IND vs WI: भारत आणि वेस्ट इंडीज (India vs West Indies) यांच्यात येत्या 29 जुलैपासून टी-20 मालिका खेळली जाणार आहे. वेस्ट इंडीजविरुद्ध पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळण्यासाठी भारतीय टी-20 संघ त्रिनिदाद येथे दाखल झालाय. वेस्ट इंडीज दौऱ्यात भारतानं आतापर्यंत चांगली कामगिरी करून दाखवली. वेस्ट इंडीज दौऱ्यात भारतानं चार टी-20 सामने खेळले आहेत. त्यापैकी भारतानं दोन सामन्यात विजय मिळवलाय. तर, दोन सामने गमावले आहेत.

भारतानं 2010 मध्ये पहिला टी-20 सामना खेळला आहे. या सामन्यात भारताला 14 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर दुसरा सामना 2011 मध्ये खेळण्यात आला, ज्यात भारतानं 16 धावांनी विजय मिळवला. दरम्यान, 2017 मध्ये खेळण्यात आलेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात भारताचा 9 विकेट्सनं पराभव झाला. या सामन्यात वेस्ट इंडीजच्या संघानं मोठा विजय मिळवला. भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात चौथा आणि अखेरचा टी-20 सामना 2019 मध्ये खेळण्यात आला होता, ज्यात भारतानं सात विकेट्सनं विजय मिळवलाय.

वेस्टइंडीज दौऱ्यात टी-20 भारताकडून सर्वाधिक धावा करणारे भारतीय फलंदाज
वेस्ट इंडीजमध्ये दौऱ्यात भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीच्या नावावर सर्वाधिक धावा करण्याची नोंद आहे. त्यानं तीन सामन्यात 112 धावा केल्या आहेत. ज्यात एका अर्धशतकाचा समावेश आहे. यानंतर भारताचा यष्टीरक्षक ऋषभ पंत दुसर्या क्रमांकावर आहे. ऋषभ पंतनं दोन सामन्यात 103 धावा केल्या आहेत. ज्यात एका अर्धशतकाचा समावेश आहे. त्यानंतर या यादीत दिनेश कार्तिक तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याच्या नावावर 48 धावांची नोंद आहे.

भारत- वेस्ट इंडीज टी-20 मालिकेचं वेळापत्रक-

सामना तारीख ठिकाण
पहिला टी-20 सामना  29 जुलै 2022 पोर्ट ऑफ स्पेन
दुसरा टी-20 सामना 1 ऑगस्ट 2022 सेंट किट्स आणि नेव्हिस
तिसरा टी-20 सामना 2 ऑगस्ट 2022 सेंट किट्स आणि नेव्हिस
चौथा टी-20 सामना 6 ऑगस्ट 2022 फ्लोरिडा, अमेरिका
पाचवा टी-20 सामना 7 ऑगस्ट 2022 फ्लोरिडा, अमेरिका

हे देखील वाचा-