= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
भारताची भक्कम सुरुवात, केएल राहुलचं नाबाद अर्धशतक, पहिल्या दिवसअखेर भारताच्या 2 बाद 121 धावा वेस्ट इंडीजला 162 धावांवर बाद केल्यानंतर भारतानं पहिल्या डावात चांगली सुरुवात केली आहे. यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल या दोघांनी पहिल्या विकेट साठी 68 धावांची भागीदारी केली. यशस्वी जयस्वाल 36 धावा करुन बाद झाला. साई सुदर्शन मोठी कामगिरी करु शकला नाही. केएल राहुल 53 धावांवर नाबाद असून कॅप्टन शुभमन गिल 18 धावांवर खेळतोय.
= liveblogState.currentOffset ? 'center_block hidden' : 'center_block'">
Continues below advertisement
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
IND vs WI 1st Test Live Score Day 1 : पावसामुळे खेळ थांबवण्यात आला पावसामुळे खेळ थांबवण्यात आला आहे. तिसऱ्या सत्रात खेळ थांबवण्यात आला तेव्हा भारताने पहिल्या डावात 12.4 षटकांत एकही विकेट न गमावता 23 धावा केल्या होत्या. सध्या यशस्वी जैस्वाल चार धावांवर नाबाद आहे आणि केएल राहुल 18 धावांवर नाबाद आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
IND vs WI 1st Test Live Score Day 1 : मोहम्मद सिराजचा विकेटचा 'चौकार', वेस्ट इंडिज खेळ खल्लास, पहिला डाव 162 धावांवर आटोपला, जाणून घ्या अपडेट्स वेस्ट इंडिजचा पहिला डाव 162 धावांत आटोपला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेणाऱ्या वेस्ट इंडिजकडून जस्टिन ग्रीव्हजने सर्वाधिक 32 धावा केल्या. साडेचार तासांतच संघ ऑलआऊट झाला. भारताकडून मोहम्मद सिराजने चार, तर जसप्रीत बुमराहने तीन विकेट घेतल्या. कुलदीप यादवने दोन आणि वॉशिंग्टन सुंदरने एक विकेट घेतली.
= liveblogState.currentOffset ? 'center_block hidden' : 'center_block'">
Continues below advertisement
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
IND vs WI 1st Test Live Score Day 1 : मोहम्मद सिराजचा कहर! वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या कसोटीत विकेटचा 'चौकार', जाणून घ्या अपडेट्स मोहम्मद सिराजने रोस्टन चेसला बाद करून वेस्ट इंडिजला सहावी विकेट मिळवून दिली. सिराजने पहिल्या डावात आधीच चार विकेट घेतल्या आहेत. वेस्ट इंडिजने 105 धावांत सहा विकेट गमावल्या आहेत. चेस 43 चेंडूत 24 धावा काढून बाद झाला, ज्यामध्ये चार चौकारांचा समावेश होता. जस्टिन ग्रीव्हज आणि खॅरी पियरे सध्या क्रीजवर आहेत.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
IND vs WI 1st Test Live Score Day 1 : मोहम्मद सिराजचा कहर! लंच ब्रेकपर्यंत वेस्ट इंडिजचा अर्ध्या संघ तंबूत, पहिला डाव 90/5, जाणून घ्या अपडेट्स लंच ब्रेकपर्यंत वेस्ट इंडिजचा अर्ध्या संघ तंबूत गेला आहे. कुलदीप यादवच्या फिरकी शाई होप फिसला. कुलदीपचा हा सामन्यातील पहिला विकेट आहे. वेस्ट इंडिजचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला आहे आणि धावसंख्या 100 च्या पुढेही गेलेली नाही. चार विकेट पडल्यानंतर होप आणि रोस्टन चेसने चांगली भागीदारी रचली होती, परंतु कुलदीपने ती मोडली. वेस्ट इंडिजचा धावसंख्या सध्या 90/5 आहे. रोस्टन चेस 22 धावांवर नाबाद आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
IND vs WI 1st Test Live Score Day 1 : पहिल्या एक तासात वेस्ट इंडिजचा टॉप ऑर्डर फ्लॉप; दिग्गज 4 फलंदाज तंबूत, जाणून घ्या अपडेट्स सामना सकाळी 9:30 वाजता सुरू झाला. पहिल्या तासात पूर्णपणे मोहम्मद सिराजने वर्चस्व गाजवले, त्याने तीन विकेट्स घेतल्या. 12 षटकांनंतर वेस्ट इंडिजची धावसंख्या 42/4 आहे. जसप्रीत बुमराहने एक विकेट घेतली. 13 व्या षटकात नितीशकुमार रेड्डीला गोलंदाजी करण्यासाठी बोलावण्यात आले. सध्या रोस्टन चेस (0*) आणि शाई होप (0*) क्रीजवर आहेत.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
IND vs WI 1st Test Live Score Day 1 : गुजरातमध्ये मोहम्मद सिराजचा कहर! ब्रँडन किंगला 10 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर सिराजने आऊट केले. 10 षटकांनंतर, वेस्ट इंडिजची धावसंख्या 39/3 आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
वेस्ट इंडिजला दुसरा धक्का; जसप्रीत बुमराहने पटकावली विकेट वेस्ट इंडिजला दुसरा धक्का बसला आहे. जस्रपीत बुमराहने जॉन कॅम्पबेल 8 धावांवर झेलबाद झाला. वेस्ट इंडिजचा स्कोअर: 20/2.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
वेस्ट इंडिजला पहिला धक्का; मोहम्मद सिराजने चंद्रपॉलला केले बाद मोहम्मद सिराजने तेजनारायण चंद्रपॉलला झेलबाद करून वेस्ट इंडिजला पहिला धक्का दिला. चौथ्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर फलंदाजाने लेग साईडवर टाकलेला चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू कडेला लागून स्टंपच्या मागे गेला आणि यष्टिरक्षक ध्रुव जुरेलने एक शानदार झेल घेतला. वेस्ट इंडिजची सध्याची धावसंख्या 12/1.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
IND vs WI 1st Test Live Score Day 1 : भारतीय संघाची प्लेइंग-11 शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, नितीश कुमार रेड्डी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
IND vs WI 1st Test Live Score Day 1 : वेस्ट इंडिज संघाची प्लेइंग-11 रोस्टन चेस (कर्णधार), तेजनारायण चंद्रपॉल, जॉन कॅम्पबेल, ॲलिक अथानाझे, ब्रँडन किंग, शाई होप (यष्टीरक्षक), जस्टिन ग्रीव्हज, जोमेल वॅरिकन, खारी पियरे, जोहान लिन, जेडेन सील्स.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
IND vs WI 1st Test Live Score Day 1 : कर्णधार गिलचा मोठा निर्णय भारतीय संघाने तीन फिरकीपटू, दोन वेगवान गोलंदाज आणि नितीश रेड्डी या वेगवान गोलंदाजाला मैदानात उतरवले. हे तीन फिरकीपटू रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर आणि कुलदीप यादव आहेत, तर दोन वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज आहेत. भारतीय संघाने अपोलो टायर्सची नवीन जर्सी घालून सामन्यात प्रवेश केला.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
IND vs WI 1st Test Live Score Day 1 : पहिल्या कसोटीत भारताविरुद्ध वेस्ट इंडिजने जिंकली नाणेफेक! वेस्ट इंडिजचा कर्णधार रोस्टन चेसने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
IND vs WI 1st Test Live Score Day 1 : 10 महिन्यांनंतर मायदेशात कसोटी मालिका भारतीय क्रिकेट संघ 10 महिन्यांनंतर मायदेशात कसोटी मालिका खेळत आहे. न्यूझीलंडचा मागील भारत दौरा नोव्हेंबर 2024 मध्ये होता, जिथे त्यांनी तीन सामन्यांची मालिका 3-0 ने जिंकली होती.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
IND vs WI 1st Test Live Score Day 1 : 2000 पासून भारताचा घरच्या मैदानावरचा विक्रम टीम इंडियाने 2000 पासून घरच्या मैदानावर खेळलेल्या 79 टक्के मालिका जिंकल्या आहेत. हा कोणत्याही संघाचा सर्वोत्तम घरच्या मैदानावरचा विक्रम आहे. 2000 पासून भारताने 33 मालिका खेळल्या आहेत, त्यापैकी फक्त चार मालिका गमावल्या आहेत.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
IND vs WI 1st Test Live Score Day 1 : पहिल्यांदाच असे होणार... भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील मालिकेतील पहिला कसोटी सामना अहमदाबाद येथे खेळला जात आहे. अश्विन, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या निवृत्तीनंतर घरच्या मैदानावर खेळला जाणारा हा पहिलाच कसोटी सामना आहे.