Commonwealth Games 2022: कॉमनवेल्थ स्पर्धेतील पहिला क्रिकेटचा सामना भारत महिला संघ (Indian Women) आणि ऑस्ट्रेलिया महिला संघ (Australia Women) यांच्यात रंगणार आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरनं (Harmanpreet Kaur) प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. या सामन्यात भारतासमोर ऑस्ट्रेलियाचे कडवे आव्हान असेल. टीम इंडियासाठी या सामन्यात स्मृती मानधना (Smriti Mandhana) आणि दीप्ती शर्मासह (Deepti Sharma) अनेक खेळाडूंकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताची कामगिरीभारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मागील पाच टी-20 सामन्यावर नजर टाकल्यास ऑस्ट्रेलियाचं पारडं जडं दिसत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळण्यात आलेल्या मागील पाच टी-20 सामन्यात भारताला चार वेळा पराभव स्वीकारावा लागलाय. तर, फक्त एका सामन्यात यश मिळवलंय. या पाच सामन्यांमध्ये मार्च 2020 मध्ये खेळला गेलेला टी-20 विश्वचषकाचा अंतिम सामना देखील आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियानं 184 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारतचा संपूर्ण संघ 99 धावा करून सर्वबाद झाला होता.

भारताचा प्लेईंग इलेव्हन:स्मृती मानधना, शफाली वर्मा, यस्तिका भाटिया (विकेटकिपर), जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), हरलीन देओल, दीप्ती शर्मा, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, मेघना सिंग, रेणुका सिंह. 

ऑस्ट्रेलियाचा प्लेईंग इलेव्हन:अॅलिसा हिली (विकेटकिपर), बेथ मूनी, मेग लॅनिंग  (कर्णधार), ताहलिया मॅकग्रा, रॅचेल हेन्स, अॅशले गार्डनर, ग्रेस हॅरिस, जेस जोनासेन, अलाना किंग, मेगन शट, डार्सी ब्राउन. 

भारतीय क्रिकेट संघाचं संपूर्ण वेळापत्रक (29 जुलै ते 7 ऑगस्ट)

तारीखसामनेठिकाणवेळ
29 जुले 2022ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारतएजबॅस्टन, बर्मिंगहॅम11:00 am– 2:30 pm
31 जुले 2022भारत विरुद्ध पाकिस्तानएजबॅस्टन, बर्मिंगहॅम11:00 am– 2:30 pm
03 ऑगस्ट 2022भारत विरुद्ध बारबाडोसएजबॅस्टन, बर्मिंगहॅम6:00 pm – 9:30 pm
06 ऑगस्ट 2022उपांत्य फेरी 1एजबॅस्टन, बर्मिंगहॅम11:00 am– 2:30 pm
06 ऑगस्ट 2022उपांत्य फेरी 2एजबॅस्टन, बर्मिंगहॅम6:00 pm – 9:30 pm
07 ऑगस्ट 2022कांस्यपदक सामनाएजबॅस्टन, बर्मिंगहॅम10:00 am– 1:30 pm
07 ऑगस्ट 2022सुवर्णपदक सामनाएजबॅस्टन, बर्मिंगहॅम5:00 pm – 8:30 pm

हे देखील वाचा-