West Indies OUT ALL 162 vs  India 1st Ahmedabad Test : भारताच्या मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांच्या भेदक आणि अचूक गोलंदाजीमुळे वेस्ट इंडीजचा पहिला डाव फक्त 162 धावांवर आटोपला. सामन्यात वेस्ट इंडीजच्या कर्णधार रोस्टन चेजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, मात्र त्यांचा हा निर्णय फारसा फायदेशीर ठरला नाही. विशेषतः सिराज आणि बुमराह यांच्या माऱ्यापुढे वेस्ट इंडीजचे फलंदाज अगदी नवशिक्यांसारखे खेळताना दिसले.

Continues below advertisement

सिराजने 14 षटकांत 40 धावा देत 4 विकेट घेतले, तर बुमराहने 14 षटकांत 42 धावा देऊन 3 विकेट घेतले. या दोघांसोबतच कुलदीप यादवने 2 विकेट्स घेतल्या आणि वॉशिंग्टन सुंदरने 1 फलंदाजाला आऊट केले.

लंचपर्यंत वेस्ट इंडीजची अर्धा संघ तंबूत

सामन्याच्या पहिल्या सत्रात वेस्ट इंडीजने लंच ब्रेकपर्यंत आपले 5 विकेट गमावल्या होत्या आणि त्यावेळी त्यांचा धावफलक केवळ 90 धावांवर होता. पहिला झटका त्याना तेगनारायण चंद्रपॉलच्या रुपाने बसला, तो शून्यावरच आऊट झाला. त्यानंतर बुमराहने जॉन कॅम्पबेलला माघारी पाठवले. लंचपूर्वी कुलदीप यादवने शाय होपला बोल्ड केले. पिचवर थोडीशी गवत असल्याने जरी जास्त हालचाल अपेक्षित होती, तरीही सकाळच्या सत्रात जलद गोलंदाजांना फारशी मदत झाली नाही. पण बुमराह आणि सिराज यांनी आपल्या अचूक लाइन-लेंथच्या जोरावर फलंदाजांना अडचणीत टाकले.

बुमराह आणि सिराजनंतर कुलदीप यादवच्या फिरकीत फिसला वेस्ट इंडीज  

कर्णधार रोस्टन चेस आणि शाई होप यांनी अनुक्रमे 24 आणि 26 धावा करून डाव स्थिर करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी 48 धावांची भागीदारी केली. पण, त्यानंतर कुलदीप यादव आला आणि त्याने होपची विकेट घेतली. शेवटी, जस्टिन ग्रीव्हजला 32 धावा करून जसप्रीत बुमराहने बाद केले. शेवटी, वेस्ट इंडिजचा कोणताही फलंदाज टिकू शकला नाही आणि संघ 162 धावांवर ऑलआउट झाला.

भारतीय गोलंदाजांचे वर्चस्व

वेस्टइंडीज विरुद्ध भारतीय गोलंदाजांनी उच्च दर्जाची कामगिरी केली, विशेषतः मोहम्मद सिराजने. त्याने 4 बळी घेतले. त्याचा साथीदार जसप्रीत बुमराहने 3 बळी घेतले, तर कुलदीप यादव आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी अनुक्रमे 2 आणि 1 फलंदाज बाद केला.

हे ही वाचा -

Ind vs Wi 1st Test : वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या कसोटीत 579 कोटींच्या जर्सीत टीम इंडिया मैदानात, पाकिस्तानच्या जर्सीची किंमत किती?