IND vs USA T20 World Cup 2024 न्यूयॉर्क: भारत आणि अमेरिका (IND vs USA)  टी20 वर्ल्ड कप 2024 (T20 World Cup 2024) मधील 25 व्या लढतीत आमने सामने येणार आहेत. अ गटात भारत आणि अमेरिका अनुक्रमे गुणतालिकेत पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत.  आजची मॅच जिंकणारा संघ सुपर 8 मध्ये प्रवेश करेल. भारत आणि अमेरिका मॅचकडे पाकिस्तानचं देखील लक्ष लागलं आहे.  भारताचा कॅप्टन रोहित शर्मा यानं टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आता अमेरिका पहिल्यांदा फलंदाजीला उतरणार आहे.  


भारत अ गटात गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. भारतानं आयरलँडला आणि पाकिस्तानला पराभूत करत गुणतालिकेत चार गुणांसह पहिलं स्थान पटकावलं आहे. भारताचं नेट रनरेट अमेरिकेच्या तुलनेत चांगलं आहे. अमेरिकेनं देखील कॅनडा आणि पाकिस्तानला पराभूत केलं आहे. त्यांच्याकडे देखील 4 गुण आहेत. 


भारतीय संघात बदल नाही


रोहित शर्मानं अमेरिकेविरुद्ध टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शिवम दुबे, रवींद्र जडेजा यांना संघाबाहेर ठेवलं जाण्याची चर्चा सुरु असताना रोहित शर्मानं मोठी बातमी दिली आहे. रोहित शर्मानं टॉस जिंकल्यानंतर संघात कोणताही बदल केला जाणार नसल्याचं म्हटलं. त्यामुळं भारताचा संघ पहिल्या दोन मॅचमधील खेळाडूंसह मैदानात उतरेल.



अमेरिकेला धक्का, कॅप्टन मोनांक पटेल बाहेर


अमेरिकेला आजच्या मॅचपूर्वी मोठा धक्का बसला. मोनांक पटेल आजच्या मॅचमध्ये खेळणार नाही. अमेरिकेच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये आजच्या मॅचमध्ये बदल झाले आहेत. 


आज जो संघ जिंकेल तो सुपर 8 मध्ये


भारत आणि अमेरिका यांच्याकडे चार गुण आहेत. नेट रनरेटच्या  जोरावर भारत पहिल्या स्थानावर आहे. आज जो संघ विजय मिळवेल त्याचं सुपर 8 चं तिकिट निश्चित होणार आहे. 


भारताचा संघ :


रोहित शर्मा (कॅप्टन), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, शिवम दूबे, रिषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा,मोहम्मद सिराज, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग



अमेरिकेचा संघ :


अरोन जोन्स (कॅप्टन), स्टीवन टेलर,  शयन जहांगीर, अँड्रीस गवस (विकेट कीपर), नितीश कुमार, कोरी अँडरसन,हरमीत सिंग, शॅडली वॅन शाल्कवायक,जसदीप सिंग,सौरभ नेत्रावळकर, अली खान


संबंधित बातम्या :


IND vs USA : दुबे आणि जाडेजाला बाहेरचा रस्ता? अमेरिकाविरोधात अशी असेल टीम इंडियाची संभाव्य प्लेईंग 11 


MPL: महाराष्ट्र प्रीमियर लीग २०२४ स्पर्धेत ४एस पुणेरी बाप्पाचा ईगल नाशिक टायटन्सवर दणदणीत विजय