India Playing XI vs Oman Asia Cup 2025 Update News : आशिया कप 2025 चा शेवटचा ग्रुप स्टेज सामना आज भारत आणि ओमान यांच्यात अबू धाबी येथील शेख झायेद क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण, सूर्यकुमार यादवने ओमानविरुद्धच्या सामन्यात असे काही केले की सर्वांना हसायला भाग पाडले. नाणेफेक जिंकल्यानंतर संघाबद्दल विचारले असता तो एका खेळाडूचे नाव विसरला. त्याने खेळाडू म्हणून हर्षित राणाचा उल्लेख केला, पण दुसऱ्या खेळाडूचं नाव त्याला आठवले नाही. मग तो म्हणाला की, "मी रोहित शर्मासारखा झालो आहे का?" रोहित शर्मा देखील अनेक गोष्टी विसरतो आणि त्याचे नाव घेऊन सूर्यकुमार यादवने सोशल मीडियावर व्हायरल कंटेंट दिला आहे. भारताने नाणेफेक जिंकून घेतला फलंदाजीचा निर्णय....
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने ओमानविरुद्धच्या सामन्यासाठी अंतिम इलेव्हनमध्ये दोन बदल केल्याची घोषणा केली. वरुण चक्रवर्तीच्या जागी हर्षित राणा आणि जसप्रीत बुमराहच्या जागी अर्शदीप सिंगचा समावेश करण्यात आला आहे. या सामन्यासाठी भारताने दोन स्पेशालिस्ट स्पिनर्स आणि दोन स्पेशालिस्ट गोलंदाजांना मैदानात उतरवले आहे. ओमाननेही दोन बदल केले आहेत.
नाणेफेक जिंकल्यानंतर सूर्यकुमार यादव काय म्हणाला?
सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकल्यानंतर सांगितले की, त्याने या स्पर्धेत दोन सामन्यांमध्ये प्रथम गोलंदाजी केली होती, परंतु आता तो प्रथम फलंदाजी करू इच्छितो आणि त्याच्या फलंदाजांना पूर्ण संधी देऊ इच्छितो. हे लक्षात घ्यावे की भारतीय संघ आधीच आशिया कपच्या सुपर 4 फेरीत पोहोचला आहे, तर ओमान पहिल्या दोन सामन्यात पराभव पत्करून बाहेर पडला आहे.
टीम इंडियाची प्लेइंग-11 : अभिषेक शर्मा, शुभमन गिल, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव.
ओमान संघाची प्लेइंग-11 : आमिर कलीम, जतिंदर सिंग, हम्माद मिर्झा, विनायक शुक्ला, शाह फैसल, जिकिरिया इस्लाम, आर्यन बिष्ट, मोहम्मद नदीम, शकील अहमद, समय श्रीवास्तव, जितेन रामानंदी.
हे ही वाचा -