IND Vs WI, 2nd T20 Live : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा टी20 सामना आज, कोण मारणार बाजी?

IND Vs WI 2nd T20 Live Updates : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आज (रविवार, 6 ऑगस्ट 2023) दुसरा टी 20 सामना होणार आहे.

एबीपी माझा ब्युरो Last Updated: 06 Aug 2023 11:41 PM
विडिंजने सामना जिंकला

अटीतटीच्या लढतीत वेस्ट इंडिजने भारताचा दोन विकेटने पराभव केला. भारातने दिलेले 153 धावांचे आव्हान विडिंजने दोन आठ विकेटच्या मोबदल्यात सहज पार केले. विडिंजकडून निकोलस पूरन याने 67 धावांची दमदार खेळी केली. या विजयासह विडिंजने मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली आहे. 

वेस्ट इंडिजची फलंदाजी ढेपाळली

वेस्ट इंडिजची फलंदाजी ढेपाळली....

विडिंजला लागोपाठ दुसरा धक्का

युजवेंद्र चहल याने विडिंजला लागोपाठ दुसरा धक्का दिलाय. वेस्ट इंडिज सात बाद 128 धावा

वेस्ट इंडिजला सहावा धक्का

वेस्ट इंडिजला सहावा धक्का बसलाय... मोक्याच्या क्षणी चहल याने शेफर्ड याला बाद केलेय

वेस्ट इंडिजचा अर्ध संघ तंबूत

सामना रंगतदार अवस्थेत पोहचलाय. वेस्ट इंडिजचा अर्धा संघ तंबूत परतलाय. 

विडिंजला चौथा धक्का

विडिंजला  चौथा धक्का बसलाय... विडिंजला विजयासाठी 57 चेंडूत 61 धावांची गरज 

वेस्ट इंडिजला तीन धक्के

वेस्ट इंडिजने विस्फोटक सुरुवात केली. पण तीन विकेट गमावल्या आहेत. विडिंजने 6 षटकात 63 धावा केल्या आहेत. 

वेस्ट इंडिजचा भेदक मारा - 

वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी पहिल्या षटकांपासूनच भेदक मारा केला. त्यांनी भारतीय फलंदाजांना स्थिरावू दिले नाही. तिलक वर्माचा अपवाद वगळता एकाही भारतीय फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. वेस्ट इंडिजकडून अल्झारी जोसेफ, शेफर्ड आणि अकिल हुसेन यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. 

संजू-गिल अन् सूर्या फ्लॉपच 

प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाची सुरुवात अतिशय निराशाजनक झाली. सलामी फलंदाज शुभमन गिल याने पुन्हा एकदा निराशाजनक कामगिरी केली. गिल अवघ्या सात धावा काढून तंबूत परतला. अल्झारी जोसेफ याने गिल याचा अडथळा दूर झाला. दुसऱ्या क्रमांकावर आलेला सूर्यकुमार एका धावेवर धावबाद झाला अन् भारताची फलंदाजी अडचणीत आली. संजू सॅमसन यालाही संधीचे सोनं करता आले नाही. संजू सॅमसन अवघ्या सात धावा काढून बाद झाला. संजू, शुभमन गिल आणि सूर्यकुमार यादव यांना पहिल्या टी20 सामन्यातही लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नव्हती. 

हार्दिक -ईशानची सुरुवात चांगली पण... 

ईशान किशन याला चांगली सुरुवात मिळाली पण तो मोठी धावसंख्या उभारु शकला नाही. ईशान किशन याने 27 धावांची छोटेखानी खेळी केली. ईशान किशन याने या खेळीमध्ये दोन षटकार आणि दोन चौकार लगावले. ईशान किशन प्रमाणे हार्दिक पांड्यालाही सुरुवात मिळाली पण मोठी धावसंख्या उभारता आली नाही. हार्दिक पांड्याने मोक्याच्या क्षणी विकेट फेकली. हार्दिक पांड्याने 18 चेंडूत दोन चौकारांसह 24 धावांची खेळी केली. हाणामारीच्या षटकात पांड्या बाद झाल्यामुळे भारतीय संघाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. हार्दिक पांड्यानंतर अक्षर पटेल यानेही विकेट फेकली. अक्षर पटेल याला फक्त 14 धावा करता आल्या. रवि बिश्नोई आणि अर्शदीप सिंह यांनी अखेरच्या षटकात चौकार षटकार लगावल्यामुळे भारताची धावसंख्या 152 पर्यंत पोहचली. 

तिलक वर्माचा झंझावात - 

 


पहिल्या टी20 सामन्यात वादळी फलंदाजी करणाऱ्या तिलक वर्माने दुसऱ्या टी20 सामन्यात झंझावाती फलंदाजी केली. तिलक वर्माने अर्धशतकी खेळी करत भारताचा डाव सावरला. त्याने 41 चेंडूत 51 धावांची खेळी केली. आपल्या दुसऱ्याच सामन्यात तिलक वर्माने अर्धशतक ठोकलेय. तिलक वर्मा याने आपल्या अर्धशतकी खेळीमध्ये पाच चौकार आणि दोन षटकार ठोकले. तिलक वर्माने ईशान किशन याच्यासोबत 36 चेंडूत 42 तर हार्दिक पांड्यासोबत 27 चेंडूत 38 धावांची भागिदारी करत भारताच्या डावाला आकार दिला.  

भारताची 152 धावांपर्यंत मजल

तिलक वर्माच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर भारतीय संघाने निर्धारित 20 षटकांत 152 धावांपर्यंत मजल मारली. तिलक वर्माने 51 धावांची खेळी केली. तिलक वर्माचा अपवाद वगळता इतर एकाही फलंदाला 30 धावसंख्या ओलांडता आली नाही. वेस्ट इंडिजला विजयासाठी 153 धावांचे आव्हान देण्यात आलेय. विडिंजकडून अल्झारी जोसेफ आणि अकिल हुसेन यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. 

भारताला सातवा धक्का

अक्षर पटेल 14 धावांवर बाद झाला..भारताला सातवा धक्का

फिनिशिंगची जबाबदारी अक्षरकडे

कर्णधार माघारी परतल्यानंतर फिनिशिंगची जबाबदारी अक्षेर पटेल याच्याकडे आली आहे. तळाच्या फलंदाजांना हाताशी धरत धावसंख्या वाढवावी लागणार आहे. 

हार्दिकच्या रुपाने सहावा धक्का

हार्दिकच्या रुपाने सहावा धक्का बसला आहे. कर्णधार हार्दिक मोक्याच्या क्षणी बाद झाला. 

भारताला पाचवा धक्का

अर्धशतकानंतर तिलक वर्मा बाद झाला. भारताला पाचवा धक्का बसला. 

भारताला चौथा धक्का

संजू सॅसमन पुन्हा एकदा फ्लॉप गेलाय.. संजूला फक्त सात धावांवर बाद झाला...  भारत चार बाद 77 धावा

तिसरा धक्का

ईशान किशनच्या रुपात भारताला तिसरा धक्का बसला आहे. ईशान किशन 27 धावांवर बाद झाला. तिलक वर्मा आणि संजू मैदानावर

भारताचे अर्धशतक

तिलक वर्मा आणि ईशान किशन मैदानावर... भारत दोन बाद 60

भारताला दुसरा धक्का

भारताला दुसरा धक्का...सूर्यकुमार यादव स्वस्तात बाद....   भारत दोन बाद 22 धावा

ईशान किशन बाद

भारताला पहिला धक्का...ईशान किशन बाद

ईशान किशन-शुभमन गिल मैदानात

भारताची फलंदाजी सुरु... ईशान किशन-शुभमन गिल मैदानात

वेस्ट इंडिजचे 11 शिलादार कोण?

 


काइल मेयर्स, ब्रेंडन किंग, जॉनसन चार्ल्स, निकोलस पूरन (विकेटकीपर), शिम्रोन हेटमेयर, रोवमैन पॉवेल (कर्णधार), जेसन होल्डर, रोमारियो शेफर्ड, अकील होसेन, अल्ज़ारी जोसेफ आणि ओबेड मैककॉय

भारताची प्लेईंग 11 -

 


शुभमन गिल, ईशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), संजू सॅमसन, अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, रवि बिश्नोई आणि मुकेश कुमार

कुलदीप यादव दुखापतग्रस्त

भारताने नाणेफेक जिंकली

भारताने नाणेफेक जिंकली... प्रथम फलंदाजीचा निर्णय

टीम इंडिया कमबॅक करणार का?

पहिल्या टी 20 सामन्यात वेस्ट इंडिजने 150 धावांचे आव्हान दिले होते. विडिंजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. 20 षटकात विडिंजने सहा विकेटच्या मोबदल्यात 149 धावा केल्या होत्या. 150 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचे आघाडीचे फलंदाज सपशेल अपयशी ठरले होते. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील भारतीय संघाने 9 विकेटच्या मोबदल्यात 145 धावांपर्यंत मजल मारली होती. पहिला सामना चार धावांनी जिंकून विडिंजने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता दुसरा सामना जिंकून टीम इंडिया कमबॅक करणार का ? की वेस्ट इंडिज मालिकेतील आघाडी अधिक भक्कम करणार ? याकडे क्रीडा चाहत्यांचे लक्ष लागलेय. 

वेस्ट इंडीजचा टी20 संघ 

काइल मेयर्स, जॉनसन चार्ल्स, निकोलस पूरन (विकेटकीपर), शाई होप, शिमरोन हेटमायर, रोवमॅन पॉवेल (कर्णधार), जेसन होल्डर, अकील हुसैन, अल्जारी जोसेफ, ओबेड मॅकॉय, ओशाने थॉमस, ब्रँडन किंग, ओडियन स्मिथ, रोस्टन चेस, रोमारियो शेफर्ड

टीम इंडियाचा टी20 संघ 

यशस्वी जायसवाल, ईशान किशन (विकेटकीपर), शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या (कर्णधार), अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, उमरान मलिक, मुकेश कुमार, कुलदीप यादव, आवेश खान, रवि बिश्नोई, तिलक वर्मा. 

लाईव्ह स्ट्रिमिंग कुठे पाहाल? 

टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळवण्यात येणारा दुसरा टी20 आंतरराष्ट्रीय सामन्याला फॅनकोड (अॅप आणि वेबसाईट) आणि जियो सिनेमा (अॅप आणि वेबसाईट) मार्फत लाईव्ह स्ट्रिम केलं जाईल. जिओवर सामना मोफत पाहता येईल.


एबीपी माझाच्या संकेतस्थाळावरही भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सामन्याबाबत तुम्हाला सर्व माहिती मिळणार आहे.

टीव्हीवर कुठे पाहाल लाईव्ह? 

टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळवण्यात येणारा दुसरा टी20 आंतरराष्ट्रीय सामना भारतात टीव्हीवर दूरदर्शनमार्फत लाईव्ह प्रसारित केला जाईल. 

कधी आहे सामना? 

टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा टी20 आंतरराष्ट्रीय सामना 6 ऑगस्ट, रविवारी खेळवला जाईल. भारतीय वेळेनुसार, सामना रात्री 8 वाजता सुरू होईल, तर संध्याकाळी 7.30 वाजता नाणेफेक होईल. 

कुठे खेळला जाणार सामना? 






टीम इंडिया विरुद्ध वेस्ट इंडिज टी20 आंतरराष्ट्रीय हेड टू हेड 

 


टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात आतापर्यंत 26 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळवले गेले आहेत. ज्यामध्ये टीम इंडियानं 17 सामने जिंकले आहेत. तर वेस्ट इंडिजनं केवळ 8  सामने जिंकले आहेत. याव्यतिरिक्त एक सामना अनिर्णित राहिला आहे. 

थोड्याच वेळात होणार नाणेफेक

थोड्याच वेळात होणार नाणेफेक.. कोण मारणार बाजी

पार्श्वभूमी

IND Vs WI 2nd T20 Live Updates : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आज (रविवार, 6 ऑगस्ट 2023) दुसरा टी 20 सामना होणार आहे. पाच सामन्याच्या मालिकेतील पहिला सामना जिंकून वेस्ट इंडिजने आघाडी घेतली आहे. आता दुसऱ्या सामन्यात विजय मिळवत कमबॅक करण्यासाठी टीम इंडिया उतरणार आहे. 


वेस्ट इंडिज आणि भारत हे दोन्ही संघ गयानामध्ये आमनेसामने असतील. पहिल्या T20 सामन्यात वेस्ट इंडिजने भारतीय संघाचा 4 धावांनी पराभव केला. मात्र, या सामन्यात टीम इंडिया पुनरागमन करण्याच्या इराद्याने उतरणार आहे. त्याचबरोबर वेस्ट इंडिज संघाला हा सामना जिंकून मालिकेत आघाडी घेण्याची संधी आहे.  पण या सामन्यासाठी दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन कशी असेल? तसेच, सामना कुठे आणि कसा पहायचा, याबाबत जाणून घेऊयात


टीम इंडिया विरुद्ध वेस्ट इंडिज टी20 आंतरराष्ट्रीय हेड टू हेड 


टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात आतापर्यंत 26 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळवले गेले आहेत. ज्यामध्ये टीम इंडियानं 17 सामने जिंकले आहेत. तर वेस्ट इंडिजनं केवळ 8  सामने जिंकले आहेत. याव्यतिरिक्त एक सामना अनिर्णित राहिला आहे. 









टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा टी20 सामना प्रोव्हिडन्स स्टेडिअम, गयानामध्ये खेळवला जाईल. 


कधी आहे सामना? 
टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा टी20 आंतरराष्ट्रीय सामना 6 ऑगस्ट, रविवारी खेळवला जाईल. भारतीय वेळेनुसार, सामना रात्री 8 वाजता सुरू होईल, तर संध्याकाळी 7.30 वाजता नाणेफेक होईल. 


टीव्हीवर कुठे पाहाल लाईव्ह? 
टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळवण्यात येणारा दुसरा टी20 आंतरराष्ट्रीय सामना भारतात टीव्हीवर दूरदर्शनमार्फत लाईव्ह प्रसारित केला जाईल. 


लाईव्ह स्ट्रिमिंग कुठे पाहाल? 
टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळवण्यात येणारा दुसरा टी20 आंतरराष्ट्रीय सामन्याला फॅनकोड (अॅप आणि वेबसाईट) आणि जियो सिनेमा (अॅप आणि वेबसाईट) मार्फत लाईव्ह स्ट्रिम केलं जाईल. जिओवर सामना मोफत पाहता येईल.


एबीपी माझाच्या संकेतस्थाळावरही भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सामन्याबाबत तुम्हाला सर्व माहिती मिळणार आहे.


भारताची संभावित प्लेईंग 11 -


शुभमन गिल, ईशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), संजू सॅमसन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह आणि मुकेश कुमार


वेस्ट इंडिजचे 11 शिलादार कोण?


काइल मेयर्स, ब्रेंडन किंग, जॉनसन चार्ल्स, निकोलस पूरन (विकेटकीपर), शिम्रोन हेटमेयर, रोवमैन पॉवेल (कर्णधार), जेसन होल्डर, रोमारियो शेफर्ड, अकील होसेन, अल्ज़ारी जोसेफ आणि ओबेड मैककॉय



टीम इंडियाचा टी20 संघ 
यशस्वी जायसवाल, ईशान किशन (विकेटकीपर), शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या (कर्णधार), अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, उमरान मलिक, मुकेश कुमार, कुलदीप यादव, आवेश खान, रवि बिश्नोई, तिलक वर्मा. 


वेस्ट इंडीजचा टी20 संघ 
काइल मेयर्स, जॉनसन चार्ल्स, निकोलस पूरन (विकेटकीपर), शाई होप, शिमरोन हेटमायर, रोवमॅन पॉवेल (कर्णधार), जेसन होल्डर, अकील हुसैन, अल्जारी जोसेफ, ओबेड मॅकॉय, ओशाने थॉमस, ब्रँडन किंग, ओडियन स्मिथ, रोस्टन चेस, रोमारियो शेफर्ड. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.