IND vs AUS, Adelaide Test India Playing XI : टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात गुरुवारी चार कसोटी सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहेत. एडीलेडमध्ये खेळवण्यात येणाऱ्या डे-नाईट सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाची नजर पिंक बॉलसोबत आपला दबदबा निर्माण करण्यावर असणार आहे. तर विराट कोहलीच्या नेतृत्त्वात खेळणारी टीम इंडिया यजमान संघावर मात करत मालिका खिशात घालण्यासाठी प्रयत्न करणार आहे.


बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया विरोधात कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियामध्ये खेळवण्यात येणारी कसोटी सामन्यांची मालिका उद्यापासून सुरु होणार आहे. ऑस्ट्रेलियातील एडीलेडमध्ये हे डे-नाईट सामने खेळवण्यात येणार आहेत.


ऑस्ट्रेलिया विरुद्ध गुरुवारपासून खेळवण्यात येणाऱ्या कसोटी सामन्यांमध्ये 24 तासांपूर्वी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली आहे. प्रॅक्टिस मॅचमध्ये उत्तम कामगिरी केल्यानंतरही शुभमन गिलचा टीम इंडियामध्ये समावेश करण्यात आलेला नाही. विकेटकीपिंगची जबाबदारी कर्णधार विराट कोहलीने मोहम्मद साहाकडे सोपवली आहे.





भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान जेव्हा जेव्हा कसोटी सामने असतात तेव्हा तेव्हा प्रत्येक भारतीयाची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असले. ऑस्ट्रेलियाने रेड बॉल क्रिकेटमध्ये नेहमीच भारतावर वर्चस्व मिळवले आहे. तरी देखील मागील काही काळात भारतीय संघ कांगारूंसाठी एक मोठे आव्हान म्हणून समोर आला आहे. अखेरच्या दौर्‍यात भारताने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत पराभूत केलं असेल, पण यावेळी भारताला ऑस्ट्रेलियावर विजय मिळवणं तेवढं सोपं नाही.


ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ :


विराट कोहली (कर्णधार), मयंक अग्रवाल, पृथ्वी साव, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, रिद्धिमान साहा, आर अश्विन, उमेश यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, शुभमन गिल, लोकेश राहुल, कुलदीप यादव, ऋषभ पंत, नवदीप सैनी, मोहम्मद सिराज, रविंद्र जडेजा.


महत्त्वाच्या बातम्या : 


IND vs AUS | कसोटी सामन्यांतील दोन्ही संघाचा रंजक इतिहास; काय म्हणतात आकडे? कोणाचं पारडं भारी?