न्यूयॉर्क : अमेरिकेनं भारतापुढं (USA vs IND) विजयासाठी 111 धावांचं आव्हान ठेवलं आहे. अर्शदीप सिंग (Arshadeep Singh) आणि हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) दमदार गोलंदाजीच्या जोरावर भारतानं अमेरिकेला 8 विकेटवर 110 धावांवर रोखलं. अर्शदीप सिंगनं अमेरिकेच्या चार विकेट घेतल्या. अमेरिकेकडून सर्वाधिक 27 धावा नितीश कुमारनं (Nitish Kumar) केल्या. अर्शदीप सिंगच्या गोलंदाजीवर नितीश कुमारनं मोठा फटका मारला. मात्र, बाऊंड्री जवळ असलेल्या मोहम्मद सिराजनं (Mohammad Siraj) दमदार क्षेत्ररक्षण करत अफलातून कॅच घेतला. यामुळं नितीश कुमारला माघारी जावं लागलं.
मोहम्मद सिराजची दमदार कामगिरी
अमेरिकेला पहिल्याच ओव्हर दोन धक्के अर्शदीप सिंगनं दिले होते. त्यानंतर कॅप्टन अरोन जोन्स बाद झाल्यानंतर फलंदाजीला आलेल्या नितीश कुमारनं अमेरिकेचा डाव सावरला. नितीश कुमारनं अमेरिकेसाठी सर्वाधिक 27 धावा केल्या. नितीश कुमार धोकादायक ठरेल असं वाटत असताना रोहित शर्मानं अर्शदीप सिंगला गोलंदाजी दिली. अर्शदीप सिंगला षटकार मारण्याच्या प्रयत्नात नितीश कुमारनं मोठा फटका मारला. बाऊंड्रीवर क्षेत्ररक्षण करणाऱ्या मोहम्मद सिराजनं हवेत उडी मारुन कॅच घेतला.
बीसीसीआयकडून कौतुक
नितीश कुमारचा कॅच घेणाऱ्या मोहम्मद सिराजचं बीसीसीआयनं देखील कौतुक केलं आहे. मोहम्मद सिराजच्या कॅचचा व्हिडीओ पोस्ट करत बीसीसीआयनं कौतुक केलं.
भारतापुढं विजयासाठी 111 धावांचं आव्हान
अर्शदीप सिंगनं पहिल्याच ओव्हरमध्ये दोन धक्के दिल्यानंतर अमेरिकेनं 20 ओव्हर खेळू काढत भारताविरुद्ध 8 विकेटवर 110 धावा केल्या. यामध्ये सर्वाधिका धावा नितीश कुमारनं केल्या. नितीश कुमारनं 27 धावा केल्या. स्टीवन टेलरनं 24 धावा केल्या. अरोन जोन्सला हार्दिक पांड्यानं 11 धावांवर बाद केलं. कोरी अँडरसननं 15 धावा केल्या. अमेरिकेनं 20 ओव्हरपर्यंत टिकून राहत 110 धावांपर्यंत मजल मारली.
भारताच्या गोलंदाजांची दमदार कामगिरी
अर्शदीप सिंगनं अमेरिकेविरुद्ध चांगली कामगिरी केली. अर्शदीप सिंगनं चार ओव्हरमध्ये चार विकेट घेतल्या. अर्शदीपनं केवळ 9 धावा देत ही कामगिरी केली. टीम इंडियाचा उपकप्तान हार्दिक पांड्यानं 2 विकेट घेतल्या. अक्षर पटेलनं एक विकेट घेतली.
दरम्यान, आजच्या मॅचमध्ये जो संघ विजय मिळवेल त्यांना सुपर 8 चं तिकीट मिळणार आहे. भारत आणि अमेरिका यांनी यापूर्वी प्रत्येकी दोन मॅच जिंकल्या आहेत. आजच्या मॅचमध्ये जो संघ विजय मिळवेल त्याला सुपर 8 मध्ये प्रवेश मिळेल.
संबंधित बातम्या :