IND vs SL: बंगळुरूच्या (Bangalore) एम चिन्नास्वामी स्डेडिअममध्ये (M Chinnaswamy Stadium) भारत आणि श्रीलंका यांच्यात दुसरा कसोटी सामना खेळला जाणार आहे. या सामन्यात भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जाडेजाकडं (Ravindra Jadeja) दोन विक्रम मोडण्याची संधी उपलब्ध झालीय. दुसऱ्या कसोटी सामन्यात जडेजाला दोन विकेट्स घेऊन बीएस चंद्रशेखर यांचा विक्रम मोडीत काढू शकतो. याशिवाय, कसोटी क्रिकेटमध्ये तो 2500 धावांचाही टप्पा गाठू शकतो. जाडेजा नुकताच अष्टपैलूंच्या क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर पोहोचलाय.
बीएस चंद्रशेखर यांचा विक्रम मोडणार?रविंद्र जाडेजानं आतापर्यंत 58 कसोटी सामने खेळले आहेत. ज्यात त्यानं 241 विकेट्स पटकावले आहेत.श्रीलंकाविरुद्ध दुसऱ्या कसोटीत त्यानं 9 विकेट्स घेतल्यास तो 250 विकेट्सचा टप्पा गाठेल. तसेच दोन विकेट्स घेऊन तो बीएस चंद्रशेखर यांना मागे टाकू शकतो. बीएस चंद्रशेखर यांच्या नावावर 242 विकेट्सची नोंद आहे.
जाडेजाकडं 2500 धावांचा टप्पा गाठण्याची संधीरविंद्र जाडेजाला उत्कृष्ट अष्टपैलू म्हणून ओळखलं जातं. त्यानं गोलंदाजीसह फलंदाजीनंही क्रिकेट चाहत्यांची मनं जिंकली आहेत. जाडेजानं 58 कसोटी सामन्यात 2 हजार 730 धावा केल्या आहेत. ज्यात दोन शतके आणि 17 अर्धशतकांचा समावेश आहे. श्रीलंकाविरुद्ध बंगळुरू येथे होणाऱ्या दुसऱ्या कसोटी त्यानं 130 धावा केल्यास तो 2500 धावा पूर्ण करेल. पहिल्या कसोटी सामन्यात जाडेजाची दमदार कामगिरीश्रीलंकाविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात जाडेजानं 228 बॉलमध्ये 178 धावा केल्या. तर, या सामन्यात त्यानं एकूण 9 विकेट्स घेतल्या आहे. या कामगिरीसाठी जाडेजाला 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं.तसेच दुसऱ्या कसोटी सामन्यातही रविंद्र जाडेजा चांगली कामगिरी करून दाखवेल, अशी अपेक्षा केली जात आहे.
हे देखील वाचा-
- IPL 2022 : मलिंगाची आयपीएलमध्ये एन्ट्री, मुंबई नव्हे ‘या’ संघासोबत करणार काम
- IND vs SL: श्रीलंकाविरुद्ध दुसऱ्या कसोटीत विराट कोहली इतिहास रचणार! मार्क वॉचा 'हा' विक्रम मोडण्यापासून फक्त 23 धावा दूर
- Pink Ball Test: पिंक बॉल कसोटीत टीम इंडियाच्या 'या' खेळाडूंच्या सर्वाधिक धावा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha