IND Vs WI, 3rd ODI Live : कोण जिंकणार मालिका? भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सामन्याचे लाई्व्ह अपडेट

Asia Cup 2023, Team India : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये सध्या वनडे मालिका सुरु आहे. या मालिकेनंतर भारतीय संघ आशिया चषकात खेळणार आहे.

एबीपी माझा ब्युरो Last Updated: 02 Aug 2023 02:27 AM

पार्श्वभूमी

IND Vs WI 3rd ODI Live Updates : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील अखेरचा एकदिवसीय सामना आज होणार आहे. त्रिनिदाद येथील ब्रायन लारा स्टेडिअमवर हा सामना होणार आहे. अखेरचा सामना...More

मालिका भारताने 2-1 ने जिंकली

तिसऱ्या आणि अखेरच्या एकदिवसीय मालिकेत भारताने वेस्ट इंडिजवर 200 धावांनी विजय मिळवला. भारताने दिलेल्या 352 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजची आघाडी फळी ढेपाळली. विडिंजचा संपूर्ण डाव 151 धावांत संपुष्टात आला. विडिंजच्या तळाच्या फलंदाजांनी जिगरबाज फलंदाजी करत मोठी नामुष्की टाळली. शार्दूल ठाकूर याने चार विकेट घेतल्या तर मुकेश कुमार याने तीन फलंदाजांना तंबूत पाठवले. कुलदीप यादवने दोन विकेट घेतल्या. तिसरा सामना जिंकून भारतीय संघाने मालिका 2-1 च्या फरकाने खिशात घातली.