IND Vs WI Live Score : भारताचा वेस्ट इंडिजवर विजय

IND Vs WI 1st ODI Live Updates : कसोटीनंतर आता भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये तीन सामन्याची वनडे मालिका सुरु होणार आहे.

नामदेव कुंभार Last Updated: 27 Jul 2023 11:18 PM

पार्श्वभूमी

IND Vs WI 1st ODI Live Updates : कसोटीनंतर आता भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये तीन सामन्याची वनडे मालिका सुरु होणार आहे. आजपासून हे दोन्ही संघ आमनेसामने असतील. बारबाडोसच्या कँसिंग्टन...More

भारताची 1-0 आघाडी

पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा पाच विकेटने पराभव केला. बारबाडोसच्या मैदानावर वेस्ट इंडिजने दिलेल्या अवघ्या 115 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाची दमछाक उडाली होती. भारतीय संघाने 23 षटकात 5 विकेटच्या मोबदल्यात 118 धावांपर्यंत मजल मारली. भारताकडून ईशान किशन याने  अर्धशतकी खेळी केली. या विजयासह भारतीय संघाने तीन सामन्याच्या एकदिवसीय मालिकेत 1-0 च्या फरकाने विजय मिळवला.