Colombo Weather Latest Update IND vs SL : आशिया चषक स्पर्धेतील ( asia cup 2023 ) सुपर -4 फेरीत आज, मंगळवारी भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये लढत होत आहे. दोन्ही संघामध्ये कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडिअमवर आमनासामना होणार आहे. क्रिकेट चाहत्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. कोलंबोमध्य हवमान स्वच्छ आहे. सकाळपासून सूर्यदेवाने दर्शन दिलेय. कोलंबोत आजही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. पण सकाळपासून कडक ऊन पडले आहे. 


कोलंबोमध्ये चांगला सूर्यप्रकाश (Colombo Weather Latest Update) पडला आहे. ढगाळ वातावरणही नाही, हा चाहत्यांसाठी मोठा दिलासा आहे. भारताच्या प्रत्येक सामन्यात पावसाने खोडा घातला आहे. अशा स्थितीत श्रीलंकेविरोधात पावसाने हजेरी लावली नाही तर चाहत्यांना सामन्याचा आनंद घेता येईल. हवामान विभागाच्या वृत्तानुसार, सध्या कोलंबोमध्ये हवामान पूर्णपणे स्वच्छ आहे आणि आकाश देखील स्वच्छ आहे. हवामान पाहता पावसाची शक्यता फारच कमी दिसतेय. पावसामुळे आशिया चषक स्पर्धेतील भारताचे आतापर्यंतचे सर्व सामने प्रभावित झाले आहेत. अशा परिस्थितीत चाहत्यांना श्रीलंकेविरुद्ध संपूर्ण सामना होईल का? याबाबत प्रश्नचिन्ह आहे. कोलंबोमध्ये आज 80 ते 90 टक्के पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. सध्या हवमान स्वच्छ आहे. 







भारताच्या प्रत्येक सामन्यात पावसाचा खोडा - 


आशिया चषकात भारताच्या प्रत्येक सामन्यात पावसाने हजेरी लावली आहे. पावसामुळे भारताचा प्रत्येक सामना प्रभावित झालाय. साखळी फेरीत पाकिस्तानविरोधीतील सामना रद्द करावा लागला होता. तर नेपाळविरोधातील सामन्याचा निकाल डकवर्थ लुईस नियमांनुसार लागला.  त्यानंतर सुपर ४ फेरीतही पावसाने हजेरी लावली. त्यामुळे राखीव दिवशी सामना घ्यावा लागला होता. आता श्रीलंकेविरोधातील सामन्यातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.  


आशिया चषकात टीम इंडियाचे शिलेदार
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल (विकेटकीपर), ईशान किशन, हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, सूर्यकुमार यादव, अक्षर पटेल, श्रेयस अय्यर, प्रसिद्ध कृष्णा, तिलक वर्मा. 


श्रीलंका संघात कोण कोण ?


दासुन शनाका (कर्णधार), दिमुथ करुणारत्ने, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, चरिथ असालंका, धनंजय डी सिल्वा, दुनिथ वेलागे, महेश थेकशाना, कासुन रजिता, मथीशा पथिराना, कुसल परेरा, बिनुरा फर्नांडो, प्रमोद मदुशन, दुशान हेमंथा.