Who Is Amol Muzumdar IND W vs SA W Final World Cup 2025: आयसीसी महिला विश्वचषक 2025 च्या अंतिम सामन्यात (INDW vs SAW World Cup Final 2025) भारतानं दक्षिण आफ्रिकेवर (India beat South Africa Women World Cup 2025 Final) विजय मिळवला आहे. भारतानं नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेवर 52 धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारतानं पहिल्यांदा आयसीसी महिला वर्ल्ड कप जिंकला. भारताच्या या विजयात तीन खेळाडूंची कामगिरी महत्त्वाची ठरली. शेफाली वर्मा, दीप्ति शर्मा आणि अमनजोत कौरची फील्डिंग महत्वाची ठरली.
भारताच्या महिला संघाने विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय महिला क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक अमोल मुझुमदार (Amol Muzumdar) यांच्या नावाची सध्या जोरदार चर्चा आहे. ‘सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar), राहुल द्रविड (Rahul Dravid), सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि व्हीव्हीएस लक्ष्मण (VVS Laxman) यांची तगडी मधली फळी असल्यामुळे अमोलला टीम इंडियामध्ये कधीच स्थान मिळालं नाही’. मुख्य प्रशिक्षक अमोल मुझुमदार (Amol Muzumdar) यांच्या नेतृत्वाखाली भारतीय महिलांनी उत्कृष्ट कामगिरी केली. अमोल अमोल मुझुमदार हे भारतातील सर्वात प्रतिभावान पण दुर्लक्षित खेळाडूंपैकी एक मानले जातात. भारतीय संघासाठी खेळता न आलं तरी त्यांनी देशांतर्गत क्रिकेट आणि प्रशिक्षक म्हणून भारतीय क्रिकेटला मोठे योगदान दिले आहे.
कोण आहेत अमोल मुझुमदार? (Who Is Amol Muzumdar)
अमोल अनिल मुझुमदार हे माजी भारतीय क्रिकेटपटू आणि सध्या भारतीय महिला क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक (Head Coach) आहेत. मुझुमदार यांनी भारतीय संघासाठी आंतरराष्ट्रीय सामने खेळले नाहीत, परंतु देशांतर्गत क्रिकेटमध्ये ते सर्वकालीन महान फलंदाजांपैकी एक मानले जातात. अमोल मुझुमदार यांनी शाळेतच असताना सचिन तेंडुलकरच्या संघात खेळून प्रचंड धावांचा विक्रम केला होता. अमोल मुझुमदार यांनी 1993 साली रणजी सामन्यात मुंबईकडून पदार्पण केले. पदार्पणाच्या सामन्यात अमोल मुझुमदार यांनी मुंबईसाठी 260 नाबाद धावा केल्या, हा त्या काळातील विक्रम होता. अमोल मुझुमदार मुंबईसह आंध्र प्रदेश आणि आसामच्या संघाकडूनही रणजी सामने खेळले. 2013 मध्ये आंध्र प्रदेशकडून अमोल मुझुमदार यांनी शेवटचा रणजी सामना खेळला.
2023 मध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती- (Amol Muzumdar)
देशांतर्गत क्रिकेटमधील निवृत्तीनंतर अमोल मुझुमदार यांनी प्रशिक्षकमध्ये पदार्पण केले. अमोल मुझुमदार यांनी राजस्थान रॉयल्स (IPL) आणि नेदरलँड्स संघाला मार्गदर्शन केले. 2023 मध्ये अमोल मुझुमदार यांची भारतीय महिला क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक (Head Coach) म्हणून नियुक्ती झाली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली महिला संघाने आशिया कप आणि द्विपक्षीय मालिकांमध्ये चांगली कामगिरी केली. अमोल मुझुमदार विवाहित असून ते मुंबईत स्थायिक आहेत. अमोल मुझुमदार क्रिकेट विश्लेषक आणि प्रेरणादायी वक्ते म्हणूनही ओळखले जातात.
अमोल मुझुमदार यांची वैयक्तिक माहिती- (Who Is Amol Muzumdar)
पूर्ण नाव: अमोल अनिल मुझुमदार
जन्म: 11 नोव्हेंबर 1974
जन्मस्थान: मुंबई, महाराष्ट्र
शिक्षण: शारदाश्रम विद्यालय (मुंबई)
खेळशैली: उजव्या हाताचा फलंदाज
30 शतके आणि 60 अर्धशतकांसह 11,167 धावा- (IND W vs SA W Final World Cup 2025)
अमोल मुझुमदार यांनी 171 प्रथम श्रेणी सामने खेळले, त्यात 30 शतके आणि 60 अर्धशतकांसह 11,167 धावा केल्या. लिस्ट ए मध्ये, अमोल मुझुमदार यांनी 113 सामन्यांमध्ये 3286 धावा केल्या, ज्यामध्ये तीन शतके आणि 26 अर्धशतके होती. तसेच अमोल मुझुमदार यांनी 14 टी-20 सामन्यांमध्ये 174 धावा केल्या, ज्यामध्ये एका अर्धशतकाचा समावेश होता.
अमोल मुझुमदार यांची देशांतर्गत क्रिकेट कारकीर्द-
प्रथम श्रेणी सामने (Ranji Trophy)-171धावा-11,167सरासरी (Batting Average)- 48.13शतके / अर्धशतके- 30 / 60सर्वोच्च धावसंख्या- 260* नाबादList A सामने- 113T20 सामने- 14