India Playing 11 Vs England 1st Test : रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियासमोर आता इंग्लंडच्या बॅझबॉलचं आव्हान असेल. 25 जानेवारीपासून भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये पाच सामन्याच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. हैदराबाद येथे पहिला कसोटी सामना होणार आहे. पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाचे 11 शिलेदार कोणते असतील? याची चर्चा सुरु झाली आहे. पाहूयात भारताची संभाव्य प्लेईंग 11 


इंग्लंडविरोधातील पहिल्या कसोटी सामन्यासाठी रोहित शर्मा आणि यशस्वी जायस्वाल डावाची सुरुवात करतील. दक्षिण आफ्रिकाविरोधात झालेल्या दोन्ही कसोटी सामन्यात याच दोन्ही खेळाडूंनी सलामीची जबाबदारी पार पाडली होती. तिसऱ्या क्रमांकावर शुभमन गिल असेल तर चौथ्या स्थानावर विराट कोहली खेळताना दिसेल. त्यानंतर श्रेयस अय्यर आणि केएल राहुल मध्यक्रम संभाळतील. केएल राहुल विकेटकिपरच्या भूमिकेतही असेल. 


आर. अश्विन आणि रवींद्र जाडेजा यांच्यामुळे भारताची फलंदाजी अधिक मजबूत होईल. सातव्या क्रमांकावर जाडेजा तर आठव्या क्रमांकावर अश्विन फलंदाजीला येईल. कुलदीप यादव यालाही संधी मिळण्याची शक्यता आहे. भारतीय संघ तीन फिरकी गोलंदाजासह मैदानात उतरेल. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांच्यावर वेगवान गोलंदाजीची धुरा असेल. 


 
इंग्लंडविरोधातील पहिल्या कसोटी सामन्यासाठी संभाव्य प्लेईंग 11 -


रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयसवाल, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह. 



इंग्लंडविरोधातील पहिल्या दोन कसोटी सामन्यासाठी टीम इंडिया  -


रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जायस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उप कर्णधार), आवेश खान. 



पाच कसोटी सामन्याच्या मालिकेसाठी इंग्लंडचा संघ - 


बेन स्टोक्स (कर्णधार), रेहान अहमद, जेम्स एंडरसन, गस एटकिंसन, जॉनी बेयरस्टो (विकेटकीपर), शोएब बशीर, हॅरी ब्रूक, जॅक क्रॉली, बेन डकेट, बेन फॉक्स (विकेटकीपर), टॉम हार्टले, जॅक लीच, ओली पोप, ओली रॉबिन्सन, जो रूट आणि मार्क वुड. 


भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्याच्या कसोटी मालिकेचं वेळापत्रक -  


पहिला टेस्ट: भारत vs इंग्लंड, 25-29 जानेवारी, हैदराबाद (राजीव गांधी इंटरनेशनल स्टेडियम)
दुसरा टेस्ट: भारत vs इंग्लंड, 2-6 फेब्रुवारी, विशाखापट्टणम (डॉ. वाईएस राजशेखर क्रिकेट स्टेडियम)
तिसरा टेस्ट: भारत vs इंग्लंड, 15-19 फेब्रुवारी, राजकोट (सौराष्ट्र क्रिकेट एसोसिएशन स्टेडियम)
चौथा टेस्ट: भारत vs इंग्लंड, 23-27 फेब्रुवारी, रांची (जेएससीए इंटरनेशनल स्टेडियम)
पाचवा टेस्ट: भारत vs इंग्लंड, 7-11 मार्च, धर्मशाला (हिमांचल प्रदेश क्रिकेट एसोसिएशन स्टेडियम)