IND vs SL, Head to Head : भारत दौऱ्यावर असलेला श्रीलंकेचा संघ (Sri Lanka Team) 10 जानेवारी अर्थात उद्यापासून 3 सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. टी-20 मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघ आता रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली वनडे मालिकेत श्रीलंकेशी भिडणार आहे. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 162 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. ज्यानंतर आता गुवाहाटी बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर दोघांमधील 163 वा एकदिवसीय सामना खेळवला जाईल. आत्तापर्यंत या दोन्हीमध्ये कोणत्या संघाचा दबदबा राहिला आहे तसंच काही खास रेकॉर्ड जाणून घेऊया...



  • आजवर या दोघांमध्ये एकूण 162 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये भारतीय संघाने 93 तर श्रीलंकेने 57 सामने जिंकले आहेत. यामध्ये 11 सामने अनिर्णित राहिले असून एक सामना बरोबरीत सुटला आहे. म्हणजे टीम इंडियाचाच आजवर दबदबा राहिला आहे.

  • दोन्ही संघांमधील पहिला वनडे सामना 1979 मध्ये खेळला गेला होता. श्रीलंकेने हा सामना 47 धावांनी जिंकला होता.

  • भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकरने दोन्ही संघांमधील एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने 1990-2012 दरम्यान 84 सामन्यांत 43.48 च्या सरासरीने 3113 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या 138 ही आहे.

  • या दोघांमधील एकदिवसीय सामन्यांमध्ये रोहित शर्माने सर्वाधिक 264 धावा केल्या आहेत. त्याने ही इनिंग 2014 मध्ये ईडन गार्डन्सवर खेळली होती. या डावात रोहितने 173 चेंडूंचा सामना केला. त्यात 33 चौकार आणि 9 षटकारांचा समावेश होता.

  • श्रीलंकेचा फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनने वनडेमध्ये सर्वाधिक 74 विकेट घेतल्या आहेत. त्याने 63 सामन्यांच्या 58 डावात 31.78 च्या सरासरीने या विकेट घेतल्या आहेत.

  • या दोघांमधील एकदिवसीय सामन्यांमध्ये महेंद्रसिंग धोनीने सर्वाधिक 96 फलंदाजांना विकेटकिंपिंग करताना बाद केलं आहे. यामध्ये त्याने 71 झेल घेतले आणि 25 स्टंपिंग केले.

  • महेला जयवर्धनेने या दोघांमधील एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक 38 झेल पकडले आहेत.

  • दोन्ही संघामध्ये आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये 318 धावांची सर्वात मोठी भागीदारी झाली आहे. सौरव गांगुली आणि राहुल द्रविड यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी ही भागीदारी झाली.

  • तसंच श्रीलंकेचा माजी खेळाडू सनथ जयसूर्याने दोन्ही संघांमध्ये सर्वाधिक 89 सामने खेळले आहेत. याशिवाय सचिन तेंडुलकरने 84 सामने खेळले आहेत.


हे देखील वाचा-