India vs West Indies 1st ODI : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन सामन्याच्या वनडे मालिकेला आजपासून सुरुवात होणार आहे. 27 जुलैपासून तीन सामन्याच्या वनडे मालिकाला सुरुवात होणार आहे. वनडे मालिकेत विकेटकिपर म्हणून कुणाला संधी दिली जाणार ? संजू सॅमसन की इशान किशन दोघांपैकी एकाच खेळाडूला संधी मिळण्याची शक्यता आहे. पहिल्या वनडेसाठी टीम इंडियाची प्लेईंग ११ मध्ये कोण कोण असेल. पाहूयात..
सिराज मायदेशी परतलाय -
वनडे मालिकेपूर्वीच भारताला मोठा धक्का बसलाय. आघाडीचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज मायदेशी परतलाय. सिराजच्या घोट्याला दुखापत असल्यामुळे त्याला विश्रांतीचा सल्ला देण्यात आलाय. त्यामुळे वनडे मालिकेत सिराज उपलब्ध नसेल. सिराजच्या अनुपस्थितीत भारतीय गोलंदाजीची धुरा कोण सांभाळणार याबाबत प्रश्न चाहत्यांच्या मनात आहे.
रोहित शर्मा आणि शुभमन गिल करणार डावाची सुरुवात
पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताची सलामीची जोडी रोहित शर्मा आणि शुभमन गिल असेल, यात शंकाच नाही. त्यामुळे यशस्वी जयस्वाल आणि ऋतुराज गायकवाड हे बेंचवर बसतील. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली खेळेल. गेल्या काही दिवसांत शुभमन गिलने एकदिवसीय सामन्यात चमकदार कामगिरी केली आहे. या फॉरमॅटमध्ये त्याने द्विशतक झळकावले आहे. रोहित शर्मा आणि गिल सलामीला उतरणार तर तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली खेळेल.
विकेटकिपर कोण? संजू की इशान
चौथ्या क्रमांकावर सूर्यकुमार यादवला खेळवणार, हेही जवळपास निश्चित झाले आहे. सूर्याला आशिया चषक संघात स्थान मिळवण्याची संधी असेल. श्रेयस अय्यरच्या दुखापतीमुळे त्याला वनडे संघात संधी मिळाली. जर सूर्याने या मालिकेत आश्चर्यकारक कामगिरी केली तर त्याला आशिया कप संघातही संधी मिळू शकते. यानंतर हार्दिक पांड्या पाचव्या क्रमांकावर खेळताना दिसणार आहे. यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन सहाव्या क्रमांकावर खेळेल, जो मॅच फिनिशरची भूमिका बजावेल. यानंतर फिरकीपटू रवींद्र जडेजा दिसणार आहे. हार्दिक, संजू आणि जाडेजा फिनिशरची भूमिका बजावतील.
सिराजच्या अनुपस्थितीत गोलंदाज कोण कोण ?
कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल मुख्य स्पिनरच्या भूमिकेत असतील. रविंद्र जडेजा या जोडीला चांगली साथ देईल. भारतीय संघाच तीन वेगवान गोलंदाजांचा समावेश असू शकतो. यामध्ये शार्दुल ठाकूर, उमरान मलिक आणि मुकेश दिसू शकतात. त्याशिवाय जयदेव उनादकट याचाही पर्याय असू शकतो.
पहिल्या वनडेसाठी कसा असेल भारतीय संघ -
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, उमरान मलिक आणि मुकेश कुमार.
भारतीय संघ कसा आहे...
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उप-कर्णधार), शार्दुल ठाकुर, रविंद्र जाडेजा, अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जयदेव उनादकट, उमरान मलिक आणि मुकेश कुमार.
वनडे मालिकेचं वेळापत्रक -
पहिला वनडे- 27 जुलै- कँसिंग्टन ओवल, बारबाडोस
दुसरा वनडे- 29 जुलै- कँसिंग्टन ओवल, बारबाडोस
तिसरा वनडे- 1 ऑगस्ट- ब्रायन लारा क्रिकेट एकेडमी, त्रिनिदाद.