IND W vs AUS W: ऍशले गार्डनरच्या (Alyssa Healy) नाबाद अर्धशतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं भारताला 3 विकेट्सनं (IND W vs AUS W) पराभूत केलंय. ज्यामुळं कॉमनवेल्थ स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात भारतीय महिला संघाच्या पदरी निराशा पडलीय. या सामन्यात नाणेफेक जिंकून भारतीय संघानं 20 षटकात आठ विकेट्स गमावून ऑस्ट्रेलियासमोर 155 धावांचं लक्ष्य ठेवलं. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाच्या संघानं सात विकेट्स गमावून एकोणीसव्या षटकातच भारतावर विजय मिळवलाय. 


भारतानं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. भारताची गोलंदाज रेणुका सिंहनं भेदक गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियाच्या टॉप ऑर्डरचं कंबरडं मोडलं. तिनं ऑस्ट्रेलियाच्या अॅलिसा हेली, बेथ मूना, मेग लेनिंग आणि तहिला मॅग्राथला माघारी धाडूनं भारताला मजबूत स्थितीत आणलं. परंतु, अॅशले गार्डनरनं आक्रमक फलंदाजी करत भारताच्या तोंडातून विजयी घास हिसकावून घेतला. तिनं 35 चेंडूत नाबाद 52 धावा केल्या. तसेच ग्रेस हॅरिसचीही तिला चांगली साथ मिळाली. ज्यामुळं ऑस्ट्रेलियाच्या संघानं तीन विकेट्स आणि एक षटक राखून भारतावर विजय मिळवला. भारताकडून रेणुका सिंहनं सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. तर, दिप्ती शर्माला दोन आणि मेघना सिंहला एक विकेट्स मिळाली.


कॉमनवेल्थ स्पर्धेतील पहिल्या क्रिकेट सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर सलामीवीर स्मृती मानधना (17 चेंडू 24 धावा) आणि शेफाली वर्मानं (33 चेंडूत 48) भारताला चांगली सुरुवात करून दिली. परंतु, तिसऱ्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर स्मृती मानधना बाद झाली. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेली यस्तीका भाटीया रन आऊट होऊन स्वस्तात माघारी परतली. दरम्यान, कर्णधार हरमनप्रीत कौरनं शेफाली वर्माला सोबत घेऊन संघाचा डाव पुढे नेण्याचा प्रयत्न केला. पंरतु, मेगन शुटच्या गोलंदाजीवर शेफाली शर्माही बाद झाली. फक्त दोन धावांनी तिचं अर्धशतक हुकलं. हरमनप्रीत कौर आणि शेफाली वर्मा व्यतिरिक्त भारताच्या एकाही खेळाडूला काही खास कामगिरी करता आली नाही. जेमिमाह रॉड्रिग्स (11 धावा), दिप्ती शर्मा (1 धाव), हरलीन देओल (7 धावा), राधा यादव (नाबाद 2 धावा) आणि मेघना सिंह शून्यावर धावा केल्या. दरम्यान, भारतानं 20 षटकात 8 विकेट्स 154 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून जेस जोनासेनं सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. तर, मेगन शुटनं दोन आणि डार्सी ब्राउननं प्रत्येकी एक- एक विकेट घेतली.


हे देखील वाचा-