IND vs WI, 2nd T20 Live Blog: भारत विरुद्ध वेस्ट इंडीज दुसऱ्या टी20 सामन्यातील प्रत्येक अपडेट्स, एका क्लिकवर

IND vs WI 2nd T20 LIVE Updates : पहिला टी20 सामना जिंकल्यानंतर आता दुसरा सामना जिंकून भारत मालिकेत विजयी आघाडी घेण्यासाठी सज्ज झाला आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 18 Feb 2022 05:49 PM
भारतीय संघाचा आठ धावांनी विजय

दुसऱ्या टी20 सामन्यात भारतीय संघाने आठ धावांनी विजय मिळवला आहे. या विजयासह भारताने तीन सामन्याची मालिका 2-0 च्या फरकाने जिंकली आहे. 

सामना रोमांचक स्थितीत

वेस्ट विंडिजला विजयासाठी सहा चेंडूत 25 धावांची गरज आहे. सामना रोमांचक स्थितीत पोहचला आहे. 19 व्या षटकांत भुवनेश्वर कुमार याने निकोलस पूरनला बाद करत भारताच्या विजयाच्या आशा उंचावल्या.

पूरनचा अडथला दूर

मोक्याच्या क्षणी निकोलस पूरन बाद, भूवनेश्वर कुमारने घेतली विकेट

पूरन आणि पॉवेलची दमदार खेळी

निकोलस पूरन आणि पॉवेलने तुफानी फलंदाजी केली आहे. दोघांनीही अर्धशतकी खेळी केली आहे. वेस्ट इंडिजला विजयासाठी 14 चेंडूत 34 धावांची गरज

चहलने मिळवून दिलं पहिलं यश

फिरकीपटू युझवेंद्र चहलने काईल मेयर्सला तंबूत धाडलं आहे.

वेस्ट इंडीजसमोर 187 धावाचं लक्ष्य

भारताने दमदार फलंदाजी करत 186 धावा स्कोरबोर्डवर लावल्या आहेत. ज्यामुळे वेस्ट इंडीजला आता 20 षटकांत 187 धावा करायच्या आहेत.

पंतचं अर्धशतक पूर्ण

पंतने तुफान खेळी करत अर्धशतक पूर्ण केलं आहे. 27 चेंडूत त्याने अर्धशतक झळकावलं आहे.

अय्यर-पंतची तुफान खेळी

ऋषभ पंत आणि व्यंकटेश अय्यर दोघेही तुफान फलंदाजी करत आहेत.

विराट तंबूत परत

आज चांगल्या फॉर्ममध्ये असणारा विराट अर्धशतक पूर्ण करताच त्याच षटकात त्रिफळाचीत झाला आहे.

विराट ON FIRE

विराट कोहली आज भलत्याच फॉर्ममध्ये दिसत आहे. त्याने नुकतचं अर्धशतक पूर्ण केलं असून तेही षटकार ठोकत पूर्ण केलं आहे.

भारताची खराब सुरुवात, टॉप ऑर्डरचे 3 फलंदाज माघारी परतले

भारताची खराब सुरुवात झाली असून टॉप ऑर्डरचे 3 फलंदाज माघारी परतले आहेत. रोहित शर्मा, ईशान किशन आणि सुर्यकुमार यादवला या सामन्यात मोठी खेळी करता आली नाही. 

भारताला पहिला झटका, कर्णधार रोहित शर्मा बाद

भारताचा कर्णधार रोहित शर्मा बाद झालाय. 

भारताला पहिला झटका

ईशान किशन 2 धावा करुन बाद झाला आहे, आता क्रिजवर विराट-रोहित आहेत.

IND vs WI: सामन्याला सुरुवात

सामन्याला सुरुवात झाली असून भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि ईशान किशन मैदानात उतरले आहेत.

WI T20I squad: दुसऱ्या टी-20 सामन्यासाठी वेस्ट इंडीज संघ (

ब्रँडन किंग, काईल मेयर्स, निकोलस पूरन (विकेटकिपर), रोवमॅन पोवेल, कायरन पोलार्ड (कर्णधार), रोस्टन चेस, रोमारियो शेफर्ड, अकेल होसेन, ओडेन स्मिथ, जेसन होल्डर, शेल्डॉन कॉट्रेल

दुसऱ्या टी-20 सामन्यासाठी भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, विराट कोहली, सुर्यकुमार यादव, ऋषभ पंत (उपकर्णधार/विकेटकिपर), वेंकटेश अय्यर, दीपक चहर, रवी बिश्नोई, युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल

IND Vs WI: वेस्ट इंडीजच्या संघानं नाणेफेक जिंकलं, प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय 

कोलकात्याच्या ईडन गार्डनवर खेळण्यात येणाऱ्या दुसऱ्या टी-20 सामन्यात वेस्ट इंडीजनं नाणफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. 

IND vs WI : पोलार्ड खेळणार 100 वा टी20 सामना

महाविकास आघाडीच्या विकासाच्या कामाला जनतेची साथ महत्वाची - आदित्य ठाकरे

आता कोव्हिडचा नाश होऊ दे. साईबाबांच्या दरबारात सुद्धा हीच प्रार्थना केली. जेव्हा मंत्र्याची यादी तयार केली जात होती तेव्हा उद्धव ठाकरेंनी गडाख यांच नाव पुढे आणलं. मागच्या सरकारमध्ये जे प्रदूषण झालं ते स्वच्छ करण्याचं काम आपण आज करतोय. भाजपला प्रदूषण म्हणत टोला लगावला. घाणेरडे राजकारण करण्याची जबाबदारी भाजप ने घेतली आहे. मात्र महाविकास आघाडी माज न आणता जनतेची सेवा करतोय. महाविकास आघाडीच्या विकासाच्या कामाला जनतेची साथ महत्वाची. कोव्हिड काळात जनतेच्या गरजेचं करत होतो नाही तर दुसरीकडे लखीमपूर सारख्या घटना घडल्या आणि आज निवडणुकीच्या तोंडावर त्याला बाहेर सोडलं. प्रत्येक ठिकाणी विरोधक केवळ राजकारण करताय. सत्तेचा माज मनात आणू नका, जनतेची काम करा. सरकार येतील जातील मात्र आपलं ध्येय बदलू नका हीच आमची शिकवण आहे. 

IND vs WI : दुसऱ्या सामन्यासाठी मैदान सज्ज

दुसऱ्या टी20 सामन्याला सुरु होण्यासाठी तासभर शिल्लक असताना बीसीसीआयने मैदानाचा फोटो पोस्ट केला आहे.

पार्श्वभूमी

IND vs WI 2nd T20 LIVE: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (IND vs WI) यांच्यात टी20 मालिका सुरु असून भारताने पहिला टी20 सामना (1st T20match) जिंकत मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली आहे. आता आज दुसरा टी20 सामना (2nd T20 Match) कोलकात्याच्या ईडन गार्डन्स (Eden Garden Stadium) या क्रिकेट ग्राउंडवर खेळवण्यात येत आहे. एकदिवसीय सामन्यांची मालिका 3-0 ने जिंकत भारत आता टी20 मालिकेतील आजचा सामना जिंकून मालिकेत 2-0 ची विजयी आघाडी घेण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे.  

कोलकात्याच्या ईडन गार्डनची खेळपट्टी फलंदाजासाठी अनुकूल असते. या खेळपट्टीवर फलंदाजांना अधिक फायदा मिळण्याची शक्यता आहे. आज मैदानावर धुके असण्याची शक्यता आहे. यामुळं नाणेफेक जिंकणार संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेईल. शुक्रवारी येथे हवामान निरभ्र राहण्याचा अंदाज आहे. म्हणजे पावसाची शक्यता नसल्यानं सामना पूर्ण खेळला जाईल. येथील तापमान कमाल 29 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 16 अंश सेल्सिअसपर्यंत खाली येऊ शकते. तर, 13 किलोमीटर प्रतितास हवा वाहण्याची शक्यता आहे.

अंतिम 11

भारतीय संघ (India’s T20I squad) -

रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, विराट कोहली, सुर्यकुमार यादव, ऋषभ पंत (उपकर्णधार/विकेटकिपर), वेंकटेश अय्यर, दीपक चहर, रवी बिश्नोई, युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल

वेस्ट इंडीज संघ (WI T20I squad) -

ब्रँडन किंग, काईल मेयर्स, निकोलस पूरन (विकेटकिपर), रोवमॅन पोवेल, कायरन पोलार्ड (कर्णधार), रोस्टन चेस, रोमारियो शेफर्ड, अकेल होसेन, ओडेन स्मिथ, जेसन होल्डर, शेल्डॉन कॉट्रेल

तिसऱ्या सामन्यात प्रेक्षकांना परवानगी?

तिसरा टी-20 सामना 20 फेब्रुवारी रोजी कोलकात्याच्याच ईडन गार्डन येथे होणार आहे. दरम्यान या सामन्यात प्रेक्षकांना परवानगी मिळणार आहे. भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील या टी-20 सामन्यात प्रेक्षकांना परवागनी देण्यात यावी, अशी विनंती बंगाल क्रिकेट असोसिएशननं बीसीसीआयकडं केली होती. त्यानंतर बीसीसीआयनं अखेरच्या टी-20 सामन्यात 20 हजार प्रेक्षकांना परवानगी देण्याचा निर्णय घेतलाय. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.