IND Vs WI, 1st T20 Live : विडिंजपुढे युवा टीम इंडियाचे आव्हान, पहिल्या टी20 सामन्याचे लाईव्ह अपडेट

IND Vs WI 1st T20 Live Updates : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये आजपासून पाच सामन्याच्या टी 20 मालिकेला सुरुवात होणार आहे.

एबीपी माझा ब्युरो Last Updated: 03 Aug 2023 11:53 PM
वेस्ट इंडिजचा पाच धावांनी विजय

IND Vs WI, 1st T20 : पहिल्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजने पाच धावांनी विजय मिळवला आहे. वेस्ट इंडिजने दिलेल्या 150 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाला 9 विकेटच्या मोबल्यात 145 धावाच करता आल्या. भारताकडून तिलक वर्मा याने सर्वाधिक 39 धावांची खेळी केली. पाच सामन्याच्या टी 20 मालिकेत वेस्ट इंडिजने 1-0 ने आघाडी घेतली.

भारताला आठवा धक्का

कुलदीप यादव याला बाद करत भारताला आठवा धक्का दिला. भारताला विजयासाठी पाच चेंडूत दहा धावांची गरज

भारताला सातवा धक्का

अक्षर पटेलच्या रुपाने भारताला सातवा धक्का बसलाय. अक्षर पटेल 13 धावा काढून बाद झाला. 

जेसन होल्डरचा भेदक मारा

150 धावांच्या आव्हानाचा बचाव करताना अनुभवी जेसन होल्डरने भेदक मारा केला. होल्डरने 4 षटकात 19 धावांच्या मोबदल्यात 2 विकेट घेतल्या. यामध्ये एक षटक निर्धाव फेकले. 

भारताला सहावा धक्का

संजू सॅमसनच्या रुपाने भारताला सहावा धक्का बसलाय. संजू सॅमसन 12 धावांवर धावबाद झाला. 

भारताला मोठा धक्का

हार्दिक पांड्याच्या रुपाने भारताला पाचवा धक्का बसला. जेसन होल्डरने हार्दिक पांड्याला 19 धावांवर बाद केले. भारताला विजयासाठी 29 चेंडूत 37 धावांची गरज आहे. 

कर्णधारपदाला साजेशी खेळी

आघाडीचे चार फलंदाज तंबूत परतल्यानंतर कर्णधार हार्दिक पांड्याने संजू सॅमसन याला हाताशी धरत भारताची धावसंख्या वाढवली. 

टीम इंडियाचे शतक

14.2 षटकात भारतीय संघाचे शतक फलकावर लागलेय. भारतीय संघाला 33 चेंडूत 48 धावांची गरज आहे. हार्दिक पांड्या आणि संजू सॅमसन मैदानावर आहेत

पदार्पणात तिलक वर्माची दमदार कामगिरी

सलामी फलंदाज माघारी परतल्यानंतर सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांनी मोर्चा सांभाळला. अनुभवी सूर्याने चांगली सुरुवात केली, पण तो 21 धावांवर तंबूत परतला. सूर्यकुमार यादवने 21 चेंडूत एक षटकार आणि दोन चौकारांच्या मदतीने 21 धावांचे योगदान दिले. सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांनी तिसऱ्या विकेटसाठी 39 धावांची भागिदारी केली. सूर्यकुमार माघारी परतल्यानंतर तिलक वर्माही फार काळ टिकला नाही. संघाच्या 77 धावा झाल्यानंतर तिलक वर्माही बाद झाला. तिलक वर्माने पदार्पणात विस्फोटक फलंदाजी केली. तिलक वर्माने 22 चेंडूत 39 धावांची खेळी केली. तिलक वर्माने तीन खणखणीत षटकार ठोकले. त्याशिवाय दोन चौकार मारले.

सलामी फलंदाज फ्लॉप

वेस्ट इंडिजने दिलेल्या 150 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात अतिशय निराशाजनक झाली. आघाडीच्या फलंदाजंनी निराशाजनक कामगिरी केली. ईशान किशन आणि शुभमन गिल यांना मोठी खेळी करता आली नाही. दोन्ही सलामी फलंदाजांना दुहेरी धावसंख्याही पार करता आली नाही. ईशान किशन अवघ्या सहा धावांवर तंबूत परतला. तर शुभमन गिल अवघ्या तीन धावा काढून बाद झाला. ईशान किशन याने 9 चेंडूत एका चौकाराच्या मदतीने सहा धावा केल्या. 28 धावांत भारताने दोन विकेट गमावल्या होत्या. 

भारताचे चार फलंदाज तंबूत परतले

150 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाचे चार फलंदाज तंबूत परतले. भारताला विजयसाठी 53 चेंडूत 72 धावांची गरज

वेस्ट इंडिजला सहावा धक्का

वेस्ट इंडिजला सहावा धक्का बसला.... 

वेस्ट इंडिजचा अर्धा संघ तंबूत

134 धावांत वेस्ट इंडिजचा अर्धा संघ तंबूत

वेस्ट इंडिजचे शतक

15 व्या षटकात वेस्ट इंडिजने शंभर धावांचा टप्पा पार केलाय. 

विडिंजला चौथा धक्का

निकोलस पूरनच्या रुपाने वेस्ट इंडिजला चौथा धक्का बसलाय. हार्दिक पांड्याने घेतली विकेट

वेस्ट इंडीजची सावध सुरुवात

वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी सावध सुरुवात केली आहे. 10 षटकानंतर विडिंजने तीन विकेटच्या मोबदल्यात 69 धावा केल्या आहेत. पूरन आणि पॉवेल मैदानात आहेत.  

वेस्ट इंडिजला तिसरा धक्का

चार्ल्सच्या रुपाने वेस्ट इंडिजला तिसरा धक्का बसलाय. कुलदीप यादवने घेतली विकेट

वेस्ट इंडिजचे अर्धशतक

वेस्ट इंडिजने सात षटकानंतर दोन बाद 57 धावा केल्या आहेत. चहल याने दोन विकेट घेतल्या. 

चहलचा भेदक मारा

फिरकीपटू युजवेंद्र चहल याने वेस्ट इंडिजला लागोपाठ दोन धक्के दिला... तीन चेंडूमध्ये दोन फलंदाजांना तंबूत धाडले. वेस्ट इंडिज दोन बाद 34

चहल-कुलदीप जोडी उतरणार मैदानात -

वेस्ट इंडिजचा कर्णधार रोवमन पॉवेल याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघ प्रथम गोलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. भारताकडून तिलक वर्मा आणि मुकेश कुमार यांनी भारतीय संघातून पदार्पण केलेय. उमरान मलिक, रवि बिश्नोई यांना प्लेईंग 11 मध्ये स्थान दिले नाही. भारतीय संघात तीन फिरकी गोलंदाजांना स्थान देण्यात आलेय. युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव एकत्र खेळणार आहेत. 

भारतीय संघात कोण कोणते शिलेदार - 

शुभमन गिल, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), संजू सॅमसन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युदवेंद्र चहल, अर्शदीप सिंह आणि मुकेश कुमार

वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकली

वेस्ट इंडिजचा कर्णधार रोवमोन पॉवेल याने नाणेफेक जिंकली, प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय.

मुकेश कुमार याचेही पदार्पण

तिलक वर्मा आणि मुकेश कुमार यांनी टी20 मध्ये पदार्पण केलेय.

तिलक वर्माचं पदार्पण

तिलक वर्माचं टी20 संघात पदार्पण झालेय. नाणेफेकीआधी बीसीसीआयने ट्वीट करत याबाबतची माहिती दिली

थोड्याच वेळात होणार नाणेफेक

पहिल्या टी20 सामन्याची नाणेफेक थोड्याच वेळात होणार आहे. त्रिनिदाद येथील ब्रायन लारा स्टेडिअमवर सामना रंगणार आहे. 

सिनिअर खेळाडूंना आराम, युवांना संधी

टी २० मालिकेत भारतीय संघात सिनिअर खेळाडूंना आराम देण्यात आला आहे. रोहित शर्मा, विराट कोहली यासारखे सिनिअर खेळाडूंना आराम दिलाय. हार्दिक पांड्या नेतृत्व करणार आहे. वेस्ट इंडिजच्या संघात काही अनुभवी खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. टी २० साठी वेस्ट इंडिजचे खेळाडू ओळखले जातात. त्यामुळे ही मालिका रंगतदार होण्याची शक्यता आहे. 

टी20साठी भारतीय संघ -

इशान किशन (विकेटकिपर) , शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (उप कर्णधार), संजू सॅमसन (विकेटकिपर), हार्दिक पांड्या (कर्णधार), अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवि बिश्नोई, अर्शदीप सिंह, उमरान मलिक, आवेश खान, मुकेश कुमार

वेस्ट इंडिजचा संघात कोण कोण ?

रोवमन पॉवेल (कर्णधार), काईल मेयर्स (उप कर्णधार), जॉन्सन चार्ल्स, रॉस्टन चेस, शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, शाय होप, अकील होसेन, अल्झारी जोसेफ, ब्रेंडन किंग, ओबेद मॅक्कॉय, निकोलस पूरन, रोमॅरियो शेफर्ड, ओडियन स्मिथ, ओशेने थॉमस.

कुठे पाहाल सामने -

हा सामना टीव्हीवर डीडी स्पोर्ट्सवर पाहता येईल. याव्यतिरिक्त सामना मोबाईलवर जिओ सिनेमा अॅपवर मोफत पाहता येऊ शकतो. फॅनकोडवरही सामना पाहता येईल. एबीपी माझाच्या संकेतस्थाळवरही सामन्याबाबत तुम्हाला सर्व माहिती मिळणार आहे.

सामन्याची वेळ काय ?

तीन ऑगस्टपासून भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये टी २० मालिकेला सुरुवात होणार आहे. भारतीय वेळेनुसार, रात्री आठ वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. साडेसात वाजता नाणेफेक होईल..

पिच रिपोर्ट

ब्रायन लारा स्टेडियममध्ये आतापर्यंत फक्त एकच टी20 आंतरराष्ट्रीय सामना झालाय. 2022 मध्ये भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये हा सामना झाला होता. हा सामना टीम इंडियाने जिंकला होता. एकमेव टी20 सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने बाजी मारली होती. याआधीही वनडे सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या टीम इंडियाने विजय मिळवला होता. प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाचे वरचस्व असेल, असे दिसतेय. सामन्याच्या सुरुवातीला खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना मदत करेल. त्यानंतर सामना जसाजसा पुढे जाईल तसातसा फिरकी गोलंदाजांना मदत मिळेल.

टीम इंडिया विरुद्ध वेस्ट इंडिज टी20 आंतरराष्ट्रीय हेड टू हेड 

टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात आतापर्यंत 25 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळवले गेले आहेत. ज्यामध्ये टीम इंडियानं 17 सामने जिंकले आहेत. तर वेस्ट इंडिजनं केवळ 7 सामने जिंकले आहेत. याव्यतिरिक्त एक सामना अनिर्णित राहिला आहे. 

भारताचा आज 200 वा टी 20 सामना

भारतीय संघ आज आपला 200 वा टी 20 सामना खेळत आहे. भारताशिवाय फक्त पाकिस्तान संघाने 200 टी20 सामने खेळले आहेत. 2006 मध्ये सुरु झालेला प्रवास अद्याप सुरुच आहे. आतापर्यंत या कालावधीत भारतीय संघाने अनेक विक्रम केले आहेत. भारतीय संघाने टी20 चा पहिला विश्वचषक जिंकला होता. 

भारतीय संघाने आतापर्यंत 199 टी 20 सामन्यात 127 विजय मिळवले आहेत. भारतापेक्षा जास्त विजय पाकिस्तान संघाचे आहे. पाकिस्तानने 223 सामन्यात 134 विजय मिळवले आहेत. टी 20 मध्ये भारतीय संघाची सर्वोच्च धावसंख्या 260 आहे. 2017 मध्ये श्रीलंकाविरोधात भारताने ही धावसंख्या उभारली होती. टी20 मधील भारताची निचांकी धावसंख्या 74 इतकी आहे. 2008 मध्ये ऑस्ट्रेलियाविरोधात भारतीय संघ अवघ्या 74 धावांवर आटोपला होता. भारतीय संघाने पहिला टी20 विश्वचषक जिंकला होता. 2007 मध्ये झालेल्या विश्वचषकात धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघाचे चषकावर नाव कोरले होते. 

पार्श्वभूमी

IND Vs WI 1st T20 Live Updates : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये आजपासून पाच सामन्याच्या टी 20 मालिकेला सुरुवात होणार आहे. भारतीय संघाने कसोटी आणि वनडे मालिका खिशात घातली आहे. आता टी20 मध्ये यजमान वेस्ट इंडिज युवा भारतीय संघाचा कसा सामना करणार ? हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे. पुढील वर्षी जूनमध्ये टी 20 विश्वचषक होणार आहे. त्याआधी भारतीय संघाची बांधणी सुरु झाली आहे. अनुभवी खेळाडूंना आराम देण्यात आलाय. यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा यासारख्या युवा खेळाडूंना संधी दिली आहे. दुसरीकडे वेस्ट इंडिजचा संघ अनुभवी दिसत आहे. टी 20 चे अनेक धुरंधर वेस्ट इंडिज संघात दिसत आहेत. त्रिनिदाद येथील ब्रायन लारा स्टेडिअमवर भारत आणि वेस्ट इंडिजचा संघ भिडणार आहेत. 

टी २० मालिकेत भारतीय संघात सिनिअर खेळाडूंना आराम देण्यात आला आहे. रोहित शर्मा, विराट कोहली यासारखे सिनिअर खेळाडूंना आराम दिलाय. हार्दिक पांड्या नेतृत्व करणार आहे. वेस्ट इंडिजच्या संघात काही अनुभवी खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. टी २० साठी वेस्ट इंडिजचे खेळाडू ओळखले जातात. त्यामुळे ही मालिका रंगतदार होण्याची शक्यता आहे. 

टीम इंडिया विरुद्ध वेस्ट इंडिज टी20 आंतरराष्ट्रीय हेड टू हेड 
टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात आतापर्यंत 25 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळवले गेले आहेत. ज्यामध्ये टीम इंडियानं 17 सामने जिंकले आहेत. तर वेस्ट इंडिजनं केवळ 7 सामने जिंकले आहेत. याव्यतिरिक्त एक सामना अनिर्णित राहिला आहे. 

पिच रिपोर्ट

ब्रायन लारा स्टेडियममध्ये आतापर्यंत फक्त एकच टी20 आंतरराष्ट्रीय सामना झालाय. 2022 मध्ये भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये हा सामना झाला होता. हा सामना टीम इंडियाने जिंकला होता. एकमेव टी20 सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने बाजी मारली होती. याआधीही वनडे सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या टीम इंडियाने विजय मिळवला होता. प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाचे वरचस्व असेल, असे दिसतेय. सामन्याच्या सुरुवातीला खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना मदत करेल. त्यानंतर सामना जसाजसा पुढे जाईल तसातसा फिरकी गोलंदाजांना मदत मिळेल.

सामन्यांची वेळ काय ?

तीन ऑगस्टपासून भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये टी २० मालिकेला सुरुवात होणार आहे. भारतीय वेळेनुसार, रात्री आठ वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. साडेसात वाजता नाणेफेक होईल..

कुठे पाहाल सामने -

हा सामना टीव्हीवर डीडी स्पोर्ट्सवर पाहता येईल. याव्यतिरिक्त सामना मोबाईलवर जिओ सिनेमा अॅपवर मोफत पाहता येऊ शकतो. फॅनकोडवरही सामना पाहता येईल. एबीपी माझाच्या संकेतस्थाळवरही सामन्याबाबत तुम्हाला सर्व माहिती मिळणार आहे.

पाच सामन्याच्या टी २० मालिकेसाठी दोन्ही संघात कोण कोणते शिलेदार.... india vs west indies t20 squad

वेस्ट इंडिजचा संघात कोण कोण ?

रोवमन पॉवेल (कर्णधार), काईल मेयर्स (उप कर्णधार), जॉन्सन चार्ल्स, रॉस्टन चेस, शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, शाय होप, अकील होसेन, अल्झारी जोसेफ, ब्रेंडन किंग, ओबेद मॅक्कॉय, निकोलस पूरन, रोमॅरियो शेफर्ड, ओडियन स्मिथ, ओशेने थॉमस.

टी20साठी भारतीय संघ -

इशान किशन (विकेटकिपर) , शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (उप कर्णधार), संजू सॅमसन (विकेटकिपर), हार्दिक पांड्या (कर्णधार), अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवि बिश्नोई, अर्शदीप सिंह, उमरान मलिक, आवेश खान, मुकेश कुमार

पाच सामन्याच्या टी२० मालिकेचं वेळापत्रक काय ? india vs west indies t20 schedule : - 

टी 20 सामने (संध्याकाळी 8 वाजता)

3 ऑगस्ट 2023 - पहिला टी20 सामना
ब्रायन लारा क्रिकेट अॅकेडमी, त्रिनिदाद

6 ऑगस्ट 2023 - दुसरा टी20 सामना
नॅशनल स्टेडिअम, गयाना

8 ऑगस्ट 2023 - तिसरा टी20 सामना
नॅशनल स्टेडिअम, गयाना

12 ऑगस्ट 2023 - चौथा टी20 सामना
सेन्ट्रल ब्रोवार्ड रीजनल पार्क स्टेडियम, फ्लोरिडा 

13 ऑगस्ट 2023 - पाचवा टी20 सामना
सेन्ट्रल ब्रोवार्ड रीजनल पार्क स्टेडियम, फ्लोरिडा

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.