India 11 for first T20 : भारत आणि वेस्ट इंडिज (IND vs WI) यांच्यात टी20 सामन्यांना उद्यापासून (बुधवार) सुरुवात होत आहे. दरम्यान पहिल्या टी20 सामन्यांत नेमकी कोणा-कोणाला संधी मिळणार या चर्चेला उधाण आलं आहे. कारण जाहीर केलेल्या आधीच्या संघात तीन महत्त्वपूर्ण बदल झाले आहेत. या बदलांमध्ये केएल राहुल, अक्षर पटेल आणि वॉशिग्टंन सुंदर दुखापतग्रस्त झाल्यामुळे ऋतुराज गायकवाड, दीपक हुडा आणि कुलदीप यादव यांना संघात स्थान मिळालं आहे.  


दरम्यान या झालेल्या बदलांमुळे संघात नेमकं कोणा-कोणाला संधी मिळणार हा प्रश्न आता समोर आहे. यामध्ये मागील बरेच सामने संघात असूनही संधी न मिळालेल्या ऋतुराज संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. तर आवेश खानलाही पहिली वहिली संधी उद्या मिळू शकते. त्यासोबत इतर फॉर्ममध्ये असणारे खेळाडू तर संघात असतीलच. 


पहिल्या टी-20 सामन्यासाठी संभाव्य भारतीय संघ -


रोहित शर्मा (कर्णधार), ऋतुराज गायकवाड/ईशान किशन, विराट कोहली, सुर्यकुमार यादव, ऋषभ पंत (उपकर्णधार/विकेटकिपर), दीपक हुड्डा, दीपक चहर, शार्दुल ठाकर, रवी बिश्नोई, युझवेंद्र चहल, आवेश खान


पहिला टी-20 सामना प्रेक्षकांविना -


"बीसीसीआयने पहिल्या सामन्यासाठी प्रायोजक आणि प्रतिनिधींसाठी फक्त हॉस्पिटॅलिटी बॉक्सेसना परवानगी दिली आहे. याचदरम्यान बंगाल क्रिकेट असोसिएशननं बीसीसीआयला यावर पुनर्विचार करण्याची आणि अखेरच्या दोन सामन्यांसाठी प्रेक्षकांना परवानगी देण्याची विनंती केलीय. तसेच बोर्डाकडून परवानगी मिळताच प्रेक्षकांना कळवण्यात येईल, असंही बंगाल क्रिकेट असोसिएशननं त्यांच्या निवेदनात म्हटलंय. 


कधी, कुठे पाहणार सामना?


हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्स या क्रिकेट ग्राउंडवर खेळवण्यात येणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना सायंकाळी 7 वाजता खेळवला जाणार आहे. 


संपूर्ण टी-20 मालिकेचं वेळापत्रक 


पहिला टी-20 सामना- 16 फेब्रुवारी (कोलकाता, ईडन गार्डन)
दुसरा टी-20 सामना- 18 फेब्रुवारी (कोलकाता, ईडन गार्डन)
तिसरा टी-20 सामना- 20 फेब्रुवारी (कोलकाता, ईडन गार्डन)


हे ही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha