India vs Australia ODI live Updates | ऑस्ट्रेलियाचा कर्णधार फिंचचं अर्धशतक, लाबुशने आणि स्मिथ माघारी परतल्यानंतर फिंचची आक्रमक खेळी

India vs Australia ODI live Updates : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामधील वनडे मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना आज कॅनबरामध्ये खेळवला जाणरा आहे. मालिकेतील पहिल्या दोन सामने गमावल्यानंतर भारतीय संघ तिसऱ्या सामन्यात मोठे बदल करण्याची शक्यता आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 02 Dec 2020 02:48 PM
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार फिंचचं अर्धशतक, लाबुशने आणि स्मिथ माघारी परतल्यानंतरृ फिंचची आक्रमक खेळी, हेन्रिकेजच्या साथीने सावरला संघाचा डाव
हार्दिक पांड्या- रविंद्र जाडेजाची धमाकेदार खेळी, टीम इंडियाचं ऑस्ट्रेलियासमोर 303 धावांचं आव्हान, हार्दिक नाबाद 92 तर जाडेजानं केल्या 66 धावा
एकूण शतकांच्या बाबतील विराट कोहली हा ऑस्ट्रेलियाच्या रिकी पॉन्टिंगचा विक्रम मोडू शकतो. पॉन्टिंगनं 560 सामन्यामध्ये 71 शतकं लगावली आहे. कोहली या विक्रमापासून एक शतक दूर आहे. जर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर कोहलीनं दोन शतकं केली तर तो पॉन्टिंगला मागे टाकू शकतो. कोहली या दौऱ्यात आणखी एक वनडे, तीन टी-20 आणि एक कसोटी सामना खेळणार आहे. या दोघांपेक्षा अधिक शतकं ही सचिनच्या नावे आहेत. सचिननं 664 सामन्यांमध्ये 100 शतकं लगावली आहेत.


टीम इंडियाला पाचवा धक्का, कर्णधार विराट कोहली 63 धावा बनवून आऊट, आता संघाची मदार हार्दिक पांड्यावर
विराट कोहली सध्या जगातील नंबर एकचा फलंदाज आहे. विराटच्या नावे सर्वात वेगवान 8000 धावा (175 इनिंगमध्ये), 9000 रन (194 इनिंगमध्ये), 10000 रन (205 इनिंगमध्ये) और 11000 रन (222 इनिंगमध्ये) करण्याचा विक्रम देखील आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु असलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहली नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. तिसऱ्या वनडेत 23 वी धाव घेताना विराटनं नवा इतिहास रचला. त्यानं एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक वेगानं 12 हजार धावा करण्याचा विक्रम केला आहे. मास्टर ब्लॉस्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम त्याने मोडला आहे. विराट कोहलीनं केवळ 242 इनिंगमध्ये 12 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. हा विक्रम आधी सचिनच्या नावे होता. सचिननं 300 इनिंगमध्ये 12 हजार धावा केल्या होत्या.
तिसऱ्या वनडेत 23 वी धाव घेताना विराटनं नवा इतिहास रचला. त्यानं एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक वेगानं 12 हजार धावा करण्याचा विक्रम केला आहे. मास्टर ब्लॉस्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम त्याने मोडला आहे. विराट कोहलीनं केवळ 242 इनिंगमध्ये 12 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. हा विक्रम आधी सचिनच्या नावे होता. सचिननं 300 इनिंगमध्ये 12 हजार धावा केल्या होत्या.

विराट कोहलीचं अर्धशतक, टीम इंडियाच्या चार विकेट्स, एका बाजूने विकेट पडत असताना विराटची संयमी खेळी, विराटच्या साथीला आला हार्दिक
भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्याला सुरुवात झाली असून भारताने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामधील वनडे मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना आज कॅनबरामध्ये खेळवला जाणरा आहे. मालिकेतील पहिल्या दोन सामने गमावल्यानंतर भारतीय संघ तिसऱ्या सामन्यात मोठे बदल करण्याची शक्यता आहे. तर ऑस्ट्रेलियाचा संघ देखील मालिका जिंकल्याने आपल्या काही खेळाडूंना विश्रांती देऊ शकतो.

पार्श्वभूमी

India vs Australia ODI live Updates : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामधील वनडे मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना आज कॅनबरामध्ये खेळवला जाणरा आहे. मालिकेतील पहिल्या दोन सामने गमावल्यानंतर भारतीय संघ तिसऱ्या सामन्यात मोठे बदल करण्याची शक्यता आहे. तर ऑस्ट्रेलियाचा संघ देखील मालिका जिंकल्याने आपल्या काही खेळाडूंना विश्रांती देऊ शकतो.


 


चहलच्या जागी कुलदीपला संधी मिळण्याची शक्यता


 


फिरकीपटू युजवेंद्र चहल ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दोन्ही सामन्यात अपयशी ठरल्याचं दिसलं. त्याने पहिल्या सामन्यात 10 षटकात 89 धावा दिल्या तर दुसऱ्या वन डेमध्ये 9 षटकात 71 धावा दिल्या होत्या. अशातच तिसऱ्या सामन्यात कर्णधार विराट कोहली त्याच्याऐवजी चायनामन गोलंदाज कुलदीप यादवला संधी देऊ शकतो. ऑस्ट्रेलियाविरुद्ध कुलदीपची कामगिरी चांगली आहे. त्याने वनडे क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध हॅटट्रिक घेतली आहे.


 


मयांकऐवजी शुभमनला संघात स्थान?


 


सलामीवीर फलंदाज मयांक अग्रवाल दोन्ही सामन्यात वेगाने धावा काढण्याच्या प्रयत्नात स्वस्तात माघारी परतला होता. पहिल्या वनडेमध्ये 22 धावा करणारा मयांकला दुसऱ्या सामन्यात 28 धावाच करता आल्या. चांगल्या सुरुवातीनंतरही मयांकला मोठी धावसंख्या उभारता आली आहे. त्यामुळे त्याच्याजागी शुभमन गिलला संधी मिळू शकते.


 


टी नटराजनला पदार्पणाची संधी मिळण्याची शक्यता


 


जलदगती गोलंदाज नवदीप सैनीही ऑस्ट्रेलियाविरुद्ध आतापर्यंत कमाल दाखवू शकला नाही. पहिल्या सामन्यात 10 षटकात 83 धावा देणाऱ्या सैनीने दुसरे वनडेत सात षटकांमध्येच तब्बल 70 धावा दिल्या होत्या. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात कर्णधार विराट कोहली सैनीऐवजी टी नटराजनला पदार्पणाची संधी देऊ शकतो. तसंच शार्दुल ठाकूरही सैनीला रिप्लेस करु शकतो.


 


ऑस्ट्रेलियाच्या संघातही मोठे बदलं?


 


मालिकेतील दोन सामन्यात विजय मिळवल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ तिसऱ्या वनडेमध्ये काही खेळाडूंना आराम देण्याची शक्यता आहे. डेव्हिड वॉर्नर दुखापतीमुळे या सामन्यात खेळू शकणार नाही. त्याच्यासोबतच मिशेल स्टार्क आणि पॅट कमिन्स यांनाही विश्रांती दिली जाऊ शकते. यांच्याऐवजी सीन अबॉट आणि डॅनियल सॅम्स यांना अंतिम अकरामध्ये संधी मिळू शकते.


 


भारताचा संभाव्य प्लेईंग इलेव्हन


 


शिखर धवन, मयांक अग्रवाल/शुभमन गिल, विराट कोहली (कर्णधार), श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, टी नटराजन, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह.


 


ऑस्ट्रेलियाचा संभाव्य प्लेईंग इलेव्हन


 


अॅरॉन फिन्च (कर्णधार), मॅथ्यू वेड, स्टीव स्मिथ, मार्नस लाबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, मोजेज हेन्रिक्स, अॅलेक्स कॅरी, सीन अबॉट, मिशेल स्टार्क, अॅडम जम्पा आणि जोश हेजलवूड.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.