Ruturaj Gaikwad Century Ind vs Sa 2nd ODI : रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या वनडे सामना खेळला जात आहे. या सामन्यात ऋतुराज गायकवाडने आपल्या कारकिर्दीतील पहिले वनडे शतक ठोकत जोरदार पुनरागमन केलं. भारतीय संघाची परिस्थिती 2 बाद 62 अशी बिकट होती, तेव्हा चौथ्या क्रमांकावर ऋतुराजला मैदानात उतरावं लागलं.

Continues below advertisement

Continues below advertisement

ऋतुराजने ठोकले कारकिर्दीतील पहिले तडाखेबाज शतक

ऋतुराज गायकवाडने रायपूर वनडेमध्ये शानदार शतक झळकावले. गायकवाडचे हे पहिले वनडे शतक आहे. गायकवाड जेव्हा क्रीजवर आला तेव्हा संघ अडचणीत होता. रोहित आणि जैस्वाल बाद झाले होते, परंतु त्यानंतर गायकवाडने विराट कोहलीसोबत उल्लेखनीय भागीदारी केली. गायकवाड पहिल्याच चेंडूवर आऊट होण्यापासून थोडक्यात बचावला, परंतु त्यानंतर त्याने काही उत्कृष्ट शॉट्स खेळले आणि फक्त 52  चेंडूत त्याचे अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर त्याने पुढील 25 चेंडूत त्याचे शतक पूर्ण केले. गायकवाडने फक्त 77 चेंडूत त्याचे पहिले वनडे शतक पूर्ण केले.

ट्रोलिंग अन् शानदार पुनरागमन (Ruturaj Gaikwad 1st century in career)

ऋतुराज गायकवाडसाठी मालिकेची सुरुवात निराशाजनक होती. रांची येथील पहिल्या एकदिवसीय सामन्यात तो पूर्णपणे अपयशी ठरला, त्याने 14 चेंडूत फक्त 8 धावा केल्या. या खराब कामगिरीमुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोलिंग झाले. पण, ऋतुराजने या सर्व टीकेला झुगारून दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात उल्लेखनीय पुनरागमन केले. त्याने एक ऐतिहासिक खेळी खेळली, दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजी आक्रमणाविरुद्ध संयम आणि आक्रमकतेचे परिपूर्ण मिश्रण दाखवत पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध केले.

105 धावा काढून ऋतुराज गायकवाड बाद 

जानसेनने ऋतुराज गायकवाडला आऊट केले. तो 83 चेंडूत 12 चौकार आणि दोन षटकारांसह 105 धावा काढून बाद झाला. ऋतुराज आणि कोहलीने 156 चेंडूत तिसऱ्या विकेटसाठी 195 धावा केल्या. राहुल आता मैदानात उतरला आहे. कोहली 96 धावा करत खेळत होता.

हे ही वाचा - 

Harshit Rana : चल निघ रे...बोट दाखवत नको ते बोलला अन् ICC च्या नजरेत आला; गंभीरच्या लाडक्यावर कारवाई, नेमकं काय घडलं?, VIDEO