India T20I squad vs South Africa : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 मालिकेला 9 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. पाच सामन्यांच्या या मालिकेसाठी टीम इंडियाचा स्क्वॉड जाहीर करण्यात आला असून काही महत्त्वाचे बदल पाहायला मिळाले आहेत.

Continues below advertisement

हार्दिक पांड्याची पुनरागमनासह टीम जाहीर (Hardik Pandya Returns)

टीममध्ये सर्वात मोठा बदल म्हणजे हार्दिक पांड्याची जोरदार पुनरागमन झाले आहे. आशिया कप 2025 दरम्यान झालेल्या दुखापतीमुळे तो बराच काळ बाहेर होता. मात्र, आता तो पूर्णपणे फिट झाला असून पुन्हा संघात परतला आहे. अलीकडेच सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये पंजाबविरुद्ध त्याने 42 चेंडूत 77 धावांची धडाकेबाज खेळी खेळली होती.

Continues below advertisement

शुभमन गिल स्क्वॉडमध्ये, पण फिटनेसची परीक्षा बाकी (Shubman Gill Participation Subject To Fitness )

शुभमन गिल या मालिकेच्या स्क्वॉडमध्ये असले तरी तो मैदानात उतरतील की नाही, हे त्याच्या फिटनेस रिपोर्टवर अवलंबून असेल. मानेच्या दुखापतीतून सावरत असलेला गिल खेळण्यास योग्य वाटल्यासच तो मालिकेसाठी पात्र ठरेल. कोलकाता येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान गिलला दुखापत झाली होती. यामुळे तो गुवाहाटीमधील दुसऱ्या कसोटी आणि सध्या सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेला मुकला होता.

रिंकू सिंग आणि नितीश रेड्डी बाहेर, सूर्याकडे नेतृत्वाची धुरा

या मालिकेत देखील टीम इंडियाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करणार आहेत. त्याच्या नेतृत्वाखाली युवा आणि अनुभवी अशा खेळाडूंचा संतुलित संघ मैदानात उतरणार आहे. पण टी-20 मालिकेसाठीच्या स्क्वॉडमधून रिंकू सिंग आणि नितीश कुमार रेड्डी यांना वगळण्यात आले आहे. सेलेक्शन कमिटीने त्यांना संघातून का बाहेर केले यांचे कारण सांगितले नाही.  

बुमराहचीही एन्ट्री

वनडे मालिकेत विश्रांती दिल्यानंतर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पुन्हा टी-20 संघात परतला आहे. त्याच्यासोबत अर्शदीप सिंग आणि हर्षित राणा ही वेगवान तिघे जबाबदारी सांभाळणार आहे.

टॉप ऑर्डर आणि मिडल ऑर्डर

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये चमकदार फॉर्ममध्ये असलेला अभिषेक शर्मा गिलसोबत सलामीला उतरेल. मधल्या फळीत तिलक वर्मा, शिवम दुबे आणि सूर्यकुमार यादव वर धावांची जबाबदारी असेल.

स्पिन विभाग आणि विकेटकीपर 

स्पिन विभागात कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती आणि वाशिंगटन सुंदर यांचा समावेश आहे. विकेटकीपर म्हणून संजू सॅमसन आणि जितेश शर्मा यांच्यावर विश्वास टाकण्यात आला आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ (Team India squad South Africa T20I series) - सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा, संजू सॅमसन, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा आणि वॉशिंग्टन सुंदर.

हे ही वाचा -

Virat Kohli : विराट कोहलीचं रेकॉर्ड ब्रेक शतक, अनुष्का शर्माकडून प्रेमाचा वर्षाव, कोच गंभीरची रिअ‍ॅक्शन व्हायरल, नेमकं काय केलं?