बंगळुरु : टीम इंडियाचा प्रमुख बॅटसमन आणि आरसीबीचा माजी कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) यानं दोन महिन्यांच्या ब्रेकनंतर आयपीएल (IPL 2024) मध्ये कमबॅक केलं आहे.  विराट कोहली त्याच्या दुसऱ्या मुलाच्या जन्मावेळी पत्नी अनुष्का शर्मासोबत विदेशात होता. विराट कोहलीनं याबाबत वक्तव्य के आहे. विराट आणि अनुष्कानं काही दिवसांपूर्वी त्यांना मुलगा झाल्याची माहिती सोशल मीडियावर दिली होती. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी मुलाचं नाव अकाय ठेवलं होतं. विराट कोहलीनं दोन महिन्यांच्या काळात क्रिकेटपासून दूर होता तेव्हा कुठं होता त्याबाबत माहिती दिली. तो म्हणाला की अशा एका देशात होतो, जिथं त्याला कोणी ओळखत नव्हतं. 


आरसीबीनं पंजाब किंग्ज विरुद्ध मॅच जिंकल्यानंतर विराट कोहलीला प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कारानं गौरवण्यात आलं यावेळी तो बोलत होता. विराट म्हणाला, आम्ही देशात नव्हतो, अशा ठिकाणी होतो जिथं आम्हाला लोक ओळखत नव्हते. एक कुटुंब म्हणन वेळ सोबत घालवणं, दोन महिन्यांच्या काळासाठी सामान्य माणसाप्रमाणं जगण, माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी अविस्मरणीय अनुभव होता, असं कोहली म्हणाला. दोन मुलं असातना कौटुंबीक दृष्टिकोनातून गोष्टी बदलतात. तुम्ही रस्त्यावर दुसरी व्यक्ती बनून जगणं आणि तुम्हाला कोणी ओळखत नाही हे अद्भूत अनुभव आहे, असं विराट म्हणाला. 


विराट कोहलीचं कमबॅक


विराट कोहलीनं क्रिकेटपासून दोन महिने ब्रेक घेतला होता. दोन महिन्यांच्या ब्रेकनंतर विराट कोहली आयपीएलमध्ये सहभागी झाला आहे. कोहलीनं चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या मॅचमध्ये 21 धावा केल्या होत्या. पंजाब किंग्ज विरुद्धच्या मॅचमध्ये विराट कोहलीली जीवदान मिळालं. याच्या आधारे विराट कोहलीनं 49 बॉलमध्ये 77 धावा केल्या होत्या. विराटला या कामगिरीबद्दल प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. 


बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या मॅचमध्ये विराटनं 49 बॉलमध्ये 11 चौकार, 2 षटकारांच्या मदतीनं 77 धावांची खेळी कोली होती. यावेळी विराटचं स्टाइक रेट 157.14 इतकं होतं. दरम्यान, जूनमध्ये होणाऱ्या टी -20 वर्ल्ड कपमध्ये निवड होण्यासाठी विराटला आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करणं आवश्यक आहे.


विराट कोहलीच्या नावावर टी -20 मध्ये शंभर अर्धशतकांची नोंद 


विराट कोहलीनं पंजाब किंग्ज विरुद्धच्या मॅचमध्ये 77 धावा केल्या. टी-20 मध्ये शंभर अर्धशतकं करणारा विराट कोहली एकमेव भारतीय खेळाडू ठरला आहे. आयपीएलमध्ये विराट कोहलीनं 51 वं अर्धशतक पूर्ण केलं. विराटच्या नावावर टी-20  मध्ये 51अर्धशतकांची नोंद आहे. 


संबंधित बातम्या :


IPL Security Breach: आयपीएलच्या सुरक्षेत मोठी चूक, चाहता थेट मैदानात, विराट कोहलीला नमस्कार करुन कडकडून मिठी


Virat Kohli Video Calls : आरसीबीचा होम ग्राऊंडवर पहिला विजय, विराट कोहलीचं घरच्यांसोबत सेलिब्रेशन, अनुष्का शर्मासह मुलांना व्हिडीओ कॉल