Indian Predicted Playing XI Against Sri Lanka: टीम इंडिया (Team India) आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) च्या सुपर-4 मधील दुसरा सामना मंगळवार, 12 सप्टेंबर रोजी श्रीलंकेविरुद्ध (Sri Lanka) खेळणार आहे. या सामन्यात भारतीय क्रिकेट संघाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये मोठे बदल पाहायला मिळू शकतात. या बदलांचं सर्वात मोठं कारण म्हणजे, सलग दोन सामने खेळणं. कारण टीम इंडिया 11 सप्टेंबर रोजी रात्री उशिरा सुपर-4 चा पहिला सामना संपवला, जो रिझर्व्ह डेच्या दिवशी खेळला गेला. त्यामुळे टीम इंडियाला सलग दुसऱ्या दिवशी सामना खेळायचा आहे. अशा परिस्थितीत खेळाडूंना विश्रांती देण्याच्या दृष्टीनं प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल केले जाऊ शकतात.
केएल राहुलला विश्रांती मिळू शकते, सूर्याला संधी मिळण्याची शक्यता
पाकिस्तानविरुद्धच्या सुपर-4 सामन्यात दुखापतीनंतर केएल राहुलचं प्रदीर्घ कालावधीनंतर पुनरागमन झालं. मैदानात पाकिस्तान विरोधात केएल राहुलनं धमाकेदार खेळी केली. आपल्या शानदार शतकी खेळीनं राहुलनं सर्वांचीच मनं जिंकली. राहुलनं 106 चेंडूत 12 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीनं 111* धावा केल्या. यानंतर त्यानं विकेटकीपिंगही केलं.
काल रिझर्व्ह डेच्या दिवशी पाकिस्तान विरोधात सामना खेळल्यानंतर टीम इंडियाला आज पुन्हा श्रीलंकेविरोधात सामना खेळायचा आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आजच्या सामन्यात केएल राहुलला विश्रांती दिली जाऊ शकते आणि त्याऐवजी सुर्यकुमार यादवला मिडल ऑर्डरमध्ये खेळवलं जाऊ शकतं. अशा परिस्थितीत ईशान किशन विकेटकिपिंग करताना दिसेल.
टीम इंडियात होऊ शकतात संभाव्य बदल
केएल राहुल व्यतिरिक्त आजच्या सामन्यात टीम इंडियात इतर कोणत्याही बदलाची शक्यता फारच कमी आहे. त्यामुळे श्रीलंकेविरोधात रोहित ब्रिगेड पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरुन श्रीलंकेचा धुव्वा उडवण्यासाठी सज्ज झाली आहे. तसेच, आजच्या प्लेईंग इलेव्हनमधून स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहलाही ब्रेक दिला जाऊ शकतो. तसेच, त्याच्याऐवजी मोहम्मद शामीला जागा दिली जाऊ शकते. पण, बुमराहला विश्रांती मिळेल असं वाटत नाही. कारण पुनरागमानानंतर बुमराह इतरही अनेक सामने खेळला आहे.
टीम इंडियाचा संभाव्य संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह/मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर
महत्त्वाच्या इतर बातम्या :