IND Vs WI, 3rd T20 Live : टीम इंडिया कमबॅक करणार का? तिसऱ्या टी20 चे लाईव्ह अपडेट

 IND Vs WI 3rd T20 Live Updates : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये आज तिसरा टी20 सामना होत आहे. पहिल्या दोन्ही सामन्यात भारतीय संगाला पराभवाचा सामना करावा लागला होता.

एबीपी माझा ब्युरो Last Updated: 08 Aug 2023 11:17 PM
भारताचा विडिंजवर सात विकेटने विजय

सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांच्या धुंवाधार फलंदाजीच्या जोरावर भारताने तिसऱ्या सामन्यात सात विकेटने विजय मिळवलाय. 

भारताला तिसरा धक्का

सूर्यकुमार यादवच्या रुपाने भारताला तिसरा धक्का बसलाय. सूर्यकुमार यादव 83 धावांवर बाद झालाय. 

सूर्याचे वादळ

सूर्यकुमार यादवने अवघ्या 23 चेंडूत अर्धशतक ठोकले.. 

भारताला लागोपाठ दोन धक्के

शुभमन गिल पुन्हा एकदा अपयशी ठरलाय. गिल अवघ्या सहा धावा काढून तंबूत परतलाय. तर पदार्पण करणाऱ्या यशस्वी जयस्वाल फक्त एका धावेवर बाद झालाय. सध्या सुर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांनी डाव सांभाळलाय.  

भारताला विजयासाठी 160 धावांचे आव्हान

IND vs WI 3rd T20: तिसऱ्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात पाच विकेटच्या मोबदल्यात 159 धावांपर्यंत मजल मारली. ब्रेंडन किंग आणि कर्णधार रोवमन पॉवेल यांचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. किंग याने दमदार सुरुवात दिली तर पॉवेल यांनी जोरदार फिनिशिंग केली. किंग याने 42 तर पॉवेल याने 40 धावांची खेळी केली. भारताकडून कुलदीप यादव याने तीन विकेट घेतल्या. भारताला विजयासाठी 160 धावांचे आव्हान मिळालेय. 

वेस्ट इंडिजचा अर्धा संघ तंबूत

वेस्ट इंडिजचा अर्धा संघ तंबूत परतलाय. शिमरोन हेटमायर याला मुकेश कुमार याने बाद केलेय. 

कुलदीप यादवचा भेदक मारा

कुलदीप यादवच्या फिरकीपुढे विडिंजचे फलंदाज ढेपाळले. कुलदीप यादवने चार षटकारत 28 धावांच्या मोबदल्यात तीन फलंदाजांना तंबूत धाडले. 

विडिंजला चौथा धक्का

वेस्ट इंडिजला कुलदीप यादवने आणखी एक धक्का दिलाय.. ब्रेंडन किंग 42 धावांवर बाद झालाय. 

वेस्ट इंडिजला तिसरा धक्का

वेस्ट इंडिजला तिसरा धक्का.. निकोलस पूरन 20 धावांवर बाद झालाय

वेस्ट इंडिजचे शतक पूर्ण

वेस्ट इंडिजच्या संघाने शतक फलकावर लागलेय... निकोलस पूरन 19 आणि ब्रेंडन किंग 41 धावांवर खेळत आहेत. 

वेस्ट इंडिजला दुसरा धक्का

वेस्ट इंडिजला दुसरा धक्का बसलाय. कुलदीप यादवने चार्ल्स याला 12 धावांवर बाद केले.

वेस्ट इंडिजची दमदार सुरुवात

वेस्ट इंडिजने दमदार सुरुवात केली आहे. विडिंजने 10 षटकात एक विकेटच्या मोबदल्यात 74 धावा केल्या आहेत. 

वेस्ट इंडिजला पहिला धक्का

वेस्ट इंडिजला पहिला धक्का बसलाय... काइल मायर्सला अक्षर पटेल याने बाद केलेय

विडिंजचे फलंदाज मैदानात

विडिंजचे फलंदाज मैदानात आले आहेत.. भारताकडून हार्दिक पांड्या गोलंदाजीसाठी मैदानात

वेस्ट इंडिजचे शिलेदार -

ब्रँडन किंग, काइल मेयर्स, जॉन्सन चार्ल्स, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), रोव्हमन पॉवेल (कर्णधार), शिमरॉन हेटमायर, रोमॅरियो शेफर्ड, रोस्टन चेस, अकिल हुसेन, अल्झारी जोसेफ, ओबेद मॅकॉय.

भारतीय संघात दोन बदल

भारतीय संघात दोन बदल करण्यात आले आहेत. युवा यशस्वी जयस्वाल याचे टी20 मध्ये पदार्पण झालेय. कसोटी मालिकेत यशस्वी जयस्वाल याने विस्फोटक फलंदाजी केली होती. त्याशिवाय आयपीएलमध्येही यशस्वीने आपल्या कामिगिरीने सर्वांनाच प्रभावित केले होते. आता टी20 मध्ये यशस्वी जयस्वाल याचे पदार्पण झालेय. यशस्वी जयस्वाल याच्याशिवाय अनुभवी फिरकी गोलंदाज कुलदीप यादव दुखापतीनंतर परतलाय. सलामी फलंदाज ईशान किशन याला आराम देण्यात आला आहे. त्याशिवाय रवि बिश्नोई याला वगळण्यात आले आहे. दुसऱ्या टी20 सामन्यात रवि बिश्नोईला दमदार कामगिरी करता आली नव्हती. 

भारताची प्लेईंग 11

यशस्वी जायस्वाल, शुभमन गिल, सुर्यकुमार यादव (उपकर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (कर्णधार), अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, मुकेश कुमार

वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय

वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय... भारताची प्रथम गोलंदाजी

वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकली

वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकली

यशस्वी जायस्वालचे पदार्पण

युवा यशस्वी जायस्वालचे टी20 मध्ये पदार्पण झालेय. कसोटी सामन्यात जायस्वाल याने आपल्या कामगिरीने प्रभावीत केले होते. आता टी20 मध्ये तो कशी कामगिरी करतो ? हे येणारा काळच सांगेल. 

थोड्याच वेळात होणार सामन्याला सुरुवात

 भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये आज तिसरा टी20 सामना होत आहे. पहिल्या दोन्ही सामन्यात भारतीय संगाला पराभवाचा सामना करावा लागला होता. फलंदाजीमुळे भारतीय संघाला दोन्ही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. पहिल्या सामन्यात विडिंजने 4 धावांनी विजय मिळवला होता. तर दुसऱ्या टी20 सामन्यात दोन विकेटने विडिंजने बाजी मारली होती. आता तिसरा सामना जिंकून मालिकेत बाजी मारण्याचा विडिंजचा प्रयत्न असेल तर हा सामना जिंकून कमबॅक करण्याचा हार्दिक आणि संघाचा विचार असेल. तिसऱ्या टी20 सामन्यात भारतीय संघात बदल होण्याची शक्यता आहे. सलामी जोडी बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याशिवाय अक्षर पटेल, रवि बिश्नोई आणि मुकेश कुमार यांनाही वगळण्यात येण्याची शक्यता आहे. 

यशस्वी जायसवाल करु शकतो पदार्पण -  

तिसऱ्या टी20 सामन्यात युवा  यशस्वी जायसवाल पदार्पण करण्याची शक्यता आहे. यशस्वी जायस्वाल याने आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करत सर्वांनाच प्रभावित केले होते. त्यानंतर कसोटीमध्येही त्याने संधीचे सोनं केले होते. त्यामुळे आता टी 20 मध्ये पदार्पण करण्याची शक्यता आहे. ईशान किशन आणि यशस्वी जयस्वाल सलामीला उतरु शकतात. तिसऱ्या क्रमांकावर शुभमन गिल खेळण्याची शक्यता आहे. 

टीम इंडियात अनेक बदल होण्याची शक्यता - 

दोन्ही सामन्यात पराभव झाल्यानंतर आता तिसऱ्या सामन्यात भारतीय संघात काही बदल होण्याची शक्यता आहे.  मुकेश कुमार याच्या जागी आवेश खान अथवा उमरान मलिक यांना संधी मिळू शकते.  रवि बिश्नोई याच्या जागी कुलदीप यादवचे पुनरागमन होईल. 

हार्दिक आणि अर्शदीप यांनी दुसऱ्या सामन्यात भेदक मारा केला होता. दोघांचाही चेंडू स्विंग होत होता. दोन महिन्यानंतर मैदानात उतरलेला चहलही प्रभावी वाटत होता. पण रवि बिश्नोई आणि मुकेश कुमार यांनी प्रभावी कामगिरी केली नाही. त्यामुळे या दोघांची सुट्टी होऊ शकते.

थोड्याच वेळात होणार नाणेफेक

भारतीय फलंदाज ढेपाळले - 

पहिल्या दोन्ही सामन्यात फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीमुळे भारतीय संघाला पराभवाचा सामना केलाय. पहिल्या सामन्यात टीम इंडिया फक्त 145 धावांपर्यंत मजल मारु शकला. हा सामना विडिंजचे 4 धावांनी जिंकला. तर दुसऱ्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना टीम इंडिया 152 धावांपर्यंत मजल मारु शकला. हा सामना विडिंजने दोन विकेटने जिंकला. अशा स्थितीत तिसऱ्या वनडे सामन्यात प्लेईंग 11 मध्ये बदलाची शक्यता आहे. 

टीम इंडिया विरुद्ध वेस्ट इंडिज टी20 आंतरराष्ट्रीय हेड टू हेड 

टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात आतापर्यंत 27 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळवले गेले आहेत. ज्यामध्ये टीम इंडियानं 17 सामने जिंकले आहेत. तर वेस्ट इंडिजनं केवळ 9 सामने जिंकले आहेत. याव्यतिरिक्त एक सामना अनिर्णित राहिला आहे. 

पार्श्वभूमी

 IND Vs WI 3rd T20 Live Updates : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये आज तिसरा टी20 सामना होत आहे. पहिल्या दोन्ही सामन्यात भारतीय संगाला पराभवाचा सामना करावा लागला होता. फलंदाजीमुळे भारतीय संघाला दोन्ही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. पहिल्या सामन्यात विडिंजने 4 धावांनी विजय मिळवला होता. तर दुसऱ्या टी20 सामन्यात दोन विकेटने विडिंजने बाजी मारली होती. आता तिसरा सामना जिंकून मालिकेत बाजी मारण्याचा विडिंजचा प्रयत्न असेल तर हा सामना जिंकून कमबॅक करण्याचा हार्दिक आणि संघाचा विचार असेल. तिसऱ्या टी20 सामन्यात भारतीय संघात बदल होण्याची शक्यता आहे. सलामी जोडी बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याशिवाय अक्षर पटेल, रवि बिश्नोई आणि मुकेश कुमार यांनाही वगळण्यात येण्याची शक्यता आहे. 

यशस्वी जायसवाल करु शकतो पदार्पण -  

तिसऱ्या टी20 सामन्यात युवा  यशस्वी जायसवाल पदार्पण करण्याची शक्यता आहे. यशस्वी जायस्वाल याने आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करत सर्वांनाच प्रभावित केले होते. त्यानंतर कसोटीमध्येही त्याने संधीचे सोनं केले होते. त्यामुळे आता टी 20 मध्ये पदार्पण करण्याची शक्यता आहे. ईशान किशन आणि यशस्वी जयस्वाल सलामीला उतरु शकतात. तिसऱ्या क्रमांकावर शुभमन गिल खेळण्याची शक्यता आहे. 

टीम इंडियात अनेक बदल होण्याची शक्यता - 

दोन्ही सामन्यात पराभव झाल्यानंतर आता तिसऱ्या सामन्यात भारतीय संघात काही बदल होण्याची शक्यता आहे.  मुकेश कुमार याच्या जागी आवेश खान अथवा उमरान मलिक यांना संधी मिळू शकते.  रवि बिश्नोई याच्या जागी कुलदीप यादवचे पुनरागमन होईल. 

हार्दिक आणि अर्शदीप यांनी दुसऱ्या सामन्यात भेदक मारा केला होता. दोघांचाही चेंडू स्विंग होत होता. दोन महिन्यानंतर मैदानात उतरलेला चहलही प्रभावी वाटत होता. पण रवि बिश्नोई आणि मुकेश कुमार यांनी प्रभावी कामगिरी केली नाही. त्यामुळे या दोघांची सुट्टी होऊ शकते.  

पावसाची शक्यता - 
हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील भारतीय संघाला मालिकेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी तिसऱ्या सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे. पण येथील वेदर रिपोर्टमुळे क्रीडा चाहत्यांना निराशा झालाय.  भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सामन्यात पावसाची शक्यता आहे. येथील वातावरण 32 डिग्री सेल्सियसच्या आसपास  राहण्याची शक्यता आहे.  24 टक्के पावसाची शक्यता स्थानिक हवामान विभागाने वर्तवलाय.  

टीम इंडिया विरुद्ध वेस्ट इंडिज टी20 आंतरराष्ट्रीय हेड टू हेड 

टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात आतापर्यंत 27 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळवले गेले आहेत. ज्यामध्ये टीम इंडियानं 17 सामने जिंकले आहेत. तर वेस्ट इंडिजनं केवळ 9 सामने जिंकले आहेत. याव्यतिरिक्त एक सामना अनिर्णित राहिला आहे. 

भारतीय फलंदाज ढेपाळले - 
पहिल्या दोन्ही सामन्यात फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीमुळे भारतीय संघाला पराभवाचा सामना केलाय. पहिल्या सामन्यात टीम इंडिया फक्त 145 धावांपर्यंत मजल मारु शकला. हा सामना विडिंजचे 4 धावांनी जिंकला. तर दुसऱ्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना टीम इंडिया 152 धावांपर्यंत मजल मारु शकला. हा सामना विडिंजने दोन विकेटने जिंकला. अशा स्थितीत तिसऱ्या वनडे सामन्यात प्लेईंग 11 मध्ये बदलाची शक्यता आहे. 

टीम इंडियाचा टी20 संघ 
यशस्वी जायसवाल, ईशान किशन (विकेटकीपर), शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या (कर्णधार), अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, उमरान मलिक, मुकेश कुमार, कुलदीप यादव, आवेश खान, रवि बिश्नोई, तिलक वर्मा. 

वेस्ट इंडीजचा टी20 संघ 
काइल मेयर्स, जॉनसन चार्ल्स, निकोलस पूरन (विकेटकीपर), शाई होप, शिमरोन हेटमायर, रोवमॅन पॉवेल (कर्णधार), जेसन होल्डर, अकील हुसैन, अल्जारी जोसेफ, ओबेड मॅकॉय, ओशाने थॉमस, ब्रँडन किंग, ओडियन स्मिथ, रोस्टन चेस, रोमारियो शेफर्ड. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.