India ODI World Cup Squad Live: विश्वचषकाच्या शिलेदारांची घोषणा, पाहा कुणाला मिळाली संधी ?
India ODI World Cup Squad 2023 : विश्वचषकासाठी आज भारताच्या 15 शिलेदारांची निवड होणार आहे.
विश्वचषकासाठी आम्ही सर्वोत्कृष्ट संघाची निवड केली आहे. भारताची फलंदाजी मजबूत झाली आहे. फलंदाजी डेफ्थ आहे. त्याशिवाय आमच्याकडे स्पिन आणि वेगवान गोलंदाजीचे पुरसे पर्याय आहेत, असे रोहित म्हणाला.
विश्वचषकासाठी आज भारतीय संघाची घोषणा झाली. रोहित शर्मा याच्याकडे कर्णधारपदाची तर हार्दिक पांड्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अजित आगरकर आणि रोहित शर्मा यांनी पत्रकार परिषद घेत टीम इंडियाची घोषणा केली. यावेळी रोहित शर्माने हार्दिक पांड्याचे तोंडभरुन कौतुक केले. हार्दिक पांड्या पूर्णपणे पॅकेज आहे. विश्वचषकात त्याचा फॉर्म महत्वाचा ठरणार आहे, असे रोहित शर्मा म्हणाला. हार्दिक पांड्या गोलंदाजी आणि फलंदाजीत योगदान देतो. पाकिस्तानविरोधात हार्दिक पांड्याने मोक्याच्या क्षणी 87 धावांची खेळी केली होती. तर नेपाळविरोधात भेदक मारा केला. हार्दिक पांड्या फॉर्मात असणे भारतीय संघासाठी जमेची बाजू ठरु शकते, याची कल्पना कर्णधार रोहित शर्मा याला आहे.
विश्वचषकासाठी निवड न झालेल्या खेळाडूंचे दुख समजू शकतो, अशी प्रतिक्रिया रोहित शर्मा याने पत्रकार परिषदेत दिली. रोहित म्हणाला की, मी स्वत: या परिस्थितीचा सामना केला आहे. 2011 विश्वचषकासाठी माजी निवड झाली नव्हती.
विश्वचषकाच्या 15 शिलेदांराची आज निवड करण्यात आली आहे. पण संघात 27 सप्टेंबरपर्यंत बदल करण्यात मुभा आयसीसीने दिली आहे.
विश्वचषकासाठी भारतीय संघाचे कॉम्बिनेशन चांगले दिसत आहे. संघामध्ये पाच फलंदाज आहेत. दोन विकेटकिपर आहेत. 4 अष्टपैलू खेळाडू आणि चार गोलंदाजासह भारतीय संघ विश्वचषकात उतरणार आहे.
विकेटकीपर फलंदाज केएल राहुल याची विश्वचषकासाठी निवड झाली आहे. निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी केएल राहुल याच्या फिटनेसबाबतही अपडेट दिली. केएल राहुल याने एनसीएमध्ये फिटनेसवर काम केलेय. त्याने फिटनेस टेस्ट पास केली आहे. तो खेळण्यासाठी पूर्णपणे तंदुरुस्त आहे, असे अजित आगरकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
8 ऑक्टोबर ऑस्ट्रेलिया - चेन्नई
11 ऑक्टोबर दिल्ली - अफगाणिस्थान
14 ऑक्टोबर अहमदाबाद - पाकिस्तान
19 ऑक्टोबर - पुणे - बांगलादेश
22 ऑक्टोबर - धर्मशाला - न्यूझीलंड
29 ऑक्टोबर - लखनौ - इंग्लंड
2 नोव्हेंबर - मुंबई - श्रीलंका
5 नोव्हेंबर कोलकाता - दक्षिण आफ्रिका
12 नोव्हेंबर बेंगलोर - नेंदरलँड
विश्वचषकाच्या अंतिम 15 खेळाडूमध्ये संजू सॅमसन आणि तिलक वर्मा यांना संधी मिळाली नाही. त्याशिवाय प्रसिद्ध कृष्णा यालाही स्थान मिळवण्यात यश आले नाही. भारताच्या 15 जणांच्या चमूमध्ये एकही ऑफ स्पिनर गोलंदाजाला स्थान दिले नाही.
रोहित शर्मा (कर्णधार) विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन, केएल राहुल, हार्दिक पांड्या (उपकर्णधार), सूर्यकुमार यादव, रविंद्र जाडेजा, अक्षर पटेल, शार्दूल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शामी, मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव
रोहित शर्मा आणि अजित आगरकर पत्रकार परिषदेत दाखल
थोड्याच वेळात टीम इंडियाचे शिलेदार ठरणार आहेत.. अजित आगरकर पत्रकार परिषदेत देणार माहिती
केएल राहुल याने फिटनेस टेस्ट पास केली असून तो खेळण्यासाठी तयार झाला आहे. विश्वचषकासाठी राहुल याची निवड निश्चित मानली जातेय.
शुभमन गिल, रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, रविंद्र जाडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शामी, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर
विश्वचषकाच्या 15 जणांच्या चमूमध्ये तिलक वर्मा आणि संजू सॅमसन यांना संधी मिळण्याची शक्यता नाही. त्याशिवाय आशिया चषकात खेळणाऱ्या प्रसिद्ध कृष्णा याचाही पत्ता कट होण्याची शक्यता आहे. या तिन्ही खेळाडूंना बॅकअप म्हणून विश्वचषकात खेळवू शकतात.
माजी क्रिकेट वसीम जाफर याने विश्वचषकासाठी आपला भारतीय संघ निवडलाय. जाफरने रोहित शर्माकडे नेतृत्वाची जबाबदारी दिली आहे. जाफरच्या संघात तिलक वर्माला स्थान मिळाले आहे.
रोहित शर्मा शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, तिलक वर्मा, ईशान किशन, केएल राहुल, हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव ,मोहम्मद शमी, सिराज आणि जसप्रीत बुमराह
5 ऑक्टोबर रोजी विश्वचषकाचा पहिला सामना रंगणार आहे. 19 नोव्हेंबर रोजी अखेरचा सामना रंगणार आहे. भारतीय संघ आपल्या विश्वचषकाच्या अभियानाला आठ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरोधातील सामन्याने होणार आहे. हा सामना चेन्नई येथे रंगणार आहे. विश्वचषकासाठी भारतीय संघाची निवड आज ( 5 सप्टेंबर ) रोजी होणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वातील 15 जणांच्या संघात कुणाला संधी मिळणार... हे जवळपास निश्चित झालेय. विश्वचषकासाठी निवडल्या जाणाऱ्या संघामध्ये आशिया चषकात खेळत असलेल्या खेळाडूंचीच निवड होणार आहे. रोहित शर्माकडे संघाची धुरा असेल. त्याशिवाय विराट कोहली, जसप्रीत बुमराह, श्रेयस अय्यर, ईशान किशन, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, हार्दिक पांड्या, रविंद्र जाडेजा आणि कुलदीप यादव यांची नावे निश्चित आहे.
भारतीय टीम विश्व कप 2023 साठी लवकरच खेळाडूची नावे जाहीर करणार आहे. आशिया चषकातील खेळाडूंनाच संधी मिळण्याची शक्यता
विकेटकीपर फलंदाज केएल राहुल याने फिटनेस चाचणी पास केली आहे. केएल राहुल आज, मंगळवारी श्रीलंकेत दाखल होणार असून भारतीय संघासोबत जोडला जाणार आहे. टीम इंडियाच्या सुपर 4 मधील सामन्यांसाठी राहुल उपलब्ध असेल. दुखापतीमुळे केएल राहुल आशिया चषखातील पहिल्या दोन सामन्याला उपलब्ध नव्हता. बेंगलोर येथे एनसीएमध्ये केएल राहुल याने फिटनेसवर काम केले. सोमवारी केएल राहुलने फिटनेस चाचणी उत्तीर्ण केली. राहुल दुखापतीतून पूर्णपणे सावरला आहे. विश्वचषकासाठी राहुल उपल्बध असेल. त्याची निवडही निश्चित मानली जात आहे.
पार्श्वभूमी
India ODI World Cup Squad 2023 : विश्वचषकासाठी आज भारताच्या 15 शिलेदारांची निवड होणार आहे. निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी कर्णधार रोहित शर्मा आणि कोच राहुल द्रविड यांच्याशी चर्चा केल्यानंतर अंतिम 15 खेळाडूंची नावे निश्चित केली आहेत. आज दुपारी 1.30 वाजता पत्रकार परिषदेत घेऊन अजित आगरकर सघाची घोषणा करणार आहेत. अजित आगरकर श्रीलंकेतच आहेत. तेथून ते पत्रकार परिषद घेऊन संघाची घोषणा करणार आहे. 15 जणांमध्ये कुणाला संधी मिळणार? याकडे भारतीय क्रीडा प्रेमींचं लक्ष लागलेय.
5 ऑक्टोबर रोजी विश्वचषकाचा पहिला सामना रंगणार आहे. 19 नोव्हेंबर रोजी अखेरचा सामना रंगणार आहे. भारतीय संघ आपल्या विश्वचषकाच्या अभियानाला आठ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरोधातील सामन्याने होणार आहे. हा सामना चेन्नई येथे रंगणार आहे. विश्वचषकासाठी भारतीय संघाची निवड आज ( 5 सप्टेंबर ) रोजी होणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वातील 15 जणांच्या संघात कुणाला संधी मिळणार... हे जवळपास निश्चित झालेय. विश्वचषकासाठी निवडल्या जाणाऱ्या संघामध्ये आशिया चषकात खेळत असलेल्या खेळाडूंचीच निवड होणार आहे. रोहित शर्माकडे संघाची धुरा असेल. त्याशिवाय विराट कोहली, जसप्रीत बुमराह, श्रेयस अय्यर, ईशान किशन, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, हार्दिक पांड्या, रविंद्र जाडेजा आणि कुलदीप यादव यांची नावे निश्चित आहे.
अजित आगरकर यांच्या नेतृत्वातील निवड समिती काही आश्चर्यकारक निर्णय घेऊ शकते. पण रिपोर्ट्सनुसार, आशिया चषकात खेळणाऱ्या संघातीलच खेळाडू निश्चित झाले आहे. आयसीसीच्या नियमांनुसार, विश्वचषकासाठी संघ निवड करण्याची अखेरची तारीख पाच सप्टेंबर आहे. 27 सप्टेंबर पर्यंत संघात बदल केले जाऊ शकतात. भारतासाठी जमेची बाजू म्हणजे, केएल राहुल फिट झालाय. एनसीएमधील मेडिकल टीमने केएल राहुल तंदुरुस्त झाल्याचे जाहीर केले आहे.
केएल राहुल तंदुरुस्त -
विकेटकीपर फलंदाज केएल राहुल याने फिटनेस चाचणी पास केली आहे. केएल राहुल आज, मंगळवारी श्रीलंकेत दाखल होणार असून भारतीय संघासोबत जोडला जाणार आहे. टीम इंडियाच्या सुपर 4 मधील सामन्यांसाठी राहुल उपलब्ध असेल. दुखापतीमुळे केएल राहुल आशिया चषखातील पहिल्या दोन सामन्याला उपलब्ध नव्हता. बेंगलोर येथे एनसीएमध्ये केएल राहुल याने फिटनेसवर काम केले. सोमवारी केएल राहुलने फिटनेस चाचणी उत्तीर्ण केली. राहुल दुखापतीतून पूर्णपणे सावरला आहे. विश्वचषकासाठी राहुल उपल्बध असेल. त्याची निवडही निश्चित मानली जात आहे.
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल (विकेटकीपर), ईशान किशन (रिजर्व विकेटीकपर), हार्दिक पांड्या (उपकप्तान), रविंद्र जाडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह.
Rohit Sharma (Captain), Hardik Pandya (vice-captain), Shubman Gill, Virat Kohli, Shreyas Iyer, KL Rahul, Ravindra Jadeja, Shardul Thakur, Jasprit Bumrah, Mohammed Siraj, Kuldeep Yadav, Mohammed Shami, Axar Patel, Ishan Kishan, Suryakumar Yadav.
5 ऑक्टोबरपासून विश्वचषकाच्या रनसंग्रामाला सुरुवात होणार आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर विश्वचषकातील पहिला सामना रंगणार आहे. न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात पहिला सामना रंगणार आहे. 8 ऑक्टोबरपासून भारत आपल्या विश्वचषकाच्या अभियानाला सुरुवात करणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -