India vs Sri Lanka, Toss Update : पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) सामन्याला सुरुवात होत असून नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागला आहे.  भारतानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान भारतानं मालिकेतील पहिला सामना 2 धावांच्या फरकाने अगदी रोमहर्षक पद्धतीनं जिंकला, त्यानंतर आजचा सामना जिंकून भारत मालिकेत 2-0 ने विजयी आघाडी घेण्यासाठी सज्ज झाला आहे.






भारत दोन बदलांसह मैदानात उतरत असून संजू सॅमसन दुखापतीमुळे संघाबाहेर असून राहुल त्रिपाठी (Rahul Tripathi) पदार्पण करत आहेत. तर हर्षल पटेलच्या जागी अर्शदीप सिंह संघात आहे. दोन्ही संघासाठी आजचा सामना अत्यंत महत्त्वाचा असल्याने एक रंगतदार लढत पाहायला मिळू शकते.








कशी आहे टीम इंडिया?


हार्दिक पांड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), ईशान किशन (विकेटकिपर), शुभमन गिल, राहुल त्रिपाठी, दीपक हुडा, अक्षर पटेल, शिवम मावी, उमरान मलिक, अर्शदीप सिंग, युजवेंद्र चहल


कसा आहे श्रीलंकेचा संघ?


पाथुम निसांका, कुसल मेंडिस(विकेटकिपर), धनंजया डी सिल्वा, चरित असलंका, भानुका राजपक्षे, दासुन शनाका(कर्णधार), वानिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, महेश थेक्षाना, कसून रजिथा, दिलशान मदुशंका


भारत विरुद्ध श्रीलंका Head to Head 


भारत आणि श्रीलंका च्यात आतापर्यंत 27 आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळले गेले. यातील 27 पैकी 18 सामन्यात भारतानं विजय मिळवला आहे. तर, 8 सामन्यात पराभव स्वीकारला आहे. याशिवाय दोघांमधील एक सामना अनिर्णीत देखील सुटला आहे. अशारितीने  टी-20 सामन्यातील आकडेवारी पाहता भारतीय संघाचं पारडं जड दिसत आहे. 


हे देखील वाचा-