India vs Australia 2nd T20 LIVE | भारताचा दुसऱ्या टी20 सामन्यात ऑस्ट्रेलियावर 6 विकेट्स राखून विजय. टी20 मालिकेत भारताची 2-0 अशी आघाडी.

India vs Australia 2nd T20 LIVE : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात आज दुसरा टी20 सामना खेळवण्यात येत आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 06 Dec 2020 05:36 PM

पार्श्वभूमी

India vs Australia 2nd T20 LIVE | एकदिवसीय सामन्यांच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका 1-2 असा पराभव झाल्यानंतर टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात 11 धावांनी विजय मिळवला. रविवारी सिडनी क्रिकेट ग्राउंडवर...More


भारताचा दुसऱ्या टी20 सामन्यात ऑस्ट्रेलियावर 6 विकेट्स राखून विजय. ऑस्ट्रेलियाने भारतासमोर विजयासाठी 195 धावांचं लक्ष ठेवलं होतं. भारतानं ते 4 विकेट्सच्या बदल्यात पार केलं.
या सामन्यासोबत भारतानं टी20 मालिकाही जिंकली. टी20 मालिकेत भारताने 2-0 अशी आघाडी घेतली आहे. भारताच्या वतीनं विराट कोहली आणि हार्दिक पांड्याची खेळी निर्णायक ठरली.