Australia vs India Test Series Schedule : भारतामध्ये सध्या आयपीएलचा (IPL 2024) रनसंग्राम सुरु आहे. भारतामध्ये प्रत्येक क्रिकेट चाहता याचा आनंद घेत आहे. स्टेडियमवर चाहत्यांची गर्दी होतेय. आयपीएलमध्ये भारतातील आणि विदेशातील खेळाडू आपला जलवा दाखवत आहेत. आयपीएलची रनधुमाळी सुरु असतानाच भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची घोषणा (Australia v India Test schedule) करण्यात आली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यामध्ये होणाऱ्या बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेची (Border-Gavaskar Trophy) घोषणा करण्यात आली आहे. यावेळीस या कसोटी मालिकेत पाच कसोटी सामने होणार आहेत. त्यामध्ये एका डे नाईट कसोटीचाही समावेश आहे. 22 नोव्हेंबरपासून भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला सुरुवात होणार आहे. तर 3 जानेवारी रोजी अखेरचा कसोटी सामना पार पडणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलिया भारताच्या दौऱ्याबाबत अधिकृत माहिती आणि वेळापत्रक जारी केले आहे.


32 वर्षानंतर पाच सामन्याची कसोटी मालिका - 


टीम इंडिया ऑस्ट्रेलियामध्ये 22 नोव्हेंबरपासून पाच सामन्याची कसोटी मालिका खेळणार आहे. तब्बल 32 वर्षांनंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये पाच सामन्याची कसोटी मालिका होणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये 1991-92 मध्ये अखेरची पाच सामन्याची कसोटी मालिका पार पडली होती. त्यानंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये चार सामन्याचीच कसोटी मालिका झाली. ऑस्ट्रेलियाचा संघ भारत दौऱ्यावर आला तरी चार सामन्याचीच कसोटी मालिका खेळत होता. 32 वर्षानंतर आता पाच सामन्याची कसोटी मालिका होणार आहे. 






डे नाईट कसोटी सामना - 


ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये भारतीय संघ डे नाईट कसोटी सामनाही खेळणार आहे. बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेत यंदा पिंक बॉल कसोटी सामनाही होणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये 6 डिसेंबर ते 10 डिसेंबर यादरम्यान डे नाईट कसोटी सामना होणार आहे. हा सामना ओव्हलवर खेळवला जाणार आहे. दरम्यान, भारतीय संघ पर्थ कसोटी सामन्याती ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात करणार आहे. 22 ते 26 नोव्हेंबर यादरम्यान पहिला कसोटी सामना होणार आहे. 


भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेचं वेळापत्रक Australia v India Test schedule


22 ते 26 नोव्हेंबर- पहिला कसोटी सामना, पर्थ (डे टेस्ट)


6 ते 10 डिसेंबर- दुसरा कसोटी सामना, अॅडिलेड ओव्हल (डे-नाइट टेस्ट)


14 ते 18 डिसेंबर- दिसरा कसोटी सामना, गाबा, ब्रिस्बेन (डे टेस्ट)


26 ते 30 डिसेंबर- चौथा कसोटी सामना, एमसीजी, मेलबर्न  (डे टेस्ट)


3 ते 7 जानेवारी- पाचवा कसोटी सामना, सिडनी  (डे टेस्ट)


मागील ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघाची कामगिरी कशी ?


भारतीय संघ 2020-21 मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर चार कसोटी सामन्यासाठी गेला होता. पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियानं आठ विकेटने विजय मिळवला होता. दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने आठ विकेटने विजय मिळवत कमबॅक केले होते. तिसरा कसोटी सामना ड्रॉ राहिला होता. चौथ्या कसोटी सामन्यात पंतच्या शानदार खेळीच्या बळावर भारताने 3 विकेटने विजय मिळवला होता. ही कसोटी मालिका भारताने 2-1 च्या फरकाने जिंकली होती.