मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदी गौत गंभीरची नियुक्ती केली आहे. गंभीरच्या प्रशिक्षणात टीम इंडिया श्रीलंका विरुद्ध टी 20 सीरिज खेळणार आहे. दरम्यान, श्रीलंका दौऱ्याआधी भारतीय संघाचा फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून कुणाला संधी देण्यात आली आहे. याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. बीसीसीआयने याबाबत अद्याप औपचारिक घोषणा केलेली नाही. दरम्यान, भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू अभिषेक नायर आणि नेदरलँडचा माजी खेळाडू रायन टेन डोशेट यांचा भारतीय संघाच्या प्रशिक्षक कर्मचाऱ्यांमध्ये समावेश करण्यात असल्याचं बोललं जात आहे. 


गंभीर ब्रिगेडमध्ये कुणाचा समावेश?


टीम इंडियाचा नवीन मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या कोचिंग स्टाफमध्ये माजी प्रशिक्षक राहुल द्रविडचा सहकारी टी दिलीप यांचाही समावेश करण्यात आला आहे. टी दिलीप क्षेत्ररक्षण प्रशिक्षक असणार आहेत. दिलीपचा ड्रेसिंग रूममध्येही चांगला सकारात्मक प्रभाव असून त्याने एक प्रभावी क्षेत्ररक्षक प्रशिक्षक म्हणून वेगळं स्थान निर्माण केलं आहे. टी दिलीपचा भारतीय संघात बाँडिंग तयार करण्यात मोठा वाटा असल्याचं सांगितलं जातं.


फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक कोण? 


क्रिकबझच्या वृत्तानुसार, नायर आणि टेन डोशेट या दोघांनाही सहाय्यक प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे. नवीन गोलंदाजी प्रशिक्षकाच्या नावाबाबत अजूनही निर्णय झालेला नाही, पण दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज मॉर्नी मॉर्केल गोलंदाजी प्रशिक्षकासाठी प्रबळ उमेदवार आहे. मॉर्नी मॉर्केलला गंभीरच्या प्रशिक्षक संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे.


टीम इंडियाचा कोचिंग स्टाफ






नायर, टेन डोशेटे आणि मॉर्केलचं गंभीरसोबत काम


नायर आणि टेन डोशेटे , प्रशिक्षक संघात यांची टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये नव्याने सामील होणार आहे. याआधी त्यांनी गंभीरसोबत इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL) प्रशिक्षक म्हणून काम केलं आहे. कोलकाता नाईट रायडर्स 2024 मध्ये आयपीएल चॅम्पियन बनले तेव्हा नायर आणि टेन डोशेटे त्या संघासोबत होते, तर मॉर्केलने लखनौ सुपर जायंट्समध्ये दोन वर्षे गंभीरसोबत काम केलं आहे.


बॉलिंग कोचसाठी परदेशी खेळाडूचं नाव


दिलीप आणि नायर सोमवारी संघासोबत श्रीलंकेला जाणार आहेत, पण टेन डोशेटे संघासोबत कधी सामील होतील, हे अद्याप स्पष्ट नाही. टेन सध्या यूएसमध्ये सुरु असलेल्या मेजर लीग क्रिकेटमध्ये (MLC) LA नाईट रायडर्सच्या कोचिंग स्टाफचा भाग आहे. त्याशिवाय दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू मॉर्ने मॉर्केल मॉर्केलसोबत बीसीसीआयने  गोलंदाजी प्रशिक्षक बनण्यासाठी शक्यतेबाबत चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Axar Patel : टी20 वर्ल्ड कप फायनलमध्ये बाद झाल्यामुळे नाराज होता अक्षर पटेल; बुमराहने मनोबल वाढवलं, म्हणाला...