IND vs WI, 3rd ODI LIVE BLOG: तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा 96 धावांनी विजय

IND vs WI, 3rd ODI Match, Narendra Modi Stadium: भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्डेडिअमवर खेळला जात आहे.

abp majha web team Last Updated: 11 Feb 2022 07:47 PM
तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा 96 धावांनी विजय

अखेरच्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने 96 धावांनी विजय मिळवला आहे. या विजयासह भारतीय संघाने मालिका 3-0 च्या फरकाने जिंकली आहे. 

भारताच्या गोलंदाजांसमोर वेस्ट इंडीजचा फलंदाजांनी गुडघे टेकले

भारताच्या उत्कृष्ट गोलंदाजीसमोर वेस्ट इंडीजच्या संघानं गुघडे टेकले आहेत. वेस्ट इंडीजचा स्कोर- 118-7 (23)

भारताचं वेस्ट इंडीजसमोर 266 धावांचं लक्ष्य

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर सुरू असलेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यात भारतानं वेस्ट इंडीजच्या संघासमोर 266 धावांचं लक्ष्य ठेवलंय. 

India Vs West Indies Live: भारताचा पाचवा विकेट्स! फॅबियन ऍलनच्या गोलंदाजीवर सुर्यकुमार यादव बाद

फॅबियन ऍलनच्या गोलंदाजीवर सुर्यकुमार यादव बाद झालाय. त्यानं 7 चेंडूत 6 धावा केल्या आहेत. भारताचा स्कोर- 170/5 (33.5)

श्रेयस अय्यरचं अर्धशतक

वेस्ट इंडीजविरुद्ध तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रेयस अय्यरनं अर्धशतक पूर्ण केलंय. भारताचा स्कोर- 148/3 (29.4)

IND Vs WI Live Score: भारताला तिसरा झटका, शिखर धवन 10 धावा करून बाद

भारताला तिसरा झटका लागलाय. रोहित शर्मा, विराट कोहलीनंतर शिखर धवनही स्वस्तात माघारी परतलाय. भारताचा स्कोर- 42-3 (9.3)

भारताची खराब सुरुवात; रोहित शर्मा, विराट कोहली बाद

वेस्ट इंडीजविरुद्ध तिसऱ्या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यात भारतानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. परंतु, भारताची सुरुवात खराब झालीय. कर्णधार रोहित शर्मा 13 तर, विराट कोहली शून्यावर बाद झालाय. भारताचा स्कोर- 26/2 (6.3)


 

IND Vs WI: वेस्ट इंडीजचा संघ

शाई होप (विकेटकीपर), ब्रैंडन किंग, डैरेन ब्रावो, शमर ब्रूक्स, निकोलस पूरन (कप्तान), जेसन होल्डर, फैबियन एलन, ओडियन स्मिथ, अल्जारी जोसेफ, हेडन वॉल्श, केमर रोच.

IND Vs WI: भारताचा प्लेईंग इलेव्हन 

रोहित शर्मा (कप्तान), शिखर धवन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), वॉशिंगटन सुंदर, दीपक चाहर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.

पार्श्वभूमी

IND vs WI, 3rd ODI Match, Narendra Modi Stadium: भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्डेडिअमवर खेळला जात आहे. या सामन्यासाठी टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये चार बदल करण्यात आले आहेत. कर्णधार रोहित शर्माने सांगितले की, केएल राहुल, दीपक हुडा आणि युझवेंद्र चहल यांना प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आलंय. भारताचा कप्तान रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. वेस्ट इंडीजची कमान निकोलस पूरनच्या हाती आहे. कायरन पोलार्ड अजूनही दुखापतीतून सावरलेला नाही.


भारताविरुद्ध वेस्टइंडिजचं खराब प्रदर्शन
भारताविरुद्ध एकदिवसीय मालिकेत वेस्ट इंडीजची निराशाजनक कामगिरी राहिली आहे. वेस्ट इंडीजला भारताविरुद्ध खेळण्यात आलेल्या सलग 11 एकदिवसीय मालिका गमवाव्या लागल्या आहेत. 2007 पासून वेस्ट इंडीजला भारताविरुद्ध एकही मालिका जिंकता आली नाही. वेस्ट इंडीजच्या संघानं भारताला अखेर 2006 मध्ये त्यांच्या मायदेशात 4-1 नं पराभूत केलं होतं.


एका संघाविरुद्ध सर्वाधिक मालिका जिंकण्याचा विक्रम
एका संघात सर्वाधिक मालिका जिंकण्याचा विक्रम पाकिस्तानच्या नावावर आहे. त्यानंतर भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिसऱ्या क्रमांकावर पुन्हा पाकिस्तान आहे. पाकिस्ताननं 1999 के 2017 पर्यंत वेस्ट इंडीजच्या संघाला सलग 9 मालिकेत धूळ चाखली आहे. चौथ्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेचे नाव आहे. दक्षिण आफ्रिकेनं झिम्बाब्वेविरुद्ध 1995-2018 दरम्यान सलग 9 एकदिवसीय मालिका जिंकली आहे. भारतीय संघाचे नाव पुन्हा पाचव्या क्रमांकावर आहे. टीम इंडियाने 2007 ते 2021 दरम्यान सलग 9 वनडे मालिकेत श्रीलंकेचा पराभव केला आहे.


संघ-


भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, दीपक चहर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा.


वेस्ट इंडीज: शाई होप (यष्टीरक्षक), ब्रॅंडन किंग, डॅरेन ब्राव्हो, शमारह ब्रूक्स, निकोलस पूरन (कर्णधार), जेसन होल्डर, फॅबियन ऍलन, ओडियन स्मिथ, अल्झारी जोसेफ, हेडन वॉल्श, केमार रोच.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.