकला,  पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. खाया पिया कुछ नहीं, ग्लास तोड़ा बारह आना. मला माझ्या भारतीय संघाच्या प्रयत्नाचा अभिमान आहे.”





BLOG : ये ड्रॉ जीत के बराबर है.

विहारी-अश्विनने सामना वाचवला, सिडनी कसोटी अनिर्णित


हनुमा विहारी आणि आर अश्विनच्या चिवट खेळीमुळे भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्धचा तिसरा कसोटी सामना अनिर्णित राखण्यात यश मिळवलं. आर अश्विनने 128 आणि हनुमा विहारीने 161 चेंडू खेळून काढले. त्यामुळे भारताने या सामन्यात पराभव टाळला. विशेष म्हणजे दुखापत होऊनही हनुमा विहारीने 161 चेंडू खेळला. हा सामना जिंकून मालिकेत आघाडी घेण्याच्या स्वप्नांवर विहारी आणि अश्विन यांनी विरजण टाकलं. परिणामी बॉर्डर-गावस्कर मालिकेत भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ 1-1 असे बरोबरीत आहेत.


रिषभ पंत आणि चेतेश्वर पुजाराच्या दमदार खेळीमुळे विजय दृष्टीक्षेपात होता. विजयासाठी 157 धावांची गरज असताना रिषभ पंत 97 धावांवर बाद झाला. त्यानंतर चेतेश्वर पुजारा 77 धावांवर माघारी परतला. त्यामुळे विजयाची आस लागलेल्या भारतीय संघाला हा सामना वाचवण्यासाठी धडपड करावी लागली. पराभव टाळण्यासाठी भारताला विकेट्स जाऊ न देता उर्वरित षटकं खेळून काढायची होती. हे काम हनुमा विहारी आणि आर अश्विनने फत्ते केलं.


सिडनीमध्ये ऐतिहासिक कसोटी सामना रंगला. भारताला दुसऱ्या डावात 132 चेंडूंमध्ये 407 धावांचं आव्हान मिळालं होतं. भारताने 131 षटकं फलंदाजी करत 5 विकेट्सच्या मोबदल्यात 338 धावा केल्या. हेमस्ट्रिंग इंज्युरी असतानाही हनुमा विहारीने 161 चेंडूंचा सामना करत 23 धावांची नाबाद खेळी रचली. त्याला आर अश्विननेही उत्तम साथ दिली आणि नाबाद 39 धावा केल्या. या दोघांनी 43 षटकं खेळून भारताला सिडनी कसोटीत पराभवापासून वाचवलं.


हनुमा विहारी आणि आर अश्विनने सहाव्या विकेटसाठी 259 चेंडूत 62 धावांची भागीदारी रचली. यामध्ये अश्विनने 39 धावांचं योगदान दिलं तर विहारीने 20 धावा केल्या. त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे या दोघांनी 43 पेक्षा जास्त षटकं खेळून काढली आणि सामना अनिर्णित केला.


व्हिडीओ पाहा : अखेर Sydney Test अनिर्णीत; अश्विन आणि विहारीची झुंजार फलंदाजी