IND vs WI 5th T20: पाचव्या आणि निर्णायक टी 20 सामन्यात भारताचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेकीचा कौल जिंकला आहे. हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजला प्रथम गोलंदाजी करण्यास आमंत्रित केलेय. भारतीय संघ प्रथम फलंदाजी करणार आहे. फ्लोरिडाची खेळपट्टी फलंदाजीस पोषक असल्यामुळे येथे धावांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. निर्णायक सामन्यात भारतीय संघाने कोणताही बदल केलेला नाही. मागील सामन्यातील विजयी संघ उतरवलाय. दुसरीकडे वेस्ट इंडिजच्या संघात दोन बदल करण्यात आले आहेत.


नाणेफेकीनंतर कोण काय म्हणाले ?


नाणेफेक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्या म्हणाला की, खेळपट्टी चांगली दिसत आहे. प्रथम फलंदाजी करुन धावफलकावर मोठी धावसंख्या उभारु शकतो. गेल्यावर्षीपेक्षा येथील खेळपट्टी चांगली आहे. 


वेस्ट इंडिजचा कर्णधार पॉवेल म्हणाला की, दोन्ही संघ आपापल्या ताकदीनुसार खेळत आहेत. भारताने दिलेल्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करु, असा विश्वास आहे.  आमच्या गोलंदाजांना प्रत्येक फलंदाजांविरुद्ध त्यांच्या योजनांवर ठाम राहण्याची गरज आहे. ओबेद मॅकॉययाच्या जागी अल्झारी जोसेफ परतला आहे. ओडियन स्मिथच्या जागी रोस्टन चेस याला संधी दिली आहे.  


भारताची प्लेईंग 11 :


यशस्वी जायसवाल, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, युजवेंद्र चहल, मुकेश कुमार


वेस्ट इंडिजच्या संघात कोण कोणते शिलेदार ?


ब्रेंडन किंग, काइल मेयर्स, शाई होप, निकोलस पूरन (विकेटकीपर), रोवमन पॉवेल (कर्णधार), शिमरोन हेटमायर, जेसन होल्डर, रोमारियो शेफर्ड, रोस्टन चेस, अल्झारी जोसेफ, अकील हुसेन 


 






अनुभवी विंडिजपुढे युवा भारतीय संघाचे आव्हान



भारतीय संघाने लागोपाठ दोन सामने जिंकून जबरदस्त कमबॅक केले. शुभमन गिल आणि यशस्वी जायस्वाल यांनी जबरदस्त सलामी दिली होती. मधल्या फळीत सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्माही फॉर्मात आहेत. हार्दिक पांड्या, अक्षर पटेल आणि संजू सॅमसन यांच्या फॉर्माची चिंता कायम आहे. अखेरच्या सामन्यात भारतीय फलंदाज प्रभावी कामगिरी करतील. भारताची गोलंदाजीही प्रभावी आहे. चहल आणि कुलदीप यांच्या फिरकी माऱ्याला अर्शदीप आणि मुकेश कुमार यांच्या भेदक माऱ्याची जोड आहे. दुसरीकडे अनुभवी वेस्ट इंडिजही विजयासाठी उतरणार आहे. निकोलस पूरन, शाय होप, काइल मायर्स, शिमरोन हेटमायर आणि रोवमन पॉवेल भन्नाट फॉर्मात आहेत. त्याशिवाय गोलंदाजीतही विंडिजचे खेळाडू अनुभवी आहेत. तळापर्यंत दर्जेदार फलंदाज ही विंडिजची जमेची बाजू आहे. त्यामुळे आजचा सामना रंगतदार होण्याची शक्यता आहे. आज कोणता संघ बाजी मारणार? याकडे क्रीडा चाहत्यांचे लक्ष लागलेय.