IND vs PAK Playing 11 Asia Cup 2025 : भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा आशिया कप 2025 मध्ये आमनेसामने येणार आहेत. यावेळी ही भिडंत सुपर-4 स्टेजमध्ये होणार असून, दोन्ही संघांसाठी ही लढत फायनलमध्ये पोहोचण्यासाठी खूपच निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे सगळ्यांच्याच नजरा टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनवर आहेत. यावेळी कर्णधार सूर्यकुमार यादव पाकिस्तानविरुद्ध कोणत्या 11 खेळाडूंचा वापर करेल? आतापर्यंतच्या सामन्यांमधील अंदाजांवरून, मागील सामन्याच्या तुलनेत टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल होऊ शकतात. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सुपर फोरचा सामना 21 सप्टेंबर रोजी आहे.
सुपर-4 साठी भारताचे दोन बदल
भारतीय संघात पाकिस्तानविरुद्ध दोन बदल पाहायला मिळू शकतात. ओमानविरुद्धच्या शेवटच्या ग्रुप सामन्यात अर्शदीप सिंग आणि हर्षित राणा यांना संधी देण्यात आली होती. त्या वेळी जसप्रीत बुमराह आणि वरुण चक्रवर्तीला विश्रांती देण्यात आली होती. पण पाकिस्तानविरुद्धच्या या मोठ्या सामन्यासाठी बुमराह आणि वरुणची पुनरागमन होण्याची शक्यता जास्त आहे.
बुमराह आणि वरुण परतणार!
जर पाकिस्तानविरुद्धच्या सुपर 4 सामन्यासाठी बुमराह आणि वरुणला प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट केले गेले तर ते अर्शदीप सिंग आणि हर्षित राणा यांची जागा घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारताची प्लेइंग इलेव्हन जवळपास तीच राहील जी ग्रुप स्टेजमधील पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात होती.
अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल डावाची सुरुवात करण्याची जबाबदारी सांभाळतील. सूर्यकुमार यादव तिसऱ्या क्रमांकावर येईल, त्यानंतर तिलक वर्मा, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या, शिवम दुबे आणि अक्षर पटेल असतील. भारतीय गोलंदाजी आक्रमणात स्पेशालिस्ट फिरकीपटू वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप यादव असतील, तर जसप्रीत बुमराह हा वेगवान गोलंदाजी आक्रमणाचा एकमेव प्रमुख असेल. बुमराहला अष्टपैलू पांड्या आणि दुबे यांची साथ मिळेल. या संघासह भारत सुपर-4 मधील हायव्होल्टेज पाकिस्तान सामन्यासाठी मैदानात उतरण्याची शक्यता आहे.
पाकिस्तानविरुद्ध ही असणार टीम इंडियाची प्लेइंग-11 : अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह.
हे ही वाचा -